एकूण 9 परिणाम
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - राज्याचे लक्ष लागलेली मुंबई महापौरपदाची प्रतिष्ठेची निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा विश्‍वास शिवसेनेने दाखवला असतानाच मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात फडणवीस सरकारविरोधात अविश्‍वास ठराव मांडण्याची तयारी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने चालवली असल्याची जोरदार चर्चा...
फेब्रुवारी 21, 2017
अकाेला - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.२१) मतदान घेण्यात येत आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील विविध मतदान केंद्रावर २० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील गाेरक्षण राेडवर मतदान केल्यानंतर घरी जाणाऱ्या मतदाराचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याची घटना दुपारी १ वाजता घडली...
फेब्रुवारी 17, 2017
वाठार स्टेशन - वाठार स्टेशन गटात दोन्ही कॉंग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीच्या प्रचारास जोरदार सुरवात केली आहे. या गटात दोन्ही कॉंग्रेसची ताकद सारखीच असल्याने भाजप उमेदवारामुळे रंगत निर्माण झाली आहे.  या गटात राष्ट्रवादीकडून डॉ. अभय तावरे निवडणूक लढवत आहेत. तावरे हे मूळचे भाडळेचे असले तरी...
फेब्रुवारी 02, 2017
नाशिक - महापालिकेत "हंड्रेड प्लस'साठी निष्ठावंतांकडे कानाडोळा करीत "इनकमिंग'चा धडाका उडवून देणारे भारतीय जनता पक्षाचे नेते बंडखोरी होण्याच्या शक्‍यतेने चांगले धास्तावले आहेत. कधी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नावाखाली, तर कधी प्रदेशकडे यादी पाठविल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा फंडा राबविण्यात...
जानेवारी 24, 2017
मुंबई - येत्या 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधान परिषदेतील पाच जागांच्या निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांबरोबर अपक्ष उमेदवारांनी गर्दी केली आहे. या पाच जागांसाठी तब्बल 76 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.  विधान परिषदेत निवडून द्यावयाच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघातून दोन तर नागपूर, औरंगाबाद आणि कोकण...
डिसेंबर 31, 2016
पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने सरते वर्ष पक्षांतराचे म्हणावे लागेल. गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक दलबदल 2016 मध्येच आणि ते सुद्धा वर्ष सरताना झाले. भाजप आणि आरपीआय वगळता इतर सर्वच पक्षांत जावक,तर भाजपमध्ये फक्त मोठी आवक झाली. आगामी वर्षाच्या पूर्वार्धात महापालिकेची...
डिसेंबर 08, 2016
नांदेड - राज्यभरात होत असलेल्या नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी (ता. सात) येथे पत्रकार परिषदेत केला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. वास्तवाचे भान न ठेवता...
डिसेंबर 01, 2016
मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीने भाजपसाठी राज्यातील 147 नगरपालिकामध्ये मतांची कवाडे उघडून दिली. 52 नगराध्यक्ष आणि 890 नगरसेवक निवडून देत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अंधारात मारलेला नंबर वनचा बाण निशाण्यावर लागला. जनतेतून नगराध्यक्षांची निवड करण्याचा फंडा कमालीचा यशस्वी ठरला. विदर्भ, उत्तर...
नोव्हेंबर 29, 2016
कोल्हापूर - नगरपालिका निवडणुकीच्या यशानंतर भाजपचे आता जिल्हा परिषद टार्गेट असणार आहे. स्थानिक पातळ्यांवरील आघाड्या करण्याचा निर्णय यशस्वी झाल्यानंतर हाच फॉर्म्युला जिल्हा परिषद निवडणुकीतही असणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी स्टेशन रोडवरील गर्दी बिंदू चौक सबजेलच्या रस्त्यावर दिसू लागली तर त्यात आश्‍...