एकूण 109 परिणाम
जून 05, 2019
सेन्सेक्‍समध्ये १८४ अंशांची घसरण; निफ्टीतही घट  मुंबई - शेअर बाजाराला मंगळवारी नफेखोरीचा फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १८४ अंशांची घसरण होऊन ४० हजार ८३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ६६ अंशांची घट होऊन १२ हजार २१ अंशांवर बंद झाला.  सेन्सेक्‍सच्या मंचावर...
मे 21, 2019
मोहोळ (जि. सोलापूर) - ऐन दुष्काळी परिस्थितीमध्ये स्वतःच्या शेतातील ऊस, कडवळ ही पिके पाण्याविना जळत असूनही कोन्हेरी (ता. मोहोळ) येथील शेतकरी अण्णासाहेब विष्णू शेटे यांनी गावकऱ्यांसाठी दररोज 75 हजार लिटर पाणी उपलब्ध करून दिले आहे. गावकरी व जनावरांबरोबरच गावातील विवाह सोहळ्यासाठीदेखील शेटे पाणी...
मे 06, 2019
सिंधुदुर्गात यंदा देवगड हापूसचा हंगाम चढ-उताराचा ठरला. पहिल्या टप्प्यात हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट होते. आता बाजारपेठेत हापूसची आवक वाढू लागली आहे. सध्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आहे. तो बाजारपेठेत दाखल होऊ लागताच दरही खाली येण्याची शक्‍यता आहे. मात्र, सर्व आंबा योग्य प्रकारे विकला गेल्यास...
मार्च 11, 2019
जळगाव ः यंदा दुष्काळाचे सावट असले, तरी लग्नसराईमुळे सोन्याच्या बाजारात झळाळी कायम आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरचा दर वाढल्याने सोन्याच्या दरात या पंधरवड्यात प्रतितोळा 1100 रुपयांची घसरण झाली आहे. गेल्या 28 फेब्रुवारीला 33900 रुपयांवर पोचलेले भाव आज 32800 वर येऊन ठेपले आहेत. यामुळे आगामी...
फेब्रुवारी 12, 2019
केत्तुर (सोलापुर) - पोमलवाडी (ता.करमाळा) येथील प्रयोगशील शेतकरी प्रशांत शेलार यांनी दीड एकरातील हातातोंडाशी आलेले पपईचे पीक योग्य दर मिळत नसल्याने सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी प्रथमच केलेल्या या पिकापासून सुमारे लाखभर रुपयांचे नुकसान झाले असून, या पपई उत्पादक शेतकऱ्याचे किमान अडीच ते तीन लाख...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद - दुष्काळामुळे खरीप हंगामावर झालेला परिणाम बाजारावर स्पष्टपणे जाणवू लागला आहे. ज्वारी, बाजरी, मका आदी धान्यांचे भाव वधारले आहेत. गुरुवारी (ता.सात) ज्वारी विक्रमी 2851, तर मका 2068 रुपये प्रतिक्‍विंटलप्रमाणे विकला गेला. गहू तर बाजारातून अक्षरशः गायब झाला आहे.  औरंगाबादसह मराठवाड्यात यंदा...
जानेवारी 25, 2019
पुणे - तुम्हाला ‘दो आँखे बारा हाथ’ आठवतोय? शिक्षा झालेल्या बंदिवानांना शेती करावी लागते. त्यातून ते नवीन जीवनप्रवास सुरू करतात. अशी साधारण या चित्रपटाची कथा. बंदिवानांच्या पुनर्वसनाचा अगदी हाच प्रयोग राज्याच्या कारागृह प्रशासनानेही अवलंबला आहे. बंदिवानांकडून राज्यातील ३० कारागृहांतील शेती बहरली...
जानेवारी 23, 2019
मुंबई - राज्यातल्या पूर्व भागातील हवामान अस्थिर होणार असल्यामुळे 24 ते 26 जानेवारी दरम्यान विदर्भात (प्रामुख्याने पूर्व-विदर्भात) वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतील बऱ्याच भागात या...
जानेवारी 18, 2019
वडगाव निंबाळकर - बारामती बाजार समितीत भाव नाही; म्हणून चोपडजच्या कानाडवाडीतील शेतकऱ्याने कोल्हापूरच्या मार्केटमध्ये कांदा पाठविला. पण तेथेही तीच अवस्था. सुमारे ४५ पिशव्यांची पट्टी आली अवघी ९५ रुपये.  अरविंद जयसिंग भोसले यांनी दोन एकर क्षेत्रापैकी एक एकरात कांद्याचे पीक घेतले आहे. दुसऱ्या एकरात...
जानेवारी 13, 2019
जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा नितीन ढोबळे या बाजारपेठेची मागणी लक्षात घेत पारंपरिक पिकांच्या बरोबरीने शेवगा तसेच चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड करतात. याचबरोबरीने पूरक उद्योगाच्यादृष्टीने गव्हाकुंर पावडरनिर्मितीस देखील त्यांनी सुरवात केली आहे. जारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील...
जानेवारी 05, 2019
लातूर : पाणीटंचाई व दुष्काळ निवारण हे केवळ सरकारचेच काम नसून त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी योगदान दिलेच पाहिजे, ही संकल्पना तत्कालीन जिल्हा उपनिबंधक संतोष पाटील यांनी गंगापूर (ता. लातूर) गावात चौदा वर्षापूर्वी रूजवली. गंगापूरची प्रेरणा घेऊन जिल्ह्यात लोकसहभागातून जलसंधारणाच्या चळवळीला सुरूवात झाली...
डिसेंबर 24, 2018
अमरावती : तुरीच्या शासकीय खरेदीसाठीच्या नोंदणीची मुदत संपली असली तरी शासकीय खरेदी केंद्राचा मात्र पत्ता नाही. नवीन तूर बाजारात येत असताना खुल्या बाजारात खरेदीदारांनी भाव पाडले असून शेतकऱ्यांना हमी भावाच्या तुलनेत प्रतिक्विंटल हजार रुपयांचा फटका बसत आहे. दुष्काळामुळे घसरलेली उत्पादनाची सरासरी व कमी...
डिसेंबर 21, 2018
येवला : भाव पडल्याने अखेर कांदा उत्पादकांना मदतीचा हात म्हणून प्रतिक्विंटल दोनशे रुपये अनुदान सरकारकडून जाहीर करण्यात आले. मात्र, तालुक्यातील शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने ही मदत काडीचा आधारही ठरणार नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पडलेल्या भावामुळे चार-पाच लाखांचे नुकसान होऊनही...
डिसेंबर 08, 2018
अंबासन - बागलाण तालुक्यात दोन युवा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा, शेतमालाला भाव मिळत नसल्याने नैराश्येपोटी आत्महत्या करून जीवन संपविल्याच्या घटना घडल्या असून, जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील भडाणे येथील शेतकरी तात्याभाऊ साहेबराव खैरनार यांनी कांदा चाळीत गळफास लावून आत्महत्या केली. तर सारदे...
डिसेंबर 06, 2018
सटाणा : बागलाण तालुक्यात वीज वितरण कंपनीने शेती पंपांच्या वीज पुरवठ्याच्या वेळेत अचानक बदल केल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी देणे अशक्य झाले आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या बागलाण तालुका राष्ट्रवादी कॉंंग्रेसतर्फे माजी आमदार संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष शैलेश...
नोव्हेंबर 28, 2018
सोलापूर - कमी कालावधीचे पीक म्हणून कांदा केला... सध्या चांगला भाव नसल्याने खर्चसुद्धा निघेना... शेतात तरी किती दिवस ठेवायचा. अक्षरश: जागेवर नासू लागलाय... दुष्काळातही कांद्याला योग्य भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी कसं जगायचं...अशी व्यथा माळकवठा (ता. दक्षिण सोलापूर) येथील शोभा पाटील यांनी व्यक्त केली...
नोव्हेंबर 22, 2018
मालेगाव(नाशिक) : निमगाव, सोनज, सौंदाणे जिल्हा परिषद गटात पाऊसच झाला नाही. गेली तीन वर्षे दुष्काळाची तीव्रता गडद झाल्याने शेतकरी, कामगार संकटात सापडला आहे. खरीप-रब्बीचा प्रश्‍नच नाही. पाटावर ठेवायला दाणा नाही. आर्थिक चणचण असतांना पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. पशुधन जगवावे कसे असा प्रश्‍न आहे....
नोव्हेंबर 18, 2018
औरंगाबादः फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील गावामध्ये सध्या पक्षांतराचे वारे जोरात वाहू लागले आहेत. कॉंग्रेसचे निष्ठावंत समजले जाणारे अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी(ता.17) भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे हे सगळे पदाधिकारी कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांचे समर्थक असल्याचे बोलले जाते....
नोव्हेंबर 12, 2018
नागपूर - जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचा तालुका म्हणून काटोलची ओळख आहे.  राजकीय असो किंवा सांस्कृतिक काटोलने सर्वच बाबतीत आघाडी कायम ठेवली आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला अन्‌ यातही काटोलचा समावेश झाला. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत्रा बेल्टमधील काटोल तालुक्‍यात यंदाचे साल...
नोव्हेंबर 06, 2018
टाकळी हाजी : आनंदाचा सण दिवाळी...गोड-धोड खाऊ बरोबर खरेदीची लयलुट करायची दिवाळी. पण या वर्षी पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. त्यात शेतमालाला पडलेले बाजारभाव यामुळे शिरूर तालुक्यातील पश्चिम भागात आठवडे बाजारात खरेदीसाठी शुकशुकाट पहावयास मिळाला. ग्रामीण भागात आठवडे बाजारात नेहमीच...