एकूण 34 परिणाम
जुलै 12, 2019
मुंबई - राज्य सरकारच्या सेवेत गुणवत्तेच्या जोरावर नोकरी पटकावणाऱ्या अडीच हजारपेक्षा अधिक जणांना मराठा आरक्षणाच्या सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या ("एसईबीसी') तरतुदीचा फटका बसणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2015 मध्ये तात्पुरत्या स्वरूपात गुणवत्ता यादीनुसार सर्व वर्गांतील उमेदवारांना...
जुलै 08, 2019
मुंबई - राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (मराठा समाज घटक) वर्गाकरिता शिक्षण संस्थांमध्ये 12 टक्के आणि सरकारी सेवांत म्हणजे सरकारी नोकऱ्यांत 13 टक्के आरक्षण लागू करण्याच्या सुधारित विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे राज्यात मराठा समाजास आरक्षण लागू झाले आहे. नुकत्याच...
जुलै 06, 2019
नागपूर : मराठा समाजाच्या नोकरीतील आरक्षणाच्या टक्‍क्‍यात बदल करण्यात आल्याने सर्व विभागांना नव्याने बिंदुनामावली तयारी करावी लागणार आहे. यामुळे भरती प्रक्रियेवर परिणाम होणार असल्याचे बोलल्या जात आहे. परिणामी, सरकारी नोकरीसाठी युवकांना आणखी काही काळ वेळ पाहावी लागणार आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या...
मार्च 29, 2019
औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चातर्फे ऐतिहासिक मूकमोर्चे काढूनही मागण्या मान्य न झाल्याने समाजात संताप व्यक्‍त होत असतानाच आता प्रशासनाने यात सहभाग नोंदविलेल्या बाराशेवर कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. आंदोलनादरम्यान दाखल गुन्हे मागे घेण्याचे सरकारचे आश्‍वासन हवेतच राहिले आहे. दरम्यान, अशा...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सरकारी सेवा, शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशासाठी दहा टक्‍के आरक्षण देण्याबाबतचा शासननिर्णय सामान्य प्रशासन विभागाने मंगळवारी जारी केला. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांतील तरुणांना नोकऱ्या आणि शिक्षणात लाभ होणार आहे. मराठा समाजाला या...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाची "मराठा संवाद यात्रा' सोमवारी मुंबईत धडकणार  असल्याने पोलिस प्रशासनाने गावोगावी मराठा आंदोलकांचे थेट अटकसत्र सुरू केले. विधिमंडळावर आंदोलक धडकणार नाहीत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना रात्रीपासूनच पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरवात केली होती. दरम्यान, मराठा...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई - मराठा समाजाचे सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करून ते सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास असल्याच्या पाहणी अहवाल व पुराव्यांसह तयार झालेल्या अहवालावर मागासवर्गीय आयोगाने प्रथमच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मतदान न घेता एकमुखी शिफारशी मोहोर उमटविल्याने आयोगाच्या या अहवालाचे "वजन' वाढले...
नोव्हेंबर 03, 2018
कऱ्हाड : राज्य सरकार व निवडणूक आयोगाने मराठा समाजाच्या नावाने कोणत्याही राजकीय पक्षाची नोंदणी करू नये, अशी मागणी कऱ्हाड तालुका सकल मराठा समाजातर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांची सातारा येथे भेट घेवून मराठा क्रांती मोर्चातर्फे सकल मराठा बांधवांनी...
सप्टेंबर 08, 2018
वडवणी (जि. बीड) : मोर्चे, निदर्शने, रस्ता रोको, ठोक मोर्चा काढून प्रशासनासमोर तळ ठोकून असे एक ना अनेक प्रकराची आंदोलने केली. तरीही सरकार मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण भेटेपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा ठराव कुप्पा (ता. वडवणी) ग्रामस्थांनी घेतला आहे.'चुलीत गेलं...
ऑगस्ट 31, 2018
मुंबई - भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) तर राज्यातील मराठा अधिकाऱ्यांपेक्षाही मागासवर्गीय अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे. राज्यात कार्यरत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांपैकी २५ मराठा, तर मागासवर्गीय आयएएस अधिकाऱ्यांची संख्या ३६ आहे; तर १९९६ नंतर राज्यात मुख्य सचिव पदावर मराठा समाजाचा एकही अधिकारी नियुक्‍त...
ऑगस्ट 09, 2018
गडहिंग्लज - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. गडहिंग्लजकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कडकडीत बंद पाळण्यात आल्यामुळे दिवसभर व्यवहार ठप्प होते. केवळ अत्यावश्‍यक सेवा सुरु होत्या. ग्रामीण भागातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाला आरक्षण...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. सकल मराठा समाजातर्फे मराठा ठोक मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. दसरा...
ऑगस्ट 09, 2018
सांगली - मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांतीतर्फे संपूर्ण जिल्ह्यात आज कडकडीत मात्र शांततेत बंद ठेवण्यात आला आहे. व्यापार, व्यवसाय, औद्योगिक वसाहती, बहुतांश साखर कारखाने, बॅंका, सहकारी संस्था, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकसह सर्व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती. सांगली, मिरज,...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - ‘कोल्हापुरातील मराठा क्रांती ठोक मोर्चा सरकार पोलिसांवर दबाव आणून मोडून काढणार असेल, तर मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्याबाहेर पडू देणार नाही. आंदोलकांवर दबाव आणू नका. अन्यथा अनुचित प्रकार घडेल,’ असा इशारा सकल मराठा समाजातर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आला. मोर्चा स्थगित केल्याचा ‘मेसेज’...
ऑगस्ट 08, 2018
मुरूड (जि. लातूर)  : मराठा आरक्षणाच्या विवंचनेतून माटेफळ (ता. लातूर) येथील शिक्षक रमेश पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड होताच आरक्षणाच्या मागणीवर अगोदरच आंदोलनाच्या तयारीत असलेले ग्रामस्थ आणि युवक संतप्त झाले. येथील ग्रामीण रूग्णालयात रमेश पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (...
ऑगस्ट 08, 2018
कोल्हापूर - ‘मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह इतर प्रश्‍नांसाठी आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले असले, तरी त्यावर लगेच विश्‍वास बसणार नाही. म्हणूनच जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जाईल,’ असा रोखठोक इशारा श्रीमंत शाहू छत्रपती महाराज...
ऑगस्ट 07, 2018
सिंधुदुर्गनगरी - आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा, राज्य सरकार हाय-हाय अशा घोषणा देत आशा गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांनी आज ओरोस फाटा येथे मुंबई - गोवा महामार्ग रोखून धरत जेलभरो आंदोलन केले. पोलिस प्रशासनाच्यावतीने आंदोलक आशा कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली. आशा व गट...
ऑगस्ट 05, 2018
पुणे : ''आरक्षणाबाबत निर्णय होईल. मात्र, यासाठी आत्महत्या आणि तोडफोड यांसारखे प्रकार व्हायला नको. सोयींच्या राजकारणामुळे अनेक बळी गेले आहेत. लोकांनी रस्त्यावर यायला सरकार जबाबदार आहे. आरक्षणाबाबत सरकारचा वेळकाढूपणा आहे'', अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज (रविवार) सरकारवर टीकास्त्र सोडले....
ऑगस्ट 03, 2018
वाल्हेकरवाडी - पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवरून उड्या घेत आत्मबलिदान करण्याचा इशारा दिलेल्या मराठी मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न फसल्याने वाकड पोलिसानी गुरुवारी रात्री ११ वाजता शहरा बाहेर जाऊन भूमिगत होण्याच्या तयारीत असताना ९ आंदोलकांना रहाटणी येथून ताब्यात घेऊन...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई - मराठा समाज आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसक घटनांबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील परिस्थिती विदारक असून, पोलिसांवर दगडफेक होत आहे, हे चिंताजनक आहे, असे मत न्यायालयाने दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणांच्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केले.  ज्येष्ठ विचारवंत...