एकूण 85 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
नारायणगाव (पुणे)  : विजयादशमीनिमित्त झेंडू व शेवंतीच्या फुलांच्या बाजारभावात वाढ झाली. मात्र, हुंडेकरी व्यावसायिक व दलाल यांनी मुंबईच्या बाजारात पाठविलेल्या फुलांसाठी हमाली, कमिशन, मोटारभाडे आदींसाठी प्रतिकिलो तेरा रुपये खर्च लावला. त्यामुळे एकप्रकारे ते संगनमताने शेतकऱ्यांची लूट करत आहेत, अशी...
ऑक्टोबर 08, 2019
नवी मुंबई : नवरात्रोत्सवात अनेकांचे नऊ दिवसांचे उपवास असल्याने या काळात फलाहार करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे बाजारात फळांना मोठी मागणी असते. या वेळी देखील बाजारात फळांना मोठी मागणी आहे. मात्र, ही मागणी पूर्ण करता येईल इतकी फळे बाजारात येत नसल्याने फळांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पावसामुळे...
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : ऐरोली, सेक्‍टर १५ मध्ये सिडकोकडून बांधण्यात आलेले बाजार संकुल २७ वर्षांपासून वापरात नसल्याने ही इमारत जीवघेणी झाली आहे. हे ठिकाण गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला असून येथे अनैतिक उद्योगही सुरू असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षी पावसामुळे मोडकळीस आलेल्या...
सप्टेंबर 26, 2019
नवी मुंबई : आम्ही कधीही माथाडी कामगार चळवळीच्या बळकटीला नख लावण्याचे काम करणार नाही, आमची पूर्ण ताकद या चळवळीच्या पाठीशी असेल. शिवसेना कधीही या चळवळीला आडकाठी घालण्याचे काम करणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. वाशी बाजार समितीत गुरुवारी (ता.२५) माथाडी कामगार मेळावा...
सप्टेंबर 24, 2019
मुंबई : तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर यांचा आगामी चित्रपट 'सांड की ऑँख' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. शुटर दादींवर आधारीत असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. आता मात्र या चित्रपटाच्या भूमिकेवरुन वादाला नवे तोंड फुटले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी वयाचा मुद्दा...
सप्टेंबर 20, 2019
मुंबई : क्रॉफर्ड मार्केट परिसरातील मुंबई पोलिस आयुक्तालयासमोरील अहमद नावाच्या चार मजली इमारतीचा काही भाग शुक्रवारी सकाळी 10.45 च्या सुमारास कोसळला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहा जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.  टिळक रोडवरील लोहार चाळीजवळ ही म्हाडाची उपकरप्राप्त इमारत आहे. जुनी तसेच धोकादायक झाली...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई: शेअर बाजारात झालेल्या नुकसानीमुळे नैराश्‍यात गेलेल्या 46 वर्षांच्या व्यावसायिकाने इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मुलुंड पश्‍चिमेत गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.  मनीष ठक्कर असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. मुलुंड पश्‍चिमेतील वैशालीनगर, कल्पनगरी येथील दहिवत टॉवर या...
सप्टेंबर 14, 2019
हिंगणा : भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे उद्या शनिवारी (ता.14) मुंबई येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांच्या राजकारणाला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याची टीकाही घोडमारे यांनी केली. शुक्रवारी हिंगणा येथील कृषी उत्पन्न बाजार...
सप्टेंबर 12, 2019
नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी (ता.15) वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.  गणेश नाईक यांच्यासारख्या नेत्यामुळे शहर राष्ट्रवादीला...
सप्टेंबर 10, 2019
नवी मुंबई : सीताफळाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने झाले असले तरी बाजारात आता उशिराने का होईना, सीताफळाचा मुख्य हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे बाजारात आता मोठी सीताफळे दिसू लागली आहेत. वाशीतील घाऊक बाजारात सध्या चांगल्या प्रमाणात सीताफळ येत आहेत, शिवाय त्यांचे दरही आवाक्‍यात असल्याने ग्राहकांना मोठ्या...
सप्टेंबर 09, 2019
नवी मुंबई : गणेशोत्सव सुरू झाल्यापासून फळांची मागणी वाढली असून, घाऊक फळबाजारात देखील फळांची आवक वाढली आहे; मात्र पाऊस असल्याने खरेदीदार व विक्रेत्यांना बाजारात पोहोचण्यास अडचणी येत आहेत.  काश्‍मीर हिमाचलमधून सफरचंद आणि पीअरही मोठ्या बाजारात येत आहेत; मात्र पाऊस असल्याने माल बाजारात पोहोचण्यास अडचणी...
सप्टेंबर 09, 2019
 पिंपळगाव रेणुकाई (जि. जालना) -  मिरचीचे माहेरघर म्हणून सध्या भोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव रेणुकाई हे गाव नावारूपाला आले आहे. येथील बाजार समीतीच्या तीन एकर क्षेत्रावर दररोज दुपारी तीन वाजेपासून भरणाऱ्या या बाजारात चार तासांत सातशे टन मिरचीचा व्यवहार होत आहे. विशेष म्हणजे येथून दुबई, श्रीलंका,...
सप्टेंबर 06, 2019
मुंबई - गणेशोत्सवात विविध प्रकारच्या फुलांना मोठी मागणी असते. दादरमधील फूलबाजारात शेकडो टन फुले येतात. त्यापैकी विकली न गेलेली फुले आणि इतर कचरा मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. फूलबाजारातून दोन दिवसांत ३०० टन कचरा महापालिकेने उचलला.  दादरच्या फूलबाजारातून मागील दोन दिवसांत तब्बल ३०० टन कचरा...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई : श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला दादर येथील फुलबाजारात मोगऱ्याचे दर 2000 रुपये किलोवर गेले होते, तर शेवंती, गुलछडी 320 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात होती. फुलांची आवक घटल्याने या वर्षी फुलांच्या दरात जास्त वाढ झाली आहे.  फुलबाजारात शिरायला जागा मिळणे आज मुश्कील झाले होते. एवढी गर्दी...
ऑगस्ट 31, 2019
सातारा ः गणरायाच्या मखरासह परिसरही प्रकाशमान व्हावा, वातावरण उल्हासित राहावे, यासाठी या वर्षी लुकलुकणाऱ्या विद्युत दिव्यांच्या माळांच्या विविधतेत भर पडली असून, फुलांत, फळांत आणि आकर्षक आकारांतील प्रकाशमान दिवे नागरिकांना भुरळ घालत आहेत. दरम्यान, आज हरतालिका खरेदीसाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी वाढली...
ऑगस्ट 23, 2019
मुंबई: शेअर बाजारात सकाळच्या सत्रात झालेल्या घसरणीनंतर बाजार आता सावरला आहे. केंद्र सरकार परकी गुंतवणुकीवरील अधिभार मागे घेण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. परिणामी शेअर बाजारातील नकारात्मक वातावरण किंचित कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. सकाळच्या सत्रात शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा...
ऑगस्ट 21, 2019
नागपूर : पावसानंतर भाजी बाजारात किती घाण निर्माण होते, चिखल राहतो का, पाणी साचते का या संदर्भात बाजारांच्या परिस्थितीचे छायाचित्रे उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे. शहरातील आठवडी बाजारातील ही खरी परिस्थिती सांगणारे बोलके छायाचित्रे न्यायालयीन मित्र ऍड. शशीभूषण वाहणे यांनी मुंबई उच्च...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भाज्यांच्या आवक मोठ्या प्रमाणात घटली असल्याने भाज्यांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक भाज्या 100 रुपये किलोपेक्षा अधिक दराने मिळत आहेत. वाढलेल्या दरामुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. भाज्यांसह कांद्याच्या...
ऑगस्ट 19, 2019
नवी मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे कृषीमालाचे मोठे नुकसान झाले. यामध्ये पाणी लागून नाशिक जिल्ह्यातील कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. त्यातूनही जो काही कांदा वाचला, त्याची विशेष काळजी घ्यावी लागत आहे. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या...