एकूण 53 परिणाम
जानेवारी 20, 2020
दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - जिल्ह्यात प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या नव्या कापडी पिशव्यांच्या उपक्रमात दोडामार्ग तालुक्‍याचा "दोडामार्ग पॅटर्न' अव्वल ठरला आहे.  कापडी पिशव्यांमुळे रोजगार निर्मिती, पर्यावरण रक्षण आणि प्लास्टिक निर्मूलन होणार आहे. प्रशासनाच्या मागणीनुसार जिल्ह्यातील अनेक महिला...
जानेवारी 19, 2020
नांदेड ः जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड मंगळवारी (ता.२१) होत आहे. निवडणूक प्रक्रियेला अवघे काही तास उरल्याने उत्सुकता वाढली असून दावेदारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सत्तेत स्थान मिळणार असले तरी काँग्रेसकडून अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा दावा करण्यात येत आहे....
जानेवारी 18, 2020
नागपूर : गेल्या काही वर्षात विद्यार्थिंनी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. यावर उपाय म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाने अभिनव कल्पना राबवित, विद्यार्थिनींना चर्चासत्र, कार्यशाळा वा इतर...
जानेवारी 17, 2020
नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्‍वरी यांची भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली. त्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी (ता. 16) निघाले. मात्र, त्यांच्या जागेवर अद्याप कुणाचीही बदली करण्यात आलेली नाही. त्यामुळे या पदाची सूत्रे प्रभारी अधिकाऱ्यांकडे...
जानेवारी 10, 2020
नागपूर : राज्यात ज्या वेगाने महिलांचा विकास होतोय त्याच्या कितीतरी अधिक पटीने महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे वाढत असल्याचे भयावह चित्र रोज अनुभवास येत आहे. राज्य महिला आयोग 2016-17 च्या अहवालानुसार, आयोगाकडे महिलांविरुद्धच्या अन्याय व अत्याचाराची एकूण 3 हजार 298 प्रकरणे नोंदविली आहेत. यात सर्वाधिक...
जानेवारी 08, 2020
नगर : कुटुंबनियोजनादरम्यान होणाऱ्या असफल शस्त्रक्रिया, गुंतागुंत व मृत्यू प्रकरणात केंद्र सरकारप्रमाणेच आता राज्य सरकारही कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई देणार आहे. तसा अध्यादेश जारी करण्यात आला असून, ही मदत राज्य सरकारच्या निधीतून देण्यात येणार आहे.  जाणून घ्या -...
जानेवारी 06, 2020
बीड - स्त्रीभ्रूणहत्या, मुले-मुलींचे विषम प्रमाण, कारखान्यावर ऊसतोडणीचे काम बुडू नये म्हणून गरज नसताना भीती दाखवून महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचे प्रकार अशा अनेक बाबींमुळे बदनाम झालेल्या बीड जिल्ह्यात स्त्रीजन्माचे अनोखे स्वागतदेखील झाले झाहे. एकाच मांडवात एकाच वेळी 836 मुलींचे बारसे आणि नामकरण...
जानेवारी 03, 2020
सातारा : नायगाव (ता. खंडाळा ) येथे शासनाने उभारलेले सावित्रीबाई फुले यांचे राज्य संरक्षित स्मारक महिलांसह विद्यार्थी, पर्यटकांचे प्रेरणास्त्रोत बनत आहे. सध्या विविध शालेय सहली, अभ्यासक, संशोधक व पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे भेटी देत आहेत. मात्र, अपूर्ण बाबी पूर्ण करण्याची आवश्‍यकता आहे.   नायगाव हे...
जानेवारी 01, 2020
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील स्त्रीआरोग्य व प्रसूतीशास्त्र विभागात 19 हजार 322 गरोदरमातांच्या प्रसूती झाल्या. त्यापैकी 73 टक्के (14,202) महिलांची प्रसूती नैसर्गिकरीत्या तर 26 टक्के (5,120) महिलांची सिझेरीयन प्रसुती करण्यात आल्या. नैसर्गिक व सुरक्षित प्रसुतीची ओळख बनवणाऱ्या या विभागाने वर्षभरात अनेक...
जानेवारी 01, 2020
सातारा : "बेटी बचाओ, बेटी पढाओ'...चा संदेश देशभर पोचविण्यासाठी काश्‍मीर ते कन्याकुमारी असा सायकल प्रवासाला निघालेले बारामती सायकल क्‍लबच्या सदस्यांचे नुकतेच साताऱ्यात आगमन झाले. या वेळी सातारा सायकल क्‍लब तसेच शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. जिल्हा नियोजन अधिकारी भगवानराव जगदाळे व...
डिसेंबर 25, 2019
सोलापूर : सोलापूरच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयातर्फे आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाच्या संघानेच विजेतेपद पटकाविले, तर उपविजेता कोल्हापूरचा संघ ठरला आहे. जलसंपदा विकासचे सचिव सु. वि. सोडल यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. नियमितपणे व्यायाम व खेळ...
डिसेंबर 25, 2019
सह्याद्रीच्या पर्वत रांगेत विसावलेल्या जगप्रसिद्ध पाचगणी या पर्यटनस्थळी माझा जन्म झाला. आई- वडील, बहीण- भाऊ आणि मी असे पाच जणांचे आमचे कुटुंब. वडील मिशनरी शाळेत तुटपुंज्या मेहनतानावर राबत असे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे पैसे मिळत नसतं. त्यामुळे ते बेकरीतही काम करत. वडिलांची ही धडपड आईला...
डिसेंबर 24, 2019
खापरखेडा (जि.नागपूर) : परिसरात असणाऱ्या चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्रासह नागपूर जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत मागील अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या पदांमुळे आरोग्यसेवेत बाधा निर्माण होण्याची शक्‍यता बळावलेली आहे. नागपूर जिल्ह्यात एकूण 49 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 316...
डिसेंबर 24, 2019
सातारा : युवती व मुलींमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करून कोणत्याही प्रसंगाला सक्षमपणे सामोरे जाण्याचा निर्धार त्यांच्यात निर्माण करण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात निर्भया उपक्रम राबविण्यात येत आहे. या वेळी युवतींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याबरोबर त्यांची...
डिसेंबर 24, 2019
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील प्रत्येक घराशी आणि घरातील प्रत्येकाशी गेल्या 18 वर्षांहून अधिक काळाचे अतूट नाते निर्माण करणारी आपल्या "सकाळ'ची सोलापूर आवृत्ती मंगळवारी (ता. 24) 19 व्या वर्षांत पदार्पण करत आहे. गेल्या 18 वर्षांच्या काळात "सकाळ'ने सकारात्मक, रोखठोक, विधायक आणि निर्भीड बातम्यांनी...
डिसेंबर 20, 2019
स्वारगेट (पुणे) : महात्मा फुले मंडईत दुरुस्ती व डागडुजीसाठी चार महिन्यांपूर्वी महानगरपालिकेच्या हेरिटेज विभागाने 68 लाखांची निविदा काढली आहे. तरीही मंडईची दुरवस्था का? हा पैसे मंडईच्या डागडुजीसाठी वापरतात की अधिकाऱ्यांच्या देखभालीसाठी वापरतात? असा प्रश्न मंडईतील व्यापारी वर्ग विचारत आहे.  ताज्या...
डिसेंबर 18, 2019
माजलगाव (जि. बीड) - शहराच्या बाजूलाच पालावर राहून संसाराचा गाडा हाकणाऱ्या लंकाबाईची एकविसाव्यांदा प्रसूती झाली. नववा महिना सुरू असताना ऊसतोडणीसाठी कर्नाटक राज्यात प्रवास करताना लंकाबाई ट्रॅक्‍टरमध्येच बाळंत झाल्या; मात्र दोन दिवसांच्या प्रवासात धक्के बसल्याने अर्भक मृत झालेले होते. विशेष म्हणजे...
डिसेंबर 16, 2019
औरंगाबाद - महापालिकेची एप्रिल 2020 मध्ये होणारी निवडणूक प्रभाग पद्धतीने (बहुसदस्यीय) घेण्यासाठी संपूर्ण तयारी झालेली असतानाच सोमवारी (ता. 16) अचानक राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेची प्रक्रिया व प्रभागरचनेनुसार वॉर्डांचे आरक्षण काढण्यास स्थगिती दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक जुन्याच म्हणजे...
डिसेंबर 15, 2019
नाशिक : राज्याच्या विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोमवार (ता. 16)पासून सुरू होत आहे. या अधिवेशनात शहरातील तीन महिला आमदार हैदराबाद येथील घटनेवर शासनाकडे लक्ष केंद्रित करणार असून, महिला सुरक्षेसाठी विविध उपाययोजनेच्या सूचना करणार आहे. त्याचबरोबर भाजपच्या तिन्ही आमदारांकडून शासनाने अडविलेला...
डिसेंबर 12, 2019
कळमेश्वर (जि.नागपूर) : लिंगा गावात पाचवर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या घटनेची राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली. घटनेची...