एकूण 120 परिणाम
जून 10, 2019
सोलापूर : 'राजकारणात दिलेले शब्द पाळले जात नाहीत, याचा अनुभव मला आज आला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीबाबत जे ठरले होते ते झाले नाही. बाजार समितीत आम्ही मिळून आहोत परंतु कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्‍याच्या हिताचा निर्णय पुढील काळात घेऊ,' अशी...
मे 21, 2019
मोहोळ (जि. सोलापूर) - ऐन दुष्काळी परिस्थितीमध्ये स्वतःच्या शेतातील ऊस, कडवळ ही पिके पाण्याविना जळत असूनही कोन्हेरी (ता. मोहोळ) येथील शेतकरी अण्णासाहेब विष्णू शेटे यांनी गावकऱ्यांसाठी दररोज 75 हजार लिटर पाणी उपलब्ध करून दिले आहे. गावकरी व जनावरांबरोबरच गावातील विवाह सोहळ्यासाठीदेखील शेटे पाणी...
मे 06, 2019
सिंधुदुर्गात यंदा देवगड हापूसचा हंगाम चढ-उताराचा ठरला. पहिल्या टप्प्यात हंगामावर अनिश्‍चिततेचे सावट होते. आता बाजारपेठेत हापूसची आवक वाढू लागली आहे. सध्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आहे. तो बाजारपेठेत दाखल होऊ लागताच दरही खाली येण्याची शक्‍यता आहे. मात्र, सर्व आंबा योग्य प्रकारे विकला गेल्यास...
एप्रिल 12, 2019
नाशिकला प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये नाशिक - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १०) वांग्याची आवक १५५ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल १२०० ते ३००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २२०० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. ९) वांग्याची आवक १२६...
मार्च 15, 2019
अकोल्यात प्रतिक्विंटल  २००० ते २७५० रुपये अकोला  - स्थानिक जनता भाजी बाजारात टोमॅटोचे दर प्रतिक्रेट ४०० ते ५५० रुपयांपर्यंत पोचले आहेत. २० किलो वजनाच्या एका क्रेटचे हे दर आहेत. येथील बाजारात टोमॅटोची दररोज ७०० ते ८०० क्रेट आवक होत आहे. बाजारात येणारा माल दररोज विक्री होत असल्याने व आवक कमी...
फेब्रुवारी 28, 2019
कोल्हापूर - गतवर्षाच्या अखेरीस कांद्याचे दर घसरल्याने उत्पादक शेतकऱ्याला रुपया किलोने कांदा विकण्याची वेळ आली होती. या शेतकऱ्यांना मदत म्हणून क्‍विंटलला २०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार सरकारकडून हे अनुदान बुधवारी (ता. २७) संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले. अनुदानाची ही...
फेब्रुवारी 23, 2019
सोलापूर - महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने राज्यातील बाजार समित्यांसाठी देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा आज मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी सोलापुरात केली.  शेतमाल तारण योजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल ‘अ’ वर्गातील बाजार समित्यांमधून धामणगाव रेल्वे (जि. अमरावती), ‘ब’ वर्गातील...
जानेवारी 26, 2019
सोलापूर : कांदा अनुदानासाठी संबंधित शेतकऱ्यांच्या अर्जांची पडताळणी लेखापरीक्षकांकडून करण्यात येत असून त्यानंतर तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय समितीद्वारेही तपासणी केली जात आहे. या निकषांच्या चाळणीत पावणेदोन लाख प्राप्त अर्जांपैकी 83 हजार शेतकरीच पात्र ठरल्याचे पणन विभागाकडून सांगण्यात आले. दुसरीकडे 1...
जानेवारी 25, 2019
सोलापुरात प्रतिक्विंटल ४५०० रुपये सोलापूर  - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडीला चांगली मागणी राहिली. भेंडीला प्रतिक्विंटल सर्वाधिक ४५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.  बाजार समितीच्या आवारात या सप्ताहात भेंडीची आवक रोज ७ ते १०...
जानेवारी 25, 2019
सोलापूर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी अक्कलकोटचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्यासह दक्षिणमधील नेत्यांवर सोपवून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी "मास्टर स्ट्रोक' मारला आहे. ही जबाबदारी सोपविण्यामागे भविष्यातील बदलाची नांदी ठरणारे "डावपेच' असल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...
जानेवारी 12, 2019
सलगर बुद्रुक (सोलापूर) - गेल्या वर्षी डाळींब पिकासाठी भरलेल्या हवामान आधारीत प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या याद्या मंजूर रकमेसहित तीन दिवसापासून व्हाट्सएपच्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल झाल्या आहेत. डाळींब पिकासाठी हेक्टरी ६५ हजार पाचशे रुपये विमा मंजूर असल्याचे त्या...
जानेवारी 02, 2019
भवानीनगर - काझड (ता. इंदापूर) येथील मनोहर जाधव या शेतकऱ्याला कांद्याच्या दराने रडवले असतानाच आडत्यानेही हिसका दाखवला. चार टन कांद्याची १४ हजारांची पट्टीच त्याने दिली नाही. धनादेशही बनावट दिल्याने सदर शेतकरी घायकुतीला आला आहे.  जाधव यांनी सोलापूर येथील सिद्धेश्‍वर मार्केटमध्ये २६ ऑक्‍टोबर रोजी कांदा...
डिसेंबर 22, 2018
इंदापूर - उजनी धरणग्रस्तांचे ४० वर्षांपासून प्रलंबित प्रश्‍न सरकारने न सोडविल्यास २६ जानेवारी रोजी धरणासाठी त्याग केलेले भूमिपुत्र गावागावात जलबुडी आंदोलन करतील, असा इशारा धरणग्रस्तांचे नेते तुकाराम सरडे, उजनी धरण बचाव संघर्ष समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष लक्ष्मण धनवडे यांनी दिला.  विविध...
डिसेंबर 08, 2018
सोलापूर रस्ता : सोलापूर रस्त्यावर मंत्री मार्केट समोर नेहमी सात-आठ रिक्षा रस्त्यावरच उभ्या केलेल्या असतात. मार्केट आणि भाजी मंडईमध्ये जाण्यासाठी येथे गर्दी असते. ज्येष्ठ नागरिक, शाळेची मुले यांना कसरत करत चालावे लागते. हाकेच्या अंतरावर पोलीस उभे असतात तरीही दुर्लक्ष करतात. वाहने उलट बाजूने जात...
डिसेंबर 06, 2018
सोलापूर - मागील चार-पाच महिन्यांच्या तुलनेत बाजारात टोमॅटोची आवक आलेली नाही. आवक कमी असल्यास भाव वाढतात. मात्र, टोमॅटोची आवक कमी झाली असतानाही दर नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा सोलापूर बाजार समितीमध्ये जुलै महिन्यापासून टोमॅटोला दरच...
डिसेंबर 03, 2018
सोलापूर - यंदा दुष्काळी स्थिती असतानाही कांद्याला भाव नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २९ नोव्हेंबरला एका शेतकऱ्याने ५३ पोती कांदा विकला. त्याचे वजन दोन हजार ४०५ किलो झाले. एवढ्या वजनाचा कांदा विकूनही त्या शेतकऱ्यांला संबंधित अडत्याला पदरचे ३४३...
नोव्हेंबर 28, 2018
सोलापूर - कमी कालावधीचे पीक म्हणून कांदा केला... सध्या चांगला भाव नसल्याने खर्चसुद्धा निघेना... शेतात तरी किती दिवस ठेवायचा. अक्षरश: जागेवर नासू लागलाय... दुष्काळातही कांद्याला योग्य भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी कसं जगायचं...अशी व्यथा माळकवठा (ता. दक्षिण सोलापूर) येथील शोभा पाटील यांनी व्यक्त केली...
नोव्हेंबर 18, 2018
सोलापूर : ज्या बाजार समित्यांमध्ये तीन राज्यांतून शेतमालाची आवक 30 टक्के होते त्या बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांचा राष्ट्रीय बाजार घोषित करण्याच्या हालचाली राज्याच्या पणन विभागाच्या वतीने सुरू आहेत. सोलापूर बाजार समितीचाही राष्ट्रीय बाजार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून या...
नोव्हेंबर 13, 2018
करमाळा : सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्याचे राजकारण नेहमीच वेगवेगळ्या विषयाने चर्चेत राहिले आहे. गेल्या महिन्यात बाजार समिती सभापती निवडीवेळी झालेल्या हल्ला प्रकरणानंतर अधिकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर बाजार समितीचे संचालक संतोष वारे यांच्यावर झालेला हल्ला यामुळे पुन्हा त्यात भर पडली आहे. सभापती...
नोव्हेंबर 12, 2018
कळस - रुई (ता. इंदापूर) येथील बाबीर यात्रेमध्ये हक्काची बाजारपेठ असलेल्या घोंगडी विक्रेत्यांनी यंदाही हजेरी लावली. यात्रेतील घोंगडी विक्रेत्यांच्या पेठेमध्ये स्थानिकांबरोबर विविध ठिकाणांहून यंदा शंभराहून अधिक विक्रेते दाखल झाले होते. यात्रा काळात सुमारे सात हजारांहून अधिक घोंगडी नगांची विक्री झाली...