एकूण 19 परिणाम
एप्रिल 19, 2019
सोलापूर - मागील हंगामात १९५ साखर कारखान्यांनी ९४०.६१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप घेतले. ऊस घेतल्यापासून १४ दिवसांत पैसे देणे बंधनकारक असतानाही हंगाम संपून दोन महिने होऊनही शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम कारखान्यांकडून मिळालेले नाहीत. सद्यःस्थितीत राज्यातील १६१ कारखान्यांकडे चार हजार कोटी रुपयांची...
मार्च 05, 2019
सोलापूर - शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी राज्यातील 184 कारखान्यांनी विविध बॅंकांकडून साखरेवर सुमारे 8 हजार 457 कोटींचे कर्ज काढल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठावच नसल्याने गोदामांमध्ये साखर पडून आहे. त्यामुळे "एफआरपी' देणे कठीण झाले असून, आता...
मार्च 04, 2019
सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माझ्यापुढे माढा आणि बारामती असे दोन पर्याय आहेत. मी बारामतीसाठी आग्रही आहे तर दुसरीकडे माढ्यातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, कोणत्या मतदारसंघातून लढायचे हे आठ दिवसात जाहीर होईल, असे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी 'सकाळ'शी बोलताना...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - राज्यातील साखर कारखान्यांकडे उसाच्या किफायतशीर आणि रास्त दरापोटी (एफआरपी) सुमारे साडेचार हजार कोटी रुपये थकीत आहेत. त्यापैकी ४४ साखर कारखान्यांकडे एक हजार २९८ कोटी रुपये थकीत असून, त्या कारखान्यांची साखर आणि मालमत्ता जप्त करून ऊस उत्पादकांची देणी भागविण्याचे आदेश साखर आयुक्‍तांनी दिले आहेत;...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे : यंदाच्या हंगामात ऊसबिलाची रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) थकविणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच तब्बल सव्वातीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत. राज्यातील केवळ 11 कारखान्यांनी "एफआरपी'ची पूर्ण रक्‍कम दिली आहे. मात्र, परळीच्या वैद्यनाथ कारखान्यासह सात...
जानेवारी 24, 2019
सोलापूर - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याकडे यंदाच्या हंगामाची ‘एफआरपी’ची ७७ कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे सहकारमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. तुपकर म्हणाले, ‘‘...
जानेवारी 23, 2019
सोलापूर - राज्यातील 73 कारखान्यांकडे तब्बल पाच हजार 320 कोटी 36 लाखांची एफआरपी थकली आहे. त्यापैकी 50 टक्‍क्‍यांहून अधिक एफआरपी थकविलेल्या 39 कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, त्यावर 24 जानेवारीला सुनावणी होणार असल्याची माहिती राज्याच्या साखर आयुक्‍तालयाकडून देण्यात आली. राज्यात...
डिसेंबर 26, 2018
सोलापूर - केंद्र सरकारच्या नव्या धोरणांनुसार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतिटन दोन हजार 637 रुपये मिळणे अपेक्षित होते; परंतु, सद्यःस्थितीत एकोणिशे ते दोन हजार रुपयेच कारखानदारांकडून दिले जात आहेत. दुसरीकडे साखरेचे दर स्थिर नसल्याने साखरेला 3300 ते 3500 रुपयांचा हमीभाव मिळावा, अशी मागणी...
नोव्हेंबर 13, 2018
सोलापूर : यंदाच्या गळित हंगामात गाळप होणाऱ्या ऊसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी निगडित असलेल्या लोकमंगल साखर कारखान्यासमोर (भंडारकवठे, ता. दक्षिण सोलापूर) गुरुवारपासून (ता. 15) धरणे आमरण उपोषण करणार आहे. जिल्ह्यातील...
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - गेल्या गळीत हंगामातील थकबाकी द्यावी तसेच यंदाच्या हंगामात उसाला एफआरपी अधिक दोनशे रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी (ता.११) सातारा, सोलापूर आणि परभणी जिल्ह्यांत ठिकठिकाणी आंदोलन केले.  एकरकमी एफआरपी शिवाय कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा या वेळी...
नोव्हेंबर 11, 2018
कोल्हापूर - यंदाच्या गळीत हंगामात विनाकपात एकरकमी एफआरपी देण्याच्या निर्णयावर जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनांचे एकमत होऊन ऊसदराचा तिढा शनिवारी (ता. १०) सुटला. भविष्यात साखरेचे दर वाढल्यानंतर एफआरपी व्यतिरिक्त २०० रुपये जादा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे या वेळी कारखानदारांनी सांगितले. ...
नोव्हेंबर 10, 2018
सोलापूर : गाळप झालेल्या उसाच्या बिलापोटी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास सरकार आणि साखर कारखाने बांधिल आहेत. एफआरपीच्यावर कोणत्या कारखान्याने किती रक्कम द्यावी ही सरकारची जबाबदारी नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा मोबदला मिळाला पाहिजे. हा मोबदला मिळत असताना साखर उद्योगही टिकला पाहिजे अशी भूमिका...
नोव्हेंबर 04, 2018
सोलापूर : यंदा गाळप परवान्यासाठी राज्यातील 194 साखर कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले परंतु, त्यापैकी 105 कारखान्यांनाच परवाना देण्यात आला आहे. दुसरीकडे मजुरांअभावी कारखान्यांना क्षमतेनुसार ऊस उपलब्ध होत नसल्याने त्यापैकी फक्‍त 46 कारखान्यांचेच गाळप सुरू असल्याचे साखर आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले....
ऑक्टोबर 17, 2018
सोलापूर : राज्याची दुष्काळी स्थिती, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणावरून राज्यभर निर्माण झालेला आक्रोश या सर्वांची धास्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आजही असल्याचे प्रकर्षाने दिसले. विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या...
ऑक्टोबर 04, 2018
सोलापूर - उसाची एफआरपी 9.5 टक्‍क्‍यांवरून 10 टक्‍के केली. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना दोनशे रुपयांची वाढीव एफआरपी मिळणार असल्याचा सरकारकडून डांगोरा पिटला गेला. परंतु, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना 14 रुपयेच मिळणार आहेत. ऊसदर नियंत्रण अध्यादेश लोकसभेत कायदा करून दुरुस्त करण्याऐवजी सरकारने परस्पर निर्णय...
ऑक्टोबर 03, 2018
सोलापूर - राज्यातील 38 साखर कारखान्यांकडे मागील गाळप हंगामातील तब्बल 336 कोटी 15 लाख 75 हजार रुपयांची एफआरपी थकली आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 11 साखर कारखान्यांकडे 90 कोटी रुपये थकले आहेत. अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांना अनुदानाच्या स्वरूपात मदत करण्याची भूमिका मुख्यमंत्री...
सप्टेंबर 27, 2018
सोलापूर - केंद्र सरकारने यंदाच्या साखर हंगामासाठी "एफआरपी'त (किमान आधारभूत किंमत) टनाला 200 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतल असून, "एफआरपी'साठी उसाचा पायाभूत उतारा 9.5 वरून 10 टक्‍के करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा सरासरी उतारा 11.5 गृहीत धरून कारखानदारांकडून शेतकऱ्यांना दोन हजार 637 रुपये...
ऑगस्ट 31, 2018
सोलापूर : देशातील कोणत्याच उद्योगाला जेवढी बंधने नाहीत, तेवढी बंधने साखर उद्योगाला घातली आहेत. साखर दर, निर्यात आणि "एफआरपी' हे सगळे विषय केंद्राच्या अखत्यारित आहेत. कारखानदार आणि शेतकरी यांच्यात विश्‍वासाचे नाते आहे; परंतु साखरेचे दर पाडून एफआरपीचा मुद्दा पुढे करून सरकार शेतकरी आणि कारखानदार...
ऑगस्ट 07, 2018
सोलापूर - मागील गाळप हंगामात राज्यातील 63 तर 2011 ते 2017 मध्ये ऊस गाळप केलेल्या 53 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांच्या ऊसबिलाची तीन हजार 274 कोटी रुपयांची येणेबाकी आहे. वर्षभराच्या खर्चाचे नियोजन करून जोपासलेल्या ऊसबिलाची रक्‍कम वेळेवर न मिळाल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापूर जिल्ह्यात...