एकूण 18 परिणाम
जून 10, 2019
पुणे : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे पुढील हंगामात उसाच्या क्षेत्रात २८ टक्क्‍यांनी घट होणार असून, तेवढीच साखर उत्पादनात होईल अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.  गतवर्षी उसाचे क्षेत्र 11 लाख 62 हजार हेक्‍टर होते. पुढील हंगामात ते घटून आठ लाख 62 हजार होईल. यात...
मे 03, 2019
जयसिंगपूर - राज्यातील साखर कारखान्यांनी 30 मे पर्यंत थकीत एफआरपी द्यावी, अन्यथा एक जूनपासून आरआरसी अंतर्गत कारवाई करुन शेतकऱ्यांची थकीत बिले अदा करण्याचा इशारा पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. कारवाईच्या धसक्‍याने जिल्ह्यातील नऊ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिली असली तरी अद्याप पंधरा...
एप्रिल 19, 2019
सोलापूर - मागील हंगामात १९५ साखर कारखान्यांनी ९४०.६१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप घेतले. ऊस घेतल्यापासून १४ दिवसांत पैसे देणे बंधनकारक असतानाही हंगाम संपून दोन महिने होऊनही शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम कारखान्यांकडून मिळालेले नाहीत. सद्यःस्थितीत राज्यातील १६१ कारखान्यांकडे चार हजार कोटी रुपयांची...
मार्च 23, 2019
पुणे - राज्यातील सर्व सरकारी वसतिगृहे, आश्रमशाळा, अंगणवाड्या, महिला बचत गट, कारागृहे आणि प्रशिक्षण संस्थांना आता थेट साखर कारखान्यांकडून 3100 रुपये प्रतिक्विंटल या दराने साखर खरेदी करता येणार आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले. त्यामुळे बाजारभावाऐवजी...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे - राज्यातील साखर कारखान्यांकडे उसाच्या किफायतशीर आणि रास्त दरापोटी (एफआरपी) सुमारे साडेचार हजार कोटी रुपये थकीत आहेत. त्यापैकी ४४ साखर कारखान्यांकडे एक हजार २९८ कोटी रुपये थकीत असून, त्या कारखान्यांची साखर आणि मालमत्ता जप्त करून ऊस उत्पादकांची देणी भागविण्याचे आदेश साखर आयुक्‍तांनी दिले आहेत;...
फेब्रुवारी 07, 2019
पुणे - शेतकऱ्यांना उसाचा रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) एकरकमी देणे कायद्यानुसार बंधनकारक असून, तो शेतकऱ्यांचा हक्‍कच आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करण्याची गरज नव्हती. साखर कारखाने आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात दिलजमाई असून, ही ‘नुरा कुस्ती’ असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते...
फेब्रुवारी 03, 2019
पुणे - यंदाच्या हंगामात ऊसबिलाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) थकविणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच तब्बल सव्वातीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांत जमा झाले आहेत. राज्यातील केवळ ११ कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्‍कम दिली आहे. मात्र, परळीच्या वैद्यनाथ कारखान्यासह सात...
जानेवारी 31, 2019
कोल्हापूर - उसाच्या एफआरपीची रक्कम १४ दिवसांत दिली नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांची साखर, मोलॅसिस (मळी), बगॅस आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, तर चौदा कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.  जप्ती आदेशामध्ये दत्त (शिरोळ), संताजी घोरपडे (बेलेवाडी), वारणा (वारणानगर...
डिसेंबर 26, 2018
भवानीनगर - यंदाच्या हंगामात मराठवाड्यातील ऊस पश्‍चिम महाराष्ट्रात येऊ लागला आहे. विशेषतः बीड जिल्ह्यातील उसाला पुणेरी गोडवा लागला असून, पुणे जिल्ह्यातील कारखान्यात गाळप होणाऱ्या उसामुळे टनामागे ३५० ते ४०० रुपये फायदा होत असल्याने बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक त्यांचा ऊस इकडे पाठवू लागले आहेत....
सप्टेंबर 26, 2018
सोमेश्वरनगर : फलटण (जि. सातारा) तालुक्यातील शरयू, स्वराज अशा साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिलेली नाही. 15 ऑक्टोबरपर्य़ंत कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी न दिल्यास स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या सहकार्याने आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकरी कृती समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला...
जून 21, 2018
पुणे - गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजप-शिवसेनेसोबत युती करून भाकरी फिरविण्याचा विचार केला. परंतु, भाकरी फिरवता-फिरवता आमचा "तवा'च गायब झाला, अशा शब्दांत खासदार राजू शेट्टी यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जोरदार टोला लगावला. आम्ही सर्व राजकीय पक्षांपासून समान अंतर राखून आहोत. निवडणुकीबाबत...
एप्रिल 17, 2018
कोल्हापूर - यंदाच्या साखर हंगामात ‘एफआरपी’ची थकीत रक्कम २३ एप्रिलपर्यंत न दिल्यास साखर जप्त करण्याचा इशारा वारणा कारखान्यासह कोल्हापूर विभागातील पाच साखर कारखान्यांना नोटिसीद्वारे दिला आहे. साखर आयुक्त संभाजी कडू-पाटील यांनी हे आदेश काढले. दरम्यान, वारणा कारखान्याकडील थकीत रक्कम ही जमीन महसुलाची...
एप्रिल 03, 2018
माजी आमदार रमेश थोरात यांची टीका; चारशे ट्रॅक्‍टरवर चार बॅंकांकडून 100 कोटींचे नियमबाह्य कर्ज दौंड (पुणे): दौंडचे आमदार तथा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी कारखान्याकडे उसाची वाहतूक करणाऱ्या चारशे ट्रॅक्‍टरवर एकाच वर्षात चार वेगवेगळ्या बॅंकांचे 100 कोटींचे कर्ज नियमबाह्य...
नोव्हेंबर 07, 2017
सोमेश्वरनगर,  जि. पुणे - उसाच्या उचलीसंदर्भात शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या चर्चेतून "एफआरपी'' अधिक दोनशे रुपये प्रतिटन अशी केलेली ‘तडजोड’ शेतकऱ्यांना रुचलेली नाही. यामुळे पुणे जिल्ह्याची पहिली उचल २६०० ते २८५० रुपये प्रतिटनापर्यंत राहणार आहे. शिल्लक साखरसाठ्याच्या उरलेल्या रकमा, साखरेच्या...
नोव्हेंबर 07, 2017
सोमेश्वरनगर, जि. पुणे - उसाच्या उचलीसंदर्भात शेतकरी संघटना आणि कारखानदारांच्या चर्चेतून "एफआरपी' अधिक दोनशे रुपये प्रतिटन अशी केलेली ‘तडजोड’ शेतकऱ्यांना रुचलेली नाही. यामुळे पुणे जिल्ह्याची पहिली उचल २६०० ते २८५० रुपये प्रतिटनापर्यंत राहणार आहे. शिल्लक साखरसाठ्याच्या उरलेल्या रकमा, साखरेच्या भावाची...
ऑक्टोबर 30, 2017
पुणे: पीएमपी बसमध्ये प्रवाशाचे पैशांसह पडलेले पाकिट परत करत वाहक व चालकाने प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे. यामुळे प्रवाशांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. पीएमपीची बस रावेत बस थांबा येथून शिवाजीनगरकडे येत होती. दरम्यानच्या काळात एका प्रवाशाचे पैशांचे पाकीट बसमध्ये पडले होते. पाकिटामध्ये रोख साडे...
ऑक्टोबर 30, 2017
खडकवासला : "वडगाव धायरी परिसरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी या भागात दोन घंटा देण्याचे जाहीर आश्वासन आमदार भीमराव तापकीर यांनी दिले आहे." सिंहगड रोड परिसरातील वडगाव धायरी प्रभाग क्रमांक 33 मधील राजयोग व मधूकोश धर्मावतनगर येथील पथदिव्यांचा कामांचा शुभारंभ खडकवासला विधानसभा मतदार संघाचे आमदार...
मे 22, 2017
पुणे : महाराष्‍ट्रातील सहकाराचा आदर्श घेऊन गुजरातमध्ये उसाला प्रतिटन ४ हजार ४४१ रुपये दर दिला जातो. मग तो दर महाराष्ट्रात का दिला जात नाही. तसेच, सन २०१६-१७ मध्ये गळीत झालेल्या उसाचे दुसरे बिल प्रतिटन १ हजार रुपये प्रमाणे मिळावे अशा विविध मागण्यांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आजपासून येथील...