एकूण 15 परिणाम
ऑगस्ट 10, 2019
‘नदीला पूर आलेला...’ हे गीत श्रवणीय आहे आणि कोणताही पूर हा बघायला रमणीयच असतो! मात्र, तो वेळच्या वेळी ओसरला नाही तर काय होते, ते आज पश्‍चिम महाराष्ट्र अनुभवत आहे. केवळ पश्‍चिम महाराष्ट्रच नव्हे, तर विदर्भावरही झालेली वरुणराजाची अवकृपा आठवडाभरानंतरही कायम आहे आणि या प्रलयात नद्यांनी धारण केलेल्या...
ऑगस्ट 10, 2019
#यूथटॉक मी  शाळेत असताना, ‘तुमचा आवडता छंद कोणता’ या प्रश्नाला ९९ टक्के वर्गाचं उत्तर असायचं, ‘वाचायला आवडतं.’ पुस्तकांनी भरलेली कपाटं, गर्दीनं गजबजलेली पुस्तक प्रदर्शनं हे दृश्‍य आजही दिसतं; पण लहानपणी ‘वाचायला आवडतं’ असं सांगणारा आजचा तरुण वर्ग या दृश्‍यात तितकासा आढळत नाही, ही काहीशी चिंतेची बाब...
ऑगस्ट 10, 2019
दबकत दबकतच आम्ही खोलीत शिरलो. खोलीत कोणीही नव्हते. डोळ्यांत बोट जाईल, असा काळामिट्ट अंधार मात्र होता. आम्ही अंगी सावधपण आणून मनाचा हिय्या करुन खोलीत पाऊल टाकले. सर्वत्र सामसूम होती. तेवढ्यात- ‘‘खबर्दार जर टांच मारुनी जाल पुढे चिंधड्या, उडवीन राईराईएवढ्या...,’’ ऐसी गर्जना कानावर पडून आम्ही...
ऑगस्ट 08, 2019
राजकारणाच्या क्षेत्रातही शालीनता जपता येते, हे दाखवून देणाऱ्या सुषमा स्वराज यांनी केंद्रातील मंत्रिपदे कार्यक्षमतेने भूषविली. विशेषतः परराष्ट्र खात्यात काम करताना त्यांनी एक मानदंडच उभा केला. सुषमा स्वराज यांनी आपल्या चार-साडेचार दशकांच्या प्रवासात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी तसेच जॉर्ज...
ऑगस्ट 08, 2019
बेटा : (घुश्‍शात एण्ट्री घेत) ढॅण टढॅण...ढॅण...ढॅण...ढॅण! मी आलोय!! मम्मामॅडम : (कागद हातावेगळे करताना दचकून) ओह!...ही काय एण्ट्री झाली? केवढी दचकले मी!! बेटा : (हाताची घडी घालून घुश्‍शात) हल्ली मी आवाज न करता कुठे गेलो, तरी लोक दचकतातच! मम्मामॅडम : (चष्मा उतरवून पुसत) हल्ली तुझा मूड नसतो चांगला!...
ऑगस्ट 08, 2019
‘हजारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकलें’ असे मिर्झा गालिबचे अजरामर शब्द. मोदी सरकारने त्यांच्या हजार स्वप्नांमध्ये शेती उत्पन्न द्विगुणित करण्याचा जो मनसुबा व्यक्त केला आहे, तो खरोखरीच दम काढणारा आहे. उत्पन्न द्विगुणित करण्यामध्ये सर्वांत मोठे आव्हान म्हणजे आपल्याकडील शेतीचे सरासरी...
ऑगस्ट 08, 2019
वडील आणि मुलगा यांच्यातील नात्यांचे वेगळे पदर मांडणारा ‘हिज फादर्स व्हॉईस’ हा चित्रपट इंग्रजीसह तब्बल दहा जागतिक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. ‘कावडी प्रॉडक्‍शन’ बॅनरच्या या चित्रपटाची निर्मिती अश्‍विनी प्रतापराव पवार यांनी केली आहे. कार्तिकेयन किरूभाकरन हे दिग्दर्शक व लेखक आहेत. जागतिक पातळीवरची...
जून 08, 2019
'नॉक नॉक सेलिब्रेटी' या नाटकाचा प्रयोग नाशिकमध्ये सुरू असताना एका प्रेक्षकाच्या मोबाईलची रिंग जोरात वाजल्याने कलाकारांसह अन्य प्रेक्षकांचाही रसभंग झाला. त्यामुळे नाटकातील प्रमुख कलाकार सुमीत राघवन यांनी प्रयोगच थांबविला. नाट्यगृहात मोबाईलच्या वापरामुळे कलाकार व प्रेक्षकांचा रसभंग होण्याच्या अशा...
जानेवारी 11, 2019
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक एक मित्र सोडून जात असताना, आता भारतीय जनता पक्षाने ज्या राज्यांत आपले बस्तान ठीक बसलेले नाही, तेथे फंदफितुरीचे राजकारण सुरू केले आहे. पश्‍चिम बंगालमध्ये अथक प्रयत्न करूनही वाट बिकटच असल्याचे दिसत असल्याने तेथील सत्तारूढ तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांवर जाळे फेकण्याचे काम...
नोव्हेंबर 20, 2018
काश्‍मीरप्रमाणेच पंजाबही पाकिस्तान; विशेषतः आयएसआयच्या रडारवर असल्याचे वास्तव कधी लपून राहिलेले नाही. कधी अमली पदार्थांच्या तस्करीमार्फत, तर कधी बनावट नोटा घुसवून या राज्यात अशांतता आणि अस्थिरता माजविण्याचा खटाटोप सुरू असतो. तरीदेखील तुलनेने गेल्या काही वर्षांत शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यात या...
नोव्हेंबर 20, 2018
काळाच्या ओघात काही गोष्टी हद्दपार करणे गरजेचे ठरते...एक किलोग्रॅम हे वजन मोजण्यासाठी जगभरात आतापर्यंत वापरात असलेली मापनपद्धती आता बदलण्यात येणार आहे. फ्रान्समधील व्हर्सेलस येथे वजन आणि मापांवर आधारित एका संमेलनात 50पेक्षा अधिक देशांनी एकत्र येऊन बदलाचा हा निर्णय घेतला. सध्या वापरात असलेले एक...
फेब्रुवारी 24, 2018
दिवाणखान्यात एक टीव्ही, सोफासेट आणि त्याचा सामुदायिक आस्वाद घेत असलेलं मध्यमवर्गीय कुटुंब हे चित्र जगातील बहुतांश देशांत अनेक वर्षं पाहायला मिळत होतं. पुढं कुटुंब ही संकल्पना हळूहळू बदलली, आर्थिक स्तर बदलले आणि घरातला एकमेव टीव्ही वैयक्तिक खासगीपण जपत एकाचा दोन झाला. संगणक, मोबाईल...
मार्च 27, 2017
सामान्यांना व्यक्‍त होण्याचं परिणामकारक साधन असं सोशल मीडियाचं कितीही कौतुक असू द्या; या माध्यमातही पैसा बोलतो, हेच शेवटी खरं. फेसबुक, व्हॉट्‌सऍप पोस्ट किंवा ट्‌विटस्‌ हा वरवर बोटांवरचा खेळ वाटला तरी अंतिमत: वरच्या स्तरावर अर्थकारणच निर्णायक असतं. तसंही विचारस्वातंत्र्य व अतिरेक यात एक पुसटशी रेष...
डिसेंबर 22, 2016
राजकारणात एकाच वेळी मित्राची भूमिका बजावणारा शत्रू आणि शत्रू असूनही सतत मदतीसाठी हात पुढे करणारा मित्र, या दोहोंनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच वेळी राजी केले आहे. ‘अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक व्हायलाच हवे; पण त्यास असलेल्या कोळी बांधवांच्या तीव्र नाराजीचाही विचार व्हायला हवा...
डिसेंबर 22, 2016
नोटाबंदीनंतरच्या परिस्थितीचे व्यवस्थापन काटेकोरपणे आणि संवेदनशीलतेने करणे अत्यावश्‍यक असतानाही त्याचा अभाव जाणवत असल्याने लोकांच्या त्रासात संभ्रमाची भर पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरला पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद ठरविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर रांगांमध्ये उभे...