एकूण 1380 परिणाम
जून 14, 2019
कोल्हापूर - मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने जी जी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडली. पक्षाने प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास सांगितले, तर त्याची जबाबदारी स्वीकारू, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  ‘कृषी सन्मान भवन’ या प्रशासकीय इमारतीच्या...
जून 14, 2019
नागपूर : राज्य सरकारने वैद्यकीय व दंतवैद्यकच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास अवैध ठरविणाऱ्या आदेशाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने खारीज केली. आरक्षणासंदर्भातील कोणत्याही याचिका वा अर्जावर कोणतेही न्यायालय सुनावणी घेणार नाही असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता...
जून 11, 2019
कोल्हापूर - संसदेत कायदे केले जातात. सर्वोच्च न्यायालयापेक्षा संसद मोठी आहे. त्यामुळे ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही, अशी जरी न्यायालयाने भूमिका मांडली असली तरीही संसदेत दलित, आदिवासी व ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा, ब्राह्मण, जैन, धनगर आणि...
जून 10, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश कायम करण्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला. मात्र, सरकार मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे प्रवेश टिकविण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. सरकारच्या या भूमिकेविरोधात...
जून 07, 2019
नागपूर - मराठा समाजाचा ओबीसी जातीत समावेश करण्याची धडपड सुरू असताना मागासवर्ग आयोगाच्या शिफारशीवरून राज्य सरकारने चार जातींचा इतर मागासवर्ग (ओबीसी) व तर काहींचा भटक्‍या जमातीत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. कानोडी, कानडी, भावसार, घाँची, कुलवंतवाणी समाजातील पोटजातींचा ओबीसींमध्ये तर कुमावत, हरदास...
जून 03, 2019
मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय कुळाचे नसून त्यांचा जन्म क्षुद्र जातीमध्ये झाला आहे, असे वादग्रस्त ट्विट अभिनेत्री पायल रोहतगीने केले आहे. तिच्या या ट्विटनंतर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. पायलने ट्विटरवर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट करत हे वादग्रस्त विधान केले आहे. तिच्या या...
मे 21, 2019
मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरक्षित करण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशावर राज्यपाल विद्यासागर राव यांनी सोमवारी (ता. २०) स्वाक्षरी केली. त्यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचा ‘एसईबीसी’ कोट्यातून वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला...
मे 19, 2019
मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू नसल्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवावा, या मागणीसाठी, तसेच मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या अध्यादेशाविरोधात शनिवारी सकाळी खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी वांद्रे येथे आंदोलन केले. "आरक्षणाची टक्केवारी 50 हून अधिक नसावी...
मे 18, 2019
मुंबई - राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गासाठी शासनाने लागू केलेल्या १६ टक्के आरक्षणानुसार वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मिळालेल्या प्रवेशांना संरक्षण देण्यासाठी संबंधित कायद्यात तत्काळ सुधारणा करणारा अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत...
मे 18, 2019
मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला सात दिवसांची स्थगिती देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात खुल्या वर्गातील विद्यार्थी आणि पालक शनिवारी (ता. 18) वांद्रे येथे आंदोलन करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांत मराठा आरक्षण लागू न करण्याचे आदेश देऊनही राज्य सरकार...
मे 16, 2019
मुंबई - मराठा समाजातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या एकाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेत आहोत. या मुद्द्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून, या विषयावर मार्ग काढण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे....
मे 16, 2019
नाशिक - वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात गोंधळ निर्माण झाला आहे. अशात शासनाने परिपत्रक काढून अकरावी प्रवेशातही मराठा आरक्षण देण्याचे आश्वासन दिलेले असले, तरी यासंदर्भात संभ्रम कायम आहे. त्यामुळे अकरावी...
मे 15, 2019
मुंबई - निम्मा महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना शेतकाऱ्यांशी संबंधित असलेल्या राज्याच्या कृषी खत्याला कुणी वाली उरलेला नाही. या खात्याला गेल्या वर्षभरापासून पूर्ण वेळ मंत्री मिळालेला नाही, तर नऊ महिन्यांपासून कृषी खात्याचा अतिरिक्त कार्यभार जलसंधारण सचिवांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे ऐन...
मे 15, 2019
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू नसल्याचा निर्णय दिल्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने प्रवेश प्रक्रिया सात दिवस स्थगित ठेवण्याचा निर्णय...
मे 14, 2019
औरंगाबाद - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला होता. या निर्णयाविरोधात आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. दरम्यान,...
मे 14, 2019
मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर मराठा आरक्षणाला आज राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने राज्य सरकारने तातडीने हालचाली करायला सुरवात केली. अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अध्यादेश काढून त्यांचे प्रवेश नियमित करण्याची तयारी राज्य सरकारने दाखविली आहे. प्रवेशाचा उद्या (ता. 14) शेवटचा दिवस आहे....
मे 13, 2019
मुंबई : आरक्षणावरून मुलांच्या भविष्याबाबत सरकार खेळ करत आहे. मराठा आरक्षण मिळाले म्हणून पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा. मराठा तरूण-तरुणींची सरकारने फसवणूक केली. खासगी क्षेत्रात आरक्षण नसल्याने सरकार या मुलांना कुठे नोकऱ्या देणार आहे. स्थानिकांना प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज काय?, अशी टीका मनसे...
मे 11, 2019
नाशिक - वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविल्यानंतर यापूर्वी पहिल्या व दुसऱ्या फेरीत झालेले प्रवेश रद्द ठरविण्यात आले आहेत. राज्य सामूहिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे यासंदर्भातील परिपत्रक काढले आहे. प्रवेशप्रक्रियेचे सुधारित...
मे 11, 2019
मुंबई -  पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश घेतलेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होणार नाहीत असे आश्‍वासन दिले जात नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जाणार असल्याचा इशारा प्रवेश नाकारलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांनी दिला आहे. रात्री उशिरापर्यंत या...
मे 10, 2019
चिपळूण - वैद्यकीय प्रवेशात मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. या निर्णयामुळे मराठा समाजातील वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा प्रश्‍न पेटण्याची चिन्हे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मराठा समाजाच्या बैठकांना जोर...