एकूण 83 परिणाम
जून 09, 2019
जळगाव - आदिवासी तडवी भिल्ल समाज तसा मागासलेला. अनेकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने रुग्णाला नेण्यासाठी समस्या उद्‌भवत असते. समाजातील नागरिकांबाबत अशा घडलेल्या घटना पाहून, या खडतर प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी समाजासाठी रुग्णवाहिका घेण्याचा हुंकार भरण्यात आला. याकरिता व्हॉटस्‌ॲप ग्रुपवरून करण्यात...
मे 22, 2019
मांजरी - एखादा अवयव नसेल; तर काय अडचणींना सामोरे जावे लागते, याचे गांभीर्य केवळ दिव्यांगालाच माहीत. अपघातामध्ये आपला अवयव गमाविणाऱ्याला तो नसल्याचे दुःख अधिक भयावह असते. एकोणतीस वर्षांपूर्वी दुर्दैवाने आपला एक हात यंत्रात गमाविलेले हसनचाचा त्याचा अनुभव घेत आहेत. मात्र, त्याने खचून न जाता अशी हात...
मे 09, 2019
केळघर - औषधोपचारासाठी मोठा खर्च होऊनही वाळंजवाडी (ता. जावळी) येथील बाबासाहेब पाडळे यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अयशस्वी ठरली आणि घरातील कर्ती व्यक्‍तीच काळाने हिरावल्याने पाडळे कुटुंबीयांवर दु:खाची कुऱ्हाड कोसळली. त्यातच खरिपाच्या पूर्वमशागतीची कामे, शेतातील बांधबंदिस्ती, भाताचे तरवे भाजणी...
एप्रिल 24, 2019
उस्मानाबाद - खडकाळ माळरानावर जेसीबीच्या साह्याने चर मारून आंबा पिकात कलिंगडाचे आंतरपीक घेण्याची किमया सांगवी-काटी (ता. तुळजापूर) येथील शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी साधली आहे. विशेष म्हणजे तीन एकरांवरील सर्व आंतरपीक सेंद्रिय पद्धतीने केले असून ग्राहकांना थेट विक्री करण्याचा निर्णय पाटील यांनी केला आहे...
एप्रिल 17, 2019
वारजे - जंगलातील पशू, पक्ष्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वारज्यातील तरुण पुढे सरसावले आहेत. वारजे वन उद्यान सेवा संस्थेच्या वतीने एनडीए रस्त्यावरील वनक्षेत्र परिसरात असणाऱ्या खोल खड्ड्यात टॅंकरच्या साह्याने पाणी सोडून त्यांनी पाणवठा तयार केला आहे. यामुळे जनावरांची तहान भागविण्यासाठी...
फेब्रुवारी 25, 2019
नागपूर - नागपूरपासून ८० किमी लांब असलेल्या भिवापूर तालुक्‍यातील झमकोली  गावात जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता नीलेश मानकर यांनी बंद बोअरवेलला पाणी आणण्याचा यशस्वी प्रयोग केला. त्यामुळे या गावातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न सुटला. पाण्यासाठी कायम...
फेब्रुवारी 11, 2019
सातारा - एकेकाळचे मद्यपी सोडवतात मद्यपींची दारू, असे कोणी सांगितले तर कदाचित कोणाचा विश्‍वास बसणार नाही. मद्यपीच्या कुटुंबीयांचा तर नाहीच नाही. पण, हे खरे आहे. ही किमया साधली आहे... आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या अल्कोहोलिक्‍स ॲनॉनिमस या स्वयंसेवी संस्थेच्या येथील ‘नवजीवन समूहा’ने. शहरी असो वा...
फेब्रुवारी 04, 2019
कोल्हापूर - वाद्यांचा दणदणाट, शक्तिप्रदर्शन करणारी मिरवणूक, दिव्यांचा लखलखाट, केवळ मंडपावर लाखाच्या पटीत खर्च, यातले काही न करताही गणेश जयंती साजरी करता येते व यानिमित्ताने धनगरवाड्यातील ४०० मुलांना कपडे, पंधरा कुटुंबांना सर्व संसारोपयोगी साहित्य, तीन निराधार कुटुंबांना वर्षभर पुरेल एवढे धान्य देता...
फेब्रुवारी 04, 2019
अहेरी (जि. गडचिरोली) - पोलिसांनी पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या सोहळ्यात पाच शरणागत नक्षलवाद्यांसह ५४ आदिवासी जोडपी विवाहबद्ध झाली. पोलिसांच्या या पुढाकाराचे येथे कौतुक होत आहे.  जिल्हा पोलिस प्रशासन, मैत्री परिवार संस्था नागपूर व साईभक्त सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आलापल्ली येथे या...
जानेवारी 26, 2019
कळस - शेतमजुराच्या मुलीच्या लग्नातील खर्चाची जबाबदारी घेत तिच्या कन्यादानापर्यंतचे सगळे सोपस्कार पार पाडून पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप देत पळसदेव (ता. इंदापूर) येथील शरद काळे पाटील यांचा सालगड्यासोबत असलेल्या माणुसकीच्या नात्याचा प्रत्यय आला.  काळे पाटील यांनी त्यांच्या शेतात शेतमजुराचे काम...
जानेवारी 25, 2019
लोणी भापकर - जाती-धर्माच्या नावावर समाजात फूट पाडून आपले ईप्सित साधू पाहणाऱ्यांस मूळचा लोणी भापकरचा (ता. बारामती), पण सध्या जर्मनीत असलेल्या हिंदू तरुणाने सणसणीत चपराक लगावली आहे. मोडकळीस आलेल्या येथील पिराच्या कबरीच्या पुनरुज्जीवनासाठी चार लाख रुपयांची मदत दिली आहे. याशिवाय मित्रांच्या साहाय्याने...
जानेवारी 25, 2019
पुणे - तुम्हाला ‘दो आँखे बारा हाथ’ आठवतोय? शिक्षा झालेल्या बंदिवानांना शेती करावी लागते. त्यातून ते नवीन जीवनप्रवास सुरू करतात. अशी साधारण या चित्रपटाची कथा. बंदिवानांच्या पुनर्वसनाचा अगदी हाच प्रयोग राज्याच्या कारागृह प्रशासनानेही अवलंबला आहे. बंदिवानांकडून राज्यातील ३० कारागृहांतील शेती बहरली...
जानेवारी 03, 2019
गणूर - ‘दळण गिरणीतून आणून ते ईकुन मुलाला पुस्तक घेऊन दिलं, आज पोरग साहेब झालय, सगळे म्हणतायत कि चांगलं काम करतंय हे सगळं ऐकून उर भरून येत अन केलेल्या कष्टाचं चीज झाल्याच समाधान वाटतंय’ हे शब्द त्या मातेचे आहेत, जिने स्वत: निरीक्षर असतांना पोराला शिक्षणाचे महत्व पटवून दिले अन्‌ कष्टाची जाण देत महसूल...
डिसेंबर 28, 2018
दौंड - दौंड शहरातील सेंट सेबॅस्टियन या कॉन्व्हेंट विद्यालयातील ११०० विद्यार्थ्यांनी नाताळनिमित्त दौंड, बारामती व श्रीगोंदे तालुक्‍यातील अन्य ११०० गरजू विद्यार्थ्यांना भेटवस्तूंचे वितरण केले.  सेंट सेबॅस्टियन विद्यालयाचे प्राचार्य रेव्हरंड डेनिस जोसेफ यांनी नाताळ गरजूंसमवेत साजरा करण्याच्या...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (ॲडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी याची गुरुवारी (ता. १५) अधिकृत घोषणा केली...
नोव्हेंबर 14, 2018
गोंदिया - वर्षातून एकदाच येणाऱ्या दिवाळीच्या सणाची प्रत्येकाला प्रतीक्षा असते. बच्चे कंपनीला दिवाळीमध्ये त्यांच्या आनंदमय जीवनाला पारावारच नाही. फटाक्‍यांची आतषबाजी, नव्या कपड्यांची नवलाई, गोडधोड, पंचपक्वान्न खाण्याची इच्छा असते. मात्र, हे सर्व केवळ ज्यांचे आईवडील आहेत, त्याच मुलांना मिळते. परंतु,...
ऑक्टोबर 24, 2018
नागपूर - सैन्यभरतीबद्दल युवकांमध्ये जनजागृती करून त्यांच्यात देशभावना निर्माण करण्याच्या उदात्त हेतूने उपराजधानीतील दोन युवक सायकलने देशभ्रमणाला निघाले आहेत. नागपूर ते वाघा बॉर्डर असा जवळपास पाच हजार किमीचा प्रवास करणार असून, या सायकल अभियानादरम्यान ते सामाजिक संदेशही देणार आहेत.  रितेश भोयर आणि...
ऑक्टोबर 03, 2018
पौड रस्ता - आता सगळेच मार्ग खुंटले; यापुढे काही करता येणार नाही, असे म्हणत जी माणसे परिस्थितीला शरण जातात त्यांची प्रगती खुंटते; पण काही माणसे परिस्थितीला शरण न जाता पुढे जाण्याचा प्रयत्न करतात ते यशोशिखरावर नक्कीच पोचतात, याची प्रचिती हिमांशू पाटसकरला भेटल्यावर येते.  सेरेब्रल पाल्सी असतानाही...
ऑक्टोबर 01, 2018
नागपूर - सेवानिवृत्तीनंतर कुटूंब व नातेवाइकांच्या गोतावळ्यात सुखासमाधानाने उर्वरित आयुष्य काढणारे शेकडो जण आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात. पण काही जण अपवादही आहेत. रत्नाकर राऊत हे अशाच व्यक्‍तींपैकी एक. त्यांनी निवृत्तीनंतर चार भिंतीच्या आड आयुष्य न घालविता समाजाच्या भल्यासाठी स्वत:ला वाहून...
सप्टेंबर 17, 2018
नागपूर - रेशीमबाग मैदानावरील चिखल व दगडमातीच्या खडबडीत ट्रॅकवर सराव करून राष्ट्रीय स्तरावर झेप घेणारी नागपूरची महिला धावपटू निकिता राऊतच्या मदतीसाठी पुणेकर देवदूत धावून आले. निकिताचे टॅलेंट, जिद्द आणि मेहनतीने प्रभावित होऊन पुण्याचे शेखर द्रविड आणि सुधांशू खैरे यांनी तिला पाच वर्षांसाठी दत्तक घेतले...