एकूण 138 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
कोल्हापूर - बांबूच्या काड्या, बांबूचे पेर, त्याला आकर्षक नक्षीकाम व रंगलेपन करून विशिष्ट कोनात केली जाणारी बांधणी आणि त्यातून तयार होणारे रंगीबेरंगी आकाशकंदिल यंदाच्या दिवाळीत रोषणाई विलोभनीय करणार आहेत. त्यासाठी बांबूचे चोवीसपेक्षा जास्त आकाशकंदील बनविणाऱ्या कणेरकरनगर येथील संगीता वडे यांच्या...
ऑक्टोबर 07, 2019
नाशिक : दिवसेंदिवस सोशल मीडियाचा वापर वाढत असून फेसबुक, इंन्स्टाग्राम, व्हॉट्‌सअप हे तरुणांबरोबरच लहानांपासूनच मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच आवडीचे झाले आहेत. एकीकडे सोशल मिडीयाला व्यसन म्हणून पाहिले जात असतांना, या माध्यमाचा प्रभावी वापर करत नाशिकच्या अमृता पिंपळवाडकर या युवतीने आपल्या हस्तकलेतून...
ऑक्टोबर 06, 2019
औरंगाबाद : नवरात्रोत्सवामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे; परंतु दोन दिवसांवर आलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणावर मंदीचे सावट आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवरही दुकानांमध्ये अपेक्षित गर्दी नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, तरुणाई ऑनलाइन खरेदीवर भर देत असल्याने त्याचा फटकाही दुकानदारांना...
सप्टेंबर 09, 2019
 पिंपळगाव रेणुकाई (जि. जालना) -  मिरचीचे माहेरघर म्हणून सध्या भोकरदन तालुक्‍यातील पिंपळगाव रेणुकाई हे गाव नावारूपाला आले आहे. येथील बाजार समीतीच्या तीन एकर क्षेत्रावर दररोज दुपारी तीन वाजेपासून भरणाऱ्या या बाजारात चार तासांत सातशे टन मिरचीचा व्यवहार होत आहे. विशेष म्हणजे येथून दुबई, श्रीलंका,...
सप्टेंबर 05, 2019
कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या काळात सामान्य माणसाच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही, असे आदेश होते; पण दुर्दैवाने आजच्या राज्यकर्त्यांचे मन मुर्दाड झाले आहे, अशी खंत शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. महापुरासारखे संकट पुन्हा यायचे नसेल तर...
सप्टेंबर 04, 2019
मुंबई : राज्यातील फ्रूट वायनरी उद्योजकाला भरावा लागणार प्रती बल्क लिटर उत्पादनाला आता नाममात्र एक रुपयाचं उत्पादन शुल्क भरावे लागणार आहे. तसा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. जांभूळ, चिकू, केळी, बोरं, करवंद इत्यादी फळांसह काजूच्या बोंडापासून वाईन निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य...
सप्टेंबर 04, 2019
नागपूर: यू-ट्यूब, इन्स्टाग्राम हाताळणे तरुणाईच्या डाव्या हाताचा खेळ. समाज माध्यमांमध्ये तरुणांचेच वर्चस्व पाहायला मिळते. देशामध्ये सोशल मीडियाचे युजर्सदेखील मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे या विषयावरील प्रत्येक गोष्टीला तरुणाईने प्रतिसाद दिला नाही, तर नवलच. याचाच प्रत्यय जे. डी. कॉलेज ऑफ...
ऑगस्ट 30, 2019
चांदूररेल्वे (जि. अमरावती) : जुना बसस्थानकावर असलेल्या फळविक्रेते मेश्राम व कावरे कुटुंबाचा व्यवसायाच्या चढाओढीने नेहमी वाद होत होता. या वादाचे पर्यवसान फळविक्रेत्या ऋषिकेश मेश्राम यांचा शुक्रवारी (ता. 30) रात्री नऊच्या सुमारास खून झाला. दरम्यान, शुक्रवारी रात्री 9 वाजता मंगेश कावरे (वय 32) याने...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : एकीकडे वाहनविक्रीचा व्यवसाय मंदीच्या मार्गावर रडतखडत धावत असतानाच कुर्ल्यातील जुन्या गाड्यांच्या बाजारातही खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना उतरती कळा लागली आहे. एकेकाळी जुनी वाहने आणि गाड्यांच्या सुट्या भागांसाठी प्रसिद्ध असलेला परिसर सध्या मंदीचे चटके सोसत आहे. १९७० च्या दशकात सुरू झालेल्या...
जुलै 18, 2019
कोल्हापूर - "" प्रक्रिया केलेल्या शेतीमालावर सेस कर आकारू नये अशी मागणी शेती उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत धान्य व्यापाऱ्यांनी केली. यावेळी राज्य शासनाच्या मान्यतेनेच हा सेस वसुल करण्यात येणार आहे. तो रद्द करण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाकडेच पाठपुरावा करावा, असे सांगत संचालक...
जुलै 12, 2019
मुंबई - महात्मा फुले मंडईत अनेक वर्षे मासेविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या किमान सहाशे मच्छीमार महिलांना ऐरोली नाक्‍यावर जाण्याचा आदेश महापालिकेने दिला असून त्यामुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. महिला विक्रेत्यांना महापालिकेतर्फे नुकत्याच त्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत; मात्र काहीही झाले तरी...
जुलै 01, 2019
येवला : हातात हिरवागार चुडा,भाळी चंद्रकोर टिकली,काणात देखणे कर्णफुले, आणि नाकात भरदरी नथ सोबत गळ्यात राणीहार अन टूशी आणि अंगावर ऐश्वर्यसंपन्न येवल्याचे महावस्त्र...ही आभूषण परिधान करणारी स्री शंभर जणीत उठून दिसतेच अन तिला आपल्या सौंदर्याचा नक्कीच हेवा वाटतो...स्त्रीचं सौंदर्य खुलवणाऱ्या या ...
मे 06, 2019
सिंधुदुर्गात यंदा देवगड हापूसचा हंगाम चढ-उताराचा ठरला. पहिल्या टप्प्यात हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट होते. आता बाजारपेठेत हापूसची आवक वाढू लागली आहे. सध्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आहे. तो बाजारपेठेत दाखल होऊ लागताच दरही खाली येण्याची शक्‍यता आहे. मात्र, सर्व आंबा योग्य प्रकारे विकला गेल्यास...
मे 05, 2019
आटपाडी (सांगली) : या गावात मोठ्या प्रमाणात बाजार भरत असूनही सांगलीत केवळ दुष्काळी म्हणून हे गाव आता राहीले आहे. येथे 'सकाळ'च्या टीमने 'लढा दुष्काळाशी' या फेसबुक लाईव्ह निमित्त स्थानिकांशी केलेल्या संवादातून चामड्याचा व्यवसाय अडचणीत आला असल्याचे कळले. हा व्यवसाय नेमका कशामुळे अडचणीत आला आहे याविषयी...
एप्रिल 30, 2019
संगमेश्‍वर - गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी काजू बियांचे उत्पादन निम्म्याहून कमी असताना दर मात्र वाढीव मिळण्याऐवजी किलोला 110 रुपये एवढा दर घसरल्याने उत्पादक चांगलेच अडचणीत आले आहेत. ब्राझील आणि इस्राईलमधून काजू बियांची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने कोकणात यावर्षी काजू बीचे उत्पादन घटूनही दर गडगडले...
एप्रिल 20, 2019
शेअर बायबॅक म्हणजेच कंपनीकडून केली जाणारी शेअरची पुनर्खरेदी होय. कंपनी आपल्या गुंतवणूकदारांकडून बाजारात उपलब्ध असलेल्या शेअरच्या किंमतीपेक्षा अधिक किंमत देऊन शेअर खरेदी करते.शेअर बायबॅक करण्यामागे कंपनीची वेगवेगळी करणे असू शकतात, जसे की भागधारकांना त्यांचे पैसे (लोकांकडून उभारलेले भाग-भांडवल) परत...
मार्च 30, 2019
मुंबई: शेअर बाजारात सध्या दोन आयपीओसाठी अर्ज करता येणार आहेत.  कसे आहेत रेल विकास निगम लिमिटेड आणि मेट्रोपोलिस हेल्थकेअरचे आयपीओ: याबाबत सांगत आहेत तज्ज्ञ नंदिनी वैद्य  रेल विकास निगम लिमिटेड:  रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून...
मार्च 14, 2019
विटा - येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दर सोमवारी भरणारा बैलांचा बाजार संपुष्टात आला आहे. बैलांच्या शर्यतींवर असणारी बंदी व यांत्रिकीकरणामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. चारा, पाणी टंचाईमुळे दुभत्या म्हशींच्या खरेदी - विक्रीवर परिणाम होऊ लागला आहे. बाजारात एक  ते दोन म्हशींची खरेदी - विक्री...
मार्च 12, 2019
मंगळवेढा - तालुक्याच्या राजकारणामध्ये अलीकडच्या काळात राजकारण करताना महिलांना जनतेने पाठबळ दिल्यामुळे राजकारणामध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे शहर व तालुक्याचा नावलौकिक वाढत असल्याचे प्रतिपादन समाज कल्याण सभापती शीलाताई शिवशरण यांनी व्यक्त केले. मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघाच्या...
मार्च 06, 2019
बँकॉकः थायलंडमधील एका अरबपती उद्योगपतीने त्यांच्या मुलीच्या विवाहासाठी स्वयंवराचे आजोयन केले आहे. स्वयंवरादरम्यान एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विजेत्यासोबत मुलीचा विवाह लावला जाईल. शिवाय, काही कोटी रुपयांबरोबरच व्यवसायही मिळणार आहे. मात्र, यासाठी काही अटी आहेत. थायलंडचे प्रसिद्ध...