एकूण 298 परिणाम
ऑक्टोबर 12, 2019
नवी दिल्ली : आज (ता. 12) गुगलने एक खास डुडल तयार केलं आहे. बंगाली समाजसुधारक कामिनी रॉय यांच्या जयंतीमिनित्त हे डुडल बनविण्यात आले आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतात समाजसेवक व समाजसुधारक म्हणून कामिनी रॉय यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्या सामाजिक कार्यकर्त्या, समाजसुधारक, उत्तम कवयित्री व स्त्रीवादी...
ऑक्टोबर 09, 2019
सरकारी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड झालीये. कारण केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यात 5 टक्क्यांची वाढ केलीये. याचा फायदा 50 लाख सरकारी कर्मचारी त्याचबरोबर 65 लाख पेन्शन धारक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्रात तब्बल सात ते आठ लाख केंद्रीय कर्मचारी असल्याने याचा फायदा...
ऑक्टोबर 08, 2019
विजयादशमीच्या मुहूर्तावर भारताला पाहिलं राफेल विमान मिळणार आहे. फ्रान्सकडून पाहिलं राफेल फायटर जेट भारताला मिळणार आहे. या सोहळ्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह फ्रान्समध्ये दाखल झालेत. पॅरिसमध्ये हा हस्तांतरणाचा सोहळा पार पडणारे. राजनाथ सिंह राफेल फायटर जेटचं शस्त्रपूजन देखील करणार आहेत. 36...
ऑक्टोबर 08, 2019
जगातील सर्वात मोठा रावणाचा पुतळा चंदीगडमध्ये बनवण्यात आलाय. अगदी रामायणात वर्णन केल्याप्रमाणे दिसावा असंच रावणाचं रूप आहे.  या महाकाय रावणाच्या पुतळयाचं आज म्हणजेच विजयादशमीच्या मुहूर्तावर दहन केलं जाईल. या रावण दहनासाठी चंदीगडच्या धनास मैदानात जय्यत तयारी करण्यात आलीय. या रावणाची खासियत म्हणजे...
सप्टेंबर 27, 2019
कुपवाडा : काश्मीरच्या कुपवाडा सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर भारतीय लष्कराकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. त्यापार्श्वभूमीवर सुरक्षा दलाकडून परिसरात मोठा गोळीबार केला जात असून, पाकिस्तानी दहशतवादी पुन्हा पाकिस्तानाच्या दिशेने परतत आहे. कुपवाडा सेक्टरमध्ये आलेले...
सप्टेंबर 09, 2019
बेळगाब : कायम मोबाईमध्ये गेम खेळण्यात व्यस्त पाहणाऱ्या मुलाला समज दिल्याने व नवीन मोबाइल घेण्यास पैसे न दिल्याच्या रागातून रागाच्या भरात मुलाने वडिलांचा खून केला. मुलाने वडिलांचे शिर धडावेगळे केले. शंकऱ्याप्पा रेवप्पा कुंभार (६१, सिद्धेश्वर गल्ली, काकती) असे मृताचे नाव आहे. सोमवारी सकाळी सहाच्या...
सप्टेंबर 07, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आज (शनिवार) महिना पूर्ण झाला. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेनेही हा निर्णय स्वीकारण्यास तयारी दर्शविली. मात्र, शेजारील देश आणि शत्रू राष्ट्र पाकिस्तानचा मात्र चांगलाच जळफळाट झाला.  - ...
सप्टेंबर 06, 2019
लखनौ (उत्तर प्रदेश): एका दहा वर्षाच्या मुलाने मोबाईल गेम खेळत असताना वडीलांच्या बॅंक खात्यातून 35 हजार रुपये उडवले आहेत. मुलाच्या मोबाईल पराक्रमाने वडीलांना मात्र धक्का बसला आहे. पाचवीमध्ये शिकत असलेला मुलगा गेम खेळण्यासाठी वडीलांच्या मोबाईलचा वापर करत होता. नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी त्याने...
ऑगस्ट 31, 2019
नवी दिल्ली : पंजाबी लेखिका, कवयित्री अम्रिता प्रीतम यांना गुगलने डुडलद्वारे आदरांजली दिली आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुगलने खास डुडल करत त्यांना आदरांजली दिली आहे.  20व्या शतकातील सर्वोत्तम कवयित्रींमध्ये त्यांची गणना केली जाते. 1947मध्ये फाळणीच्या वेळी झालेल्या हत्याकांडावर आधारित 'आज...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली : गुगलने दहा वर्षापासून नावाच्या बाबतीत चालत आलेल्या परंपरेला शह दिला असून, अँड्रॉइड सिरीजची नावे बदलण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. 'अँड्रॉइड क्यू'चे नाव बदलून आता अँड्रॉइड 10 करण्यात येणार आहे. अँड्रॉइड 10चा नवीन लोगोदेखील लाँच करण्यात येणार असून वरच्या भागामध्ये अँड्रॉइडचा रोबोट...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्लीः जगभरात माहिती तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला जात असून, याच तंत्रज्ञानामुळे चार महिन्यानंतर हरवेली मुलगी घरी परतली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. मुलीला पाहिल्यानंतर कुटुंबियांना मोठा आनंद झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी एक 12 वर्षाची मुलगी रिक्षामध्ये बसण्यासाठी...
ऑगस्ट 18, 2019
नवी दिल्ली : मोदी सरकारने काश्मिरमधून 370 हे कलम हटविल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. पाककडून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध व्यासपीठांवर या विरोधात भूमिका मांडली जात आहे. पण प्रत्येक ठिकाणी पाकिस्तान तोंडघशी पडत आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत देखील इम्रान खानच्या हाती...
ऑगस्ट 17, 2019
नवी दिल्ली : दूरदर्शन वाहिनीवरील प्रसिद्ध निवेदिका (अँकर) नीलम शर्मा यांचे आज (शनिवार) निधन झाले. या बाबतचे वृत्त डीडी न्यूजच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध झाले होते. गेल्या काही वर्षांपासून त्यांना कर्करोगाने ग्रासले होते. नोएडा येथील एका हॉस्पिटलमध्ये त्या उपचार घेत होत्या. प्रकृतीमध्ये बिघाड...
ऑगस्ट 16, 2019
नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज पहिला स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त नवी दिल्लीतील सदैव अटल स्मृती स्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी वाजपेयींना...
ऑगस्ट 13, 2019
तिरुअमंतपुरम ः केरळमधील उत्तर भागातील पूरस्थिती हळूहळू सुधारत असून, जनजीवन सुरळीत होत आहे. मात्र मध्य केरळमध्ये अतिजोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करीत तीन जिल्ह्यांत मंगळवारी अतिदक्षतेचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे. राज्यातील पुरात बळी गेलेल्यांची संख्या 88 वर पोचली आहे. पाऊस...
ऑगस्ट 12, 2019
नवी दिल्ली : भारताला अंतराळात पोचविणारे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) संस्थापक विक्रम साराभाई यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त आज (सोमवार) गुगलने त्यांना सलाम करत डुडल केले आहे. 1969 मध्ये पं. जवाहरलाल नेहरू आणि विक्रम साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो)ची स्थापना केली...
ऑगस्ट 09, 2019
नवी दिल्ली : एनडीटीव्हीचे प्रमुख डॉ. प्रणव रॉय यांना मुंबई विमानतळावर परदेशी जाण्यापासून रोखण्यात आले होते. सीबीआयने त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. मुंबई विमानतळावर रॉय यांच्यासह त्यांच्या राधिका रॉय यांची चौकशी करण्यात आली तसेच, परदेशी जाण्यापासून त्यांना थाबवण्यात आले आहे. (...
ऑगस्ट 08, 2019
कराची : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. भारताबरोबर काल व्यापारी संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानने आता भारत-पाकमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान दोन्ही देशांमधील राजनैतिक...
ऑगस्ट 08, 2019
सुषमा स्वराज यांनी खास "सकाळ'साठी लिहिलेली व स्वतःच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून दिलेली कविता -  इन सुरों मे शब्द भर दो।  भाव का मकरंद भर दो ।  एक दिव्यानंद भर दो ।  इन सुरों मे शब्द भर दो ।।  शब्द जिनमें तथ्य हो  मेरे समूचे अनुभवोंका ।  शब्द जिनमें सत्य हो  मेरे सभी उन्ही कहेकशोंका ।  दर्द की...
ऑगस्ट 07, 2019
नवी दिल्ली - प्रखर वक्‍त्या व हजारो भारतीयांची विदेशातून मुक्तता करणाऱ्या प्रभावी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (वय 67) यांना आज देशाने साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. दिल्लीतील लोधी रोड स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत स्वराज यांच्यावर आज दुपारी चार वाजून चाळीस मिनीटानी अंत्यसंस्कार करण्यात आले....