एकूण 9 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
अस्वस्थ सहकार आणि सातत्याने वाऱ्यावर राहिलेले वस्त्रोद्योग या क्षेत्रांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढल्याशिवाय त्यांच्या अस्तित्वाचा संघर्ष संपणार नाही. सध्या सहकार क्षेत्रात मोठी अस्वस्थता आहे. ऊसाच्या एफआरपीवरून रणकंदन, दुधाचे रखडलेले अनुदान, सहकारी बॅंकांवरील बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची टांगती तलवार...
जानेवारी 01, 2019
कोल्हापूर : "कोल्हापुरात येऊन साखरेच्या प्रश्‍नावर डरकाळ्या फोडणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात केंद्रात जाऊन हा प्रश्‍न सोडवण्याची हिंमत नाही. सध्याचे सरकार शेतकऱ्यांसाठी लबाड आणि बॅंका लुटणाऱ्यांना धार्जिण असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली....
डिसेंबर 26, 2018
भवानीनगर - यंदाच्या हंगामात मराठवाड्यातील ऊस पश्‍चिम महाराष्ट्रात येऊ लागला आहे. विशेषतः बीड जिल्ह्यातील उसाला पुणेरी गोडवा लागला असून, पुणे जिल्ह्यातील कारखान्यात गाळप होणाऱ्या उसामुळे टनामागे ३५० ते ४०० रुपये फायदा होत असल्याने बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक त्यांचा ऊस इकडे पाठवू लागले आहेत....
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील.'',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वसंतदादा शुगर...
ऑक्टोबर 29, 2018
ऊस उत्पादकांच्या प्रश्‍नावर ऑक्‍टोबरमध्ये होणारी खासदार राजू शेट्टी यांची ऊस परिषद ही आता नित्याची बाब झाली आहे. गेल्या सोळा वर्षांचा हा शिरस्ता यंदाही कायम राहिला. यंदा तर राजू शेट्टी यांच्या ऊस परिषदेबरोबरच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची शेतकरी कष्टकरी परिषद, रघुनाथदादा पाटील यांच्या संघटनेची...
सप्टेंबर 26, 2018
मुंबई - साखर कारखानदारांमधून या वर्षी ऊस गाळप हंगाम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची मागणी होती. मात्र, पावसाची मोठी उघडीप आणि उसावरील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन काही प्रमाणात कमी होण्याचा धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऊस गाळप हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...
सप्टेंबर 08, 2018
भवानीनगर - देशातील मागील हंगामातील विक्रमी साखर उत्पादन, याही वर्षी त्याची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आणि साखरेच्या दरात दीर्घकाळ झालेली घसरण या पार्श्वभूमीवर एफआरपी एकरकमी देणे शक्‍यच नाही. ती दोन टप्प्यांत देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी दक्षिणेकडील साखर कारखान्यांच्या संघटनेने (सिस्मा) केंद्र...
ऑगस्ट 31, 2018
सोलापूर : देशातील कोणत्याच उद्योगाला जेवढी बंधने नाहीत, तेवढी बंधने साखर उद्योगाला घातली आहेत. साखर दर, निर्यात आणि "एफआरपी' हे सगळे विषय केंद्राच्या अखत्यारित आहेत. कारखानदार आणि शेतकरी यांच्यात विश्‍वासाचे नाते आहे; परंतु साखरेचे दर पाडून एफआरपीचा मुद्दा पुढे करून सरकार शेतकरी आणि कारखानदार...
ऑगस्ट 14, 2018
पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने साखरेच्या मूल्यांकन दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना दीडशे कोटी रुपयांचा जादा निधी उपलब्ध होईल. त्यातून राज्यातील ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्‍कम देण्यासोबतच कारखान्यांना पूर्वहंगामी खर्च भागविणे शक्‍य होणार आहे. राज्यात काही...