एकूण 14 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
पुणे: एनडीए रस्ता येथील गणपती माथा ते शिंदे पूल रस्त्याच्या दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अनेक फळवाले, भाजीवाले थांबतात. रात्री जाताना उरलेला खराब भाजीपाला आणि फळांची टरफले तसच ईतर कचरा तिथेच रस्त्याच्या बाजूला टाकून देतात. त्यामुळे पावसाच्या प्रवाहाचे पाणी तिथे अडून डबके तयार होतात....
सप्टेंबर 24, 2019
पुणे : न्यू टिंबर मार्केट येथील महात्मा जोतिराव समता प्रतिष्ठानच्या कार्यालया समोरील ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांचे संपर्क कार्यालय आहे. या रस्त्यावर धोकादायक खड्डा पडला होता. अशी बातमी "सकाळ संवाद'मध्ये प्रसिद्ध होताच महापालिकेने याची त्वरित दखल घेतली व खड्डा बुजवला. याबाबत "सकाळ' व...
ऑगस्ट 20, 2019
पुणे : श्रावण सुरू झाला की सणवार सुरू होतात. नुकतीच नागपंचमी झाली आणि आता वेध अवघ्या काही दिवसांवर आलेल्या लाडक्‍या गणरायाच्या आगमनाचे. आंबेगाव खुर्द येथे गणपतींच्या मूर्तींचे आगमन झाले आहे. जांभूळवाडी रस्त्यावर समर्थ सदन, मोडक वस्ती, लिपाणे वस्ती येथे मूर्त्यांचे स्टॉल लावण्यात आले आहे. दगडूशेठ,...
जुलै 03, 2019
पुणे : हडपसर भाजी मंडई चौकात उड्डाणपुलाखालील रस्त्यावर बॅरिकेड् लावले आहेत. त्यामुळे ससाणेनगरकडून येणाऱ्या लोकांना ती जागा कमी पडते आणि वाहतूक कोंडी होते. त्या रिक्षा प्रवाश्यांसाठी चौकातच उभ्या असतात. तसेच पुलाखाली रिक्षावाले बॅरिकेड्च्या सुद्धा बाहेर रिक्षा उभा करतात. त्यांना काही बोलले तर,...
जून 27, 2019
पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभागात किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली अनधिकृतपणे वाढीव बांधकामे सुरू झाली आहेत. बाजार समिती प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील अर्थपूर्ण संबंधांमुळे अशा अनधिकृत बांधकामांना पाठबळ मिळत असल्याची चर्चा सध्या बाजार घटकांमध्ये सुरू आहे.  मार्केट यार्डात गूळ-भुसार...
एप्रिल 27, 2019
पुणे : सनसिटी भाजी मंडई येथील ड्रेनेज लाइनची कामे चालू असताना रस्त्याच्या मधोमध वाळू दगड पसरले होते. ही बातमी सकाळने दिल्यावर त्याचा परिणाम होऊन तेथे रस्त्याची सुधारणा केल्याबद्दल सकाळ व संबधितांचे आभार.   #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे :  शेतकरी आठवडे बाजार अभियाना अंतर्गत आंबेगांव खुर्द मध्ये जांभुळवाडी रस्त्यावर जनतेच्या सोयीसाठी आठवडे बाजार सुरु झाला. आता प्रत्येक गुरुवारी मोठ्या प्रमाणात आठवडे बाजार भरु लागला आहे. याचा फायदा या भागातील लिपाणे वस्ती, मोडक वस्ती, पवार तालीम, दळवी वस्ती, विठ्ठलनगर, सिद्धिविनायक आणि विवा...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : हडपसर भाजी बाजार चौकात बेशिस्तपणे वाहतुक सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर उलट दिशेने वाहनांची ये-जा सुरु असते. हे नेहमीचे चित्र आहे. लाल सिग्नल असेल तरी वाहने न थांबता वेगाने जातात. त्यातच चौकात रिक्षा दुतर्फा उभ्या असतात. वेशीच्या कमानीतील अरुंद जागेतून दुतर्फा वाहने जातात. त्यातून चालणे अत्यंत...
जानेवारी 20, 2019
वारजे : येथील श्रीराम सोसायटी-नादब्रह्म सोसायटी परिसरात, स्थानिक नगरसेवकाने सोसायटीच्या जवळ 400 मीटर लांबीची "खाजगी भिंत" दुतर्फा रंगवली आहे. शहर सुशोभीकरणाच्या नावाखाली भिंत रंगवून स्वत:चे मार्केटिंग सुरु केले आहे. जनतेचा पैशाचा असा स्वतःच्या मार्केटिंगसाठी उपयोग कितपत योग्य आहे ?    
डिसेंबर 08, 2018
सोलापूर रस्ता : सोलापूर रस्त्यावर मंत्री मार्केट समोर नेहमी सात-आठ रिक्षा रस्त्यावरच उभ्या केलेल्या असतात. मार्केट आणि भाजी मंडईमध्ये जाण्यासाठी येथे गर्दी असते. ज्येष्ठ नागरिक, शाळेची मुले यांना कसरत करत चालावे लागते. हाकेच्या अंतरावर पोलीस उभे असतात तरीही दुर्लक्ष करतात. वाहने उलट बाजूने जात...
ऑगस्ट 20, 2018
गुलटेकडी मार्केट :  येथे दररोज सर्व सामान्य लोकांकडून पार्किंगच्या नावाने प्रत्येकी गाडी मागे 5 रूपये घेतले जातात. गाडी लावायची सोय पण चिखलाने खच भरलेल्या जागेत केली आहे. परिणामी गाड्या घसरतात. दुसरीकडे कुठे गाडी लावली की 238 रूपयेची दंड आकारला जातो. याकडे मार्केटयार्ड कमिटी लक्ष घालावे.  
जून 16, 2018
पुणे : मार्केटयार्ड परिसरातील कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. कचरा प्रदूषण रोगाराई पसरण्यास कारणीभूत ठरते आहे.  मलेरियाची साथ पसरु शकते. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. 
जून 12, 2018
पुणे : मंडईतील नहेरु चौक ते गोविंद हलवाई चौकामध्ये दररोज ट्राफिक जाम होते. या चौकामध्ये भाजीवाले, गाडीवाले व मोटर टेम्पो थांबतात. त्यामुळे रस्त्याच्या बाजूने पायी चालणाऱ्या लोकांना कसरत करावी लागते. याकडे पुणे कॉर्पोरेशनने व ट्राफिक विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.    
जून 05, 2018
स्पर्धा परीक्षेचं खूळ डोक्यात घेऊन कलेक्टर होण्याची स्वप्नं पाहत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तरुण मुलंमुली पुण्यात येतात. ऐन विशीच्या वयात येतात आणि इथे दहा-दहा वर्ष राहतात. आज यांची संख्या काही हजारात असेल. ही युवा पिढी शनिवार पेठ, सदाशिव पेठ, नवी पेठ येथे कॉट बेसिसवर जुन्या वाड्यात, ढेकणांच्या...