एकूण 100 परिणाम
जानेवारी 19, 2019
यवतमाळ : दारूमुळे घरच नाही; तर देश तुटत चालला आहे. खुर्चीत बसलेल्या नेत्यांना त्याचे सोयरसुतक नाही. दारूबंदी जिल्ह्याची नव्हे तर, देशाची लढाई आहे, असे मत राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले. स्वामिनी दारूबंदी आंदोलनतर्फे शुक्रवारी (ता. 18) महामोर्चा काढण्यात आला. यावेळी समता मैदानात...
डिसेंबर 18, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या एसईबीसी (सामाजिक, आर्थिक मागास) प्रमाणपत्रासाठी "सेतू'मध्ये दलाली करणाऱ्यांवर आता फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सोमवारी (ता. 17) "सकाळ'ने "एसईबीसीसाठी चारशेचा रेट' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने याची तातडीने गंभीर दखल...
डिसेंबर 17, 2018
बीड- हातात काठी आणि खांद्यावर घोंगडी हे धनगर समाजाचा पारंपारिक पेहराव असलेले आणि डोक्यावर पिवळ्या टोप्या परिधान करुन हाती पिवळ्या रंगाचे झेंडे उंचावत आरक्षणाच्या मागणीच्या घोषणा देत समाज बांधवांचा मोर्चा सोमवारी (ता. १७) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तसेच, टाळ मृदंगाच्या गजरात भजन गात आरक्षणाची...
डिसेंबर 17, 2018
औरंगाबाद - मोठ्या संघर्षातून मराठा आरक्षण पदरात पडले. त्याच्या लाभासाठी लागणारे एसईबीसी (सामाजिक, आर्थिक मागास) प्रमाणपत्र मिळावे, यासाठी मराठा बांधव शासनदरबारी खेट्या घालत आहेत. दरम्यान, त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी दलाल सरसावले आहेत. सेतू केंद्रात प्रवेश करताच काय हवंयं सांगा, लगेच मिळवून देतो...
डिसेंबर 10, 2018
सातारा : 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी रविवारी (ता. 9) केलेल्या वक्तव्याचा आज (साेमवार) सकल मराठा समाजाने साताऱ्यात समाचार घेतला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देत माने यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मराठा समाजातील युवतींनी केली.  पाटलांच्या पोरींना मी लावणी शिकवतो, त्यांनीही नाचले...
नोव्हेंबर 27, 2018
बीड : मराठा आरक्षण मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झाडावर चढलेले तिघे आंदोलक दोन तासांनी खाली उतरले. जिल्हा प्रशासनाने आंदोलनाची माहिती मंत्रालयात कळविल्यानंतर आंदोलक खाली उतरले. आंदोलनस्थळी प्रचंड घोषणाबाजी आणि प्रशासनाची धावाधाव दिसून आली. मराठा आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्गीय आयोगाचा...
ऑक्टोबर 25, 2018
जळगाव ः देशभरात होत असल्याचे देशद्रोहाच्या कारवाया, तसेच दहशतवाद्यांना संरक्षण दिले जाते. देशातील काही विद्यापीठांमधून देशद्रोही व विघटनवादी शक्‍ती आणि जातीय तेढ निर्माण करण्याचे कार्य केले जाते. या देशद्रोहाच्या विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर बुक्‍का मोर्चा काढण्यात आला. यात विविध संघटना,...
ऑक्टोबर 20, 2018
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शनिवार, 20 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.  गांधी-जवाहर बाग येथून सुरू होणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री गुलाबराव गावंडे, प्रदेश उपाध्यक्ष संतोष कोरपे, माजी आमदार तुकाराम बिडकर, माजी...
ऑक्टोबर 11, 2018
बदल्या होऊनही रिलीव्ह न केल्याने फरफट; चार महिन्यांपासून कुटुंबांचीही आबाळ सातारा - वार्षिक सर्वसाधारण बदल्यांना चार महिने झाले तरीही पोलिसांना अद्याप मूळ ठिकाणाहून सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे सहा वर्षे एका ठिकाणी सेवा बजावल्यानंतरही पोलिस दादाला बदलीच्या ठिकाणी जाता आलेले नाही. अनेकांनी बदलीच्या...
ऑक्टोबर 11, 2018
औरंगाबाद - वाळूज औद्योगिक वसाहतीत नऊ ऑगस्टला अज्ञातांनी कंपन्यांची केलेली तोडफोड व जाळपोळ प्रकरणातील गुन्हे जलदगती न्यायालयात चालविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आज मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी माहिती दिली. नऊ ऑगस्टला मराठा...
ऑक्टोबर 10, 2018
औरंगाबाद : वाळूज औद्योगिक वसाहतीत नऊ ऑगस्टला अज्ञातांनी कंपन्यांची केलेली तोडफोड व जोळपोळ प्रकरणातील गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बुधवारी (ता. 10) औरंगाबादेतील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी...
सप्टेंबर 08, 2018
सोलापूर - मराठा समाजाच्या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी सकारात्मक भूमिका घेत आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच सरकारमधील दुग्धविकास विभाग, पर्यटन विकास महामंडळ आणि व्यवसाय शिक्षण विभाग मात्र उदासीन आहेत. सोलापूरच्या मराठा वसतिगृहासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने...
ऑगस्ट 24, 2018
सोलापूर - धनगर समाजाला घटनेने दिलेल्या आरक्षणाची तत्काळ अंमलबजावणी करावी, सोलापूर विद्यापीठाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नामांतर करावे, आरक्षण व नामांतर लढ्यावेळी कार्यकर्त्यांवर नोंदविलेले गुन्हे मागे घ्यावेत आणि आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या परमेश्वर घोंगडे व योगेश कारके यांच्या...
ऑगस्ट 24, 2018
सातारा - देवस्थान इनाम वर्ग तीन जमिनी खालसा करून अग्रहक्काने उदरनिर्वाहासाठी गुरवांचे नावे करण्यात यावी, या मागणीसाठी आज सातारा जिल्हा गुरव समाज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल व शिंग- तुतारी मोर्चा काढला. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर शिंग- तुतारी वाजवून, तसेच घोषणांनी दणादणून...
ऑगस्ट 22, 2018
सांगली - रत्नागिरी- नागपूर महामार्गासाठीचे भूसंपादन चुकीच्या पद्धतीने सुरू असून, ही प्रक्रिया योग्य व्हावी, त्याची भरपाई मिळावी आणि नंतरच काम सुरू करावे या मागणीसाठी किसान सभेने आज मोर्चा काढला. येथील विश्रामबाग चौकातील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात...
ऑगस्ट 21, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी शिवाजी पेठेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला. तरुणांचा सळसळता उत्साह, हाती भगवे झेंडे, ‘एक मराठा, लाख मराठा’ असा टिपेला पोहोचलेला सूर अशा जल्लोषी वातावरणात मोर्चा निघाला. या निमित्ताने शिवाजी पेठ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर पुन्हा एकदा...
ऑगस्ट 21, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली पाटीलकी पणाला लावावी, असे आवाहन शिवाजी पेठेतर्फे आज करण्यात आले. प्रसंगी पालकमंत्र्यांच्या दारात उपोषणाचा इशाराही यानिमित्त देण्यात आला. मराठा आरक्षणासाठी शिवाजी पेठेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला. जल्लोषी...
ऑगस्ट 21, 2018
पुणे - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विभागीय आयुक्‍तालयासमोर सोमवारपासून बेमुदत चक्री उपोषण सुरू करण्यात आले. दरम्यान, ‘महाराष्ट्र बंद’च्या कालावधीत घडलेल्या हिंसक घटनांनंतर आंदोलनाची आचारसंहिता निश्‍चित करण्यात आली आहे. यापुढे संयम, शिस्तबद्ध आणि शांततेच्या मार्गानेच...
ऑगस्ट 20, 2018
कोल्हापूर - शिवाजी पेठेतर्फे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. भगवे झेंडे घेतलेले तरुण हलगीचा कडकडाट मर्दानी खेळ छत्रपती शिवाजी आणि ताराराणी स्वरूपातील युवक-युवती अशा लवाजम्यासह उभा मारुती चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. मोर्चामध्ये महापौर शोभा बौंद्रे,...
ऑगस्ट 19, 2018
पुणे - मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे पुण्यात सोमवारी (ता. २०) पासून बेमुदत चक्री उपोषण करण्यात येणार आहे. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर (कौन्सिल हॉल) दररोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत हे उपोषण होणार आहे. शांततेच्या मार्गाने...