एकूण 113 परिणाम
जून 09, 2019
"गुगल अर्थ'चा वापर फक्त घरच्या घरी बसून जगभर सैर करणं किंवा रस्ते शोधणं इथपर्यंत न राहता पृथ्वीवर कसकसे बदल होत आहेत ते बघण्यासाठीही होत आहे. एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स देणारं "गुगल अर्थ' भविष्यात अजून काय करणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे! सन 2001 मध्ये "गुगल अर्थ' नावाचं एक सॉफ्टवेअर घेऊन...
जून 02, 2019
"गुगल स्ट्रीट व्ह्यू'साठी बहुतांश सगळं छायाचित्रण मोटारगाडीवर बसवलेल्या कॅमेऱ्यांतून होत असलं तरी त्यात ट्रेक करणारे ट्रेकर्स, जॉगर्स, सायकलस्वार, बोटी, पाण्याखाली चालणारे कॅमेरे आणि इतर उपकरणं आणि चक्क उंट या सगळ्यांचाही उपयोग करून घेण्यात आला आहे! जगभ्रमण करण्याची हौस अनेकांना असते. काहींना तसं...
मे 30, 2019
नवी दिल्लीः 'आयआरसीटीसीच्या तिकिट बुकिंग ऍपवर वारंवार अश्लील जाहिराती समोर येत असतात, हे खूप लाजिरवाणं आणि त्रासदायकही आहे’, अशी तक्रार आनंद कुमार नावाच्या एका ट्विटर युजरने केली. अश्लील जाहिराती नको असतील तर तुमच्या इंटरनेट ब्राउजरमधील सर्व कुकिज आणि हिस्ट्री आधी डिलिट करा’, असं उत्तर आयआरसीटीसीने...
मे 11, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.  दिवसभरातील घडामोडी वाचा खाली दिलेल्या लिंकवर... ModiWithSakal : निवडणुकांमध्ये गडबड करण्यासाठी इम्रान खान यांची गुगली : मोदी...
मे 09, 2019
पुणे - मोबाईल व लॅपटॉपवर तासन्‌तास खोट्या-खोट्या गोष्टींमध्ये अडकून बसण्यापेक्षा उपग्रहांच्या मदतीने आपल्या खऱ्याखुऱ्या जगाची सफर करण्यातील मजा अनुभवायची आहे का? ही गंमत अमेय गोडे या तरुणामुळे अनेक मुलांना यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत कळली आहे.  अमेयदादा लॅपटॉपवरून पृथ्वीची सफर घडवत होता. त्यानं...
मे 07, 2019
एखादी मराठमोळी अभिनेत्री सहसा बोल्ड समजल्या जाणाऱ्या वेब सिरिजच्या पॅटर्नमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे म्हटल्यावर आपल्या भोवया जरा उंचावल्याच. त्यात ती अभिनेत्री होती प्रिया बापट. तिची पहिलीवहिली हिंदी भाषिक वेब सीरिज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  'हॉटस्टार'वरील ही...
एप्रिल 22, 2019
नवी दिल्ली -  जगभरात 22 एप्रिल वसुंधरा दिन. यानिमित्त गुगलने आज खास डूडल केले आहे. गुगलने एक ऍनिमेटेड डुडल केले आहे.  या डुडलवर क्लिक केले असता एक व्हिडिओ प्ले होतो. यामध्ये पृथ्वी दाखविण्यात आली असून, तिचे सौंदर्य दाखविण्यात आले आहे. या गुगल डुडलमध्ये पृथ्वीवरील आश्चर्य म्हणता येतील असे जीव,...
एप्रिल 21, 2019
गुगलच्या ऑफिसमध्ये एका ठिकाणी कीहोल, व्हेअर 2 आणि झिप्डॅशच्या लोकांना बसवण्यात आलं आणि त्यांना मॅप्सचं "गुगल व्हर्जन' बनवण्याचं काम देण्यात आलं. यानंतर मग ही मंडळी गुगल मॅप्सवर काम करायला लागली. गुगल मॅप्स लोकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर जवळपास एक वर्षभर लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही; पण...
एप्रिल 16, 2019
नवी दिल्ली : काही सेकंदांचे व्हिडीओ बनवून सोशल मिडीयावर तरुणाईला वेड लावणाऱ्या टिक-टॉक अॅपवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. या आदेशामुळे आता टिकटॉक अॅप डाऊनलोड करता येणार नाही. मात्र, ज्यांनी हा अॅप डाऊनलोड केला आहे त्यांना तो नेहमीप्रमाणे वापरता येणार आहे. सरकारच्या आदेशानुसार गुगल...
एप्रिल 11, 2019
नवी दिल्ली - लोकसभेच्या पहिल्या ट्प्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली. यानिमित्त गुगलने खास डूडल केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन या तरुणांसह सर्वच मतदारांना डूडलद्वारे करण्यात आले आहे. यासाठी गुगलने बोटावर शाई लावल्याचे चित्र असेलेल डूडल केले आहे.  या डूडलवर क्लिक केले असता,...
एप्रिल 11, 2019
नाशिक - मोबाईल रिचार्ज करण्यासाठी रवींद्र विष्णू भंदुरे (रा. लक्ष्मी फार्म, सातपूर) यांनी "गुगल पे' या ऍपमधून आर्थिक व्यवहार केला असता, त्यांच्या बॅंक खात्यातून तब्बल 91 हजार 107 रुपयांची रक्कम गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंदुरे यांनी मोबाईल...
एप्रिल 04, 2019
'घर से निकलते ही.. कुछ दूर चलते ही.. रस्ते में है उसका घर..' या गाजलेल्या गाण्यात दिसलेल्या अभिनेत्रीने बॉलिवूडमधून संन्यास घेतला होता. पण सध्या ही अभिनेत्री गुगल इंडियाची इंडस्ट्री हेड बनली आहे! 'पापा कहते है' या चित्रपटात जुगल हंसराज सोबत दिसलेली मयुरी कांगो हे नाव चित्रपटाच्या दुनियेत जरी चमकले...
एप्रिल 01, 2019
नवी दिल्ली : सध्या मोबाईलवरच्या अनेक गेम्सची क्रेझ येत असते. परंतु, एकेकाळी मोबाईलवरचा सर्वात लोकप्रिय गेम म्हणजे 'स्नेक' गेम. आज (सोमवार) गुगल मॅप्समध्ये क्लासिक स्नेक गेमचा समावेश करण्यात आला आहे. ऍपवर हा गेम फक्त थोड्याच दिवसांसाठीच समाविष्ट करण्यात आला आहे. मॅप्स ऍपवर जाऊन हा गेम खेळता येणार...
मार्च 27, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) - सोशल मिडियाचा योग्य वापर केला तर त्याचे खुप फायदे आहेत. याचे ताजे उदाहरण माढा शहरात पहायला मिळाले. सचिन हनुमंत साठे (रा.माढा) याला माढा तहसीलच्या आवारात पैशाचे पाकीट सापडले होते. सोशल मिडियाच्या आधारे त्याने संबंधित व्यक्तीचा शोध घेतला आणि हे पैशांचा पाकिट त्याला परत केले...
मार्च 23, 2019
पिंपरी - आरटीई प्रवेशांतर्गत ऑनलाइन फॉर्म भरताना ‘गुगल’वर घराचा पत्ता चुकीचा दर्शविला जात असल्याने पालकांनी अर्ज ‘कन्फर्म’ करताना पत्ता योग्य असल्याची खात्री पालकांनी करावी. अन्यथा पाल्यांना प्रवेश मिळण्यास अडसर निर्माण होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्जामध्ये...
मार्च 21, 2019
गुगल या कंपनीने काही दिवसांपूर्वी त्यांचे Inbox हे ई-मेल अॅप बंद होणार असल्याचे जाहीर केले होते. आज (ता. 21) त्यांनी हे अॅप 2 एप्रिल बंद होणार असल्याचे घोषित केले आहे. हे अॅप वापरणाऱ्या युजर्सना Inbox कडून नोटीस पाठवण्यात आली आहे की, हे अॅप पुढील 15 दिवसात बंद केले जाईल.  Inbox या अॅपसोबतच गुगलचे...
मार्च 21, 2019
ब्रसेल्स: युरोपियन युनियनने प्रतिस्पर्धा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकी कंपनी गुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा  दंड ठोठावला आहे. ऑनलाइन सर्च जाहिरातीमध्ये स्पर्धक कंपन्यांच्या जाहिराती ब्लॉक करत असल्याची माहिती युरोपियन स्पर्धा आयोगाच्या आयुक्त मारग्रेथ व्हेस्टेगर यांनी पत्रकार परिषदेत  ...
मार्च 19, 2019
नवी दिल्ली - काही महिन्यांपूर्वी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून व्हायरस पसरवणारे 22 ऍप हटवले होते. त्यानंतर आता प्ले स्टोअरवरून 200 गेम्स हटवण्यात आले आहेत. अनेक मोबाईल ऍपमध्ये मालवेअर आणि अ‍ॅडवेयर असल्याची माहिती मिळत आहे. 15 कोटींहून अधिक युजर्सनी हे ऍप गुगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड होते.  सिमबॅड (...
मार्च 13, 2019
कॅलिफोर्निया - सोशल नेटवर्किंगवर #GoogleDown हा हॅशटॅग वापरून अवेक जण गुगलची तक्रार करत आहे. कारण जगप्रसिद्ध गुगल कंपनीच्या युझर्सला आज सकाळपासून गुगलच्या सेवा वापरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. गुगल ड्राइव्ह, जीमेल आणि गुगल मॅप्स या सेवांवर परिणाम झाल्याचे युझर्सचे म्हणणे आहे. भारतात अशा समस्या...
फेब्रुवारी 27, 2019
औरंगाबाद - भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या बालाकोटमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्‌ध्वस्त केल्यानंतर मंगळवारी (ता. 26) 'भारतीय वायुदल' आणि 'बालाकोट' हे शब्द दिवसभर गुगल सर्चच्या ट्रेंडमध्ये अग्रस्थानी राहिले. मंगळवारी "बालाकोट' या नावाने सर्वाधिक पाकिस्तानमधून आणि त्याखालोखाल भारतातून सर्च झाले. देशाचा...