एकूण 40 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019  पुणे - महिला सक्षमीकरणाच्या घोषणा करणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांकडून महिलांना विधानसभेच्या उमेदवारीसाठी डावलले जात असल्याचे यंदाच्या निवडणुकीतून दिसून आले आहे. राज्यात एकूण ३२३९ उमेदवार रिंगणात असले, तरी त्यात फक्त २१४ महिलांनाच आमदारकी लढविण्याची संधी मिळाली आहे. भाजप आणि काँग्रेसने...
ऑक्टोबर 12, 2019
रायगड : 'विनाशकाले विपरीत बुद्धी' अशी एक म्हण आहे. या म्हणीमध्ये आता 'निवडणूक काले विपरीत बुद्धी' असा कालसुसंगत बदल करता येईल. याला कारणही तसेच आहे. जसजसा निवडणुकीचा हंगाम जवळ येऊ लागला, तसा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवरांचाही आपल्या तोंडावरील ताबा सुटू लागल्याचे दिसून आले.  - सरकारी...
सप्टेंबर 07, 2019
नवी मुंबई : अनेक दिवसांपासून लहान मुलांच्या आवश्‍यक यंत्रसामुग्रीअभावी बंद अवस्थेत असलेला महापालिकेचा बेलापूर येथील माता-बाल रुग्णालयातील शिशू अतिदक्षता विभाग आता कार्यान्वित होणार आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या आमदार निधीतून ९० लाख रुपयांच्या अर्थसहाय्यातून बेलापूर रुग्णालयात लहान मुलांसाठी बेबी...
मार्च 15, 2019
चेंजमेकर्सच्या माध्यमातून महिलांमध्ये बदल घडविण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते आहे. यामध्ये महिलांचे राहणीमान, व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करत, त्यांचा दृष्टिकोन बदलून त्यांच्यामध्ये सामाजिक आपुलकी निर्माण करायचे काम करीत आहे. शालेय जीवनापासून नेतृत्व, कला व खेळाची आवड. शिक्षण घेत असताना...
मार्च 15, 2019
नेते वल्लभ बेनके यांनी उमेदवारी दिली, साहेबांनी दाखविलेला विश्वास मतदारांनी सार्थ केला. मी मागासवर्गीय असूनसुद्धा तीन वेळा खुल्या वर्गातून निवडून आले. आताही माझ्या विभागात अनेक विकासकामे सुरू असून, जुन्नर शहरात सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर माझा प्रभाग आहे. माझा जन्म जुन्नर येथे झाला असून, कुटुंबात आई-...
मार्च 14, 2019
शालेय जीवनात शिक्षक जनार्दन माळी व विद्या गांधी यांनी दिलेल्या पाठीवरील थापेमुळे नेतृत्व, कला व खेळाची आवड हे गुण जोपासले गेले. माहेर व सासर दोन्ही घरच्यांच्या संस्कारांमुळे राजकारणात काम करत असताना समाजकारणाला प्राधान्य दिले. लहान असतानाच पितृछत्र हरपले. त्यामुळे मोठ्या भावाने सांभाळ केला....
मार्च 14, 2019
प्रत्येक कुटुंब हे स्त्रीवर अवलंबून असते. स्त्री सक्षम तर कुटुंब सक्षम. म्हणून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे. महिलांनीसुद्धा आपल्यातील कौशल्य विकास, उद्योगशीलता व सर्जनशीलतेला वाव द्यायला हवा, असे मत असणाऱ्या गौरीताई बेनके प्रापंचिक जबाबदारी सांभाळत समाज कार्याचा वसा पुढे...
मार्च 07, 2019
शिरूर - पत्नी आणि मुलाबाळांचा त्याचा संसार. आचारी म्हणून काम करून कुटुंबाचा चांगला उदरनिर्वाह चाललेला. पण या सुखी संसाराला दृष्ट लागावी तसे झाले. कर्ता माणूसच हृदयविकाराने गेला आणि अवघे कुटुंब उघड्यावर आले. पण गाव एक झाला आणि त्यांनी ‘या कुटुंबाची जबाबदारी आता गावाची’, असा निर्धार करून तब्बल ११ लाख...
फेब्रुवारी 06, 2019
मंगळवेढा - 'महिलांनी सावित्रीबाई फुले विचाराचे अनुकरण केले तर व ती शिकल्यास दोन कुटुंबाची प्रगती होते. तुमचे नावच' आशा' आहे. त्यमुळे अशा धरून बसावी लागत आहे. तरीसुद्धा तटपुंज्या रकमेवर काम करीत आहात तरी मला जनतेच्या प्रश्नासाठी गर्दीत घुसायची सवय आहे. असे मत आमदार भारत भालके यांनी व्यक्त केले....
फेब्रुवारी 01, 2019
आष्टा - नगर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी विलासराव शिंदे गटाचे माजी उपनगराध्यक्ष तानाजीराव सूर्यवंशी यांच्या पत्नी संगीता सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर समर्थकानी फटाक्‍यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. शहरातील प्रमुख मार्गावरून तीन तासाहून अधिक काळ मिरवणूक निघाली. पालिकेत...
डिसेंबर 05, 2018
लखनौ - उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथे एका भारतीय जनता पक्षाचे आमदाराने महिलेसोबत केलेला डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रानीगंज विधानसभेतून निवडून आलेले आमदार अभयकुमार उर्फ धीरज ओझा यांनी 'शराबी' चित्रपटातील 'नशा शराब में होता तो नाचती बोतल, नशे में कौन नहीं है ये बताओ तो जरा...लोग कहते है...
ऑक्टोबर 20, 2018
पिंपरी - शहराला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या सुटत नसल्यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. 20) सर्वच पक्षाचे नगरसेवक आक्रमक भूमिका घेण्याची शक्‍यता आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन प्रशासनाने दिले असले, तरी गेल्या आठवड्यात रावेत बंधाऱ्याजवळ कमी झालेली पाण्याची पातळी, तसेच...
सप्टेंबर 10, 2018
लातूर - मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅसची प्रचंड वाढ केली आहे. त्यामुळे या दरवाढीत सामान्य नागरीक होरपळत आहे. गॅसच्या दरवाढीमुळे तर महिलांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या महिलांना येथील उषाकिरण पेट्रोलपंपावरच चुलीवर स्वयंपाक करत मोदी सरकारचा निषेध नोंदविला. पेट्रोल,...
सप्टेंबर 08, 2018
कऱ्हाड : तरुणी आणि महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदम यांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी आज येथे निदर्शने करून आमदार कदम यांच्या प्रतिमेला जोडोमारो आंदोलन केले. यावेळी महिलांनी आमदार कदम यांच्या निषेधाच्या जोरादार घोषणा दिल्या.  येथील चावडी चौकात शिवसेनेतर्फे आज...
सप्टेंबर 08, 2018
मोखाडा : भाजप आमदार राम कदम यांनी महिलांविषयी केलेल्या असभ्य विधानाचा  निषेध व्यक्त करत संतप्त झालेल्या शिवसेना महिला आघाडीसह जव्हारच्या शिवसैनिकांनी गांधीं चौक येथे राम कदमच्या फोटोला चपलांनी अक्षरशः बदडले आणि त्याच्या विरोधात घोषणाबाजी करून आपला संताप व्यक्त केला आहे. महिला व मुलींबद्दल असभ्य,...
सप्टेंबर 06, 2018
नेवासे : मुलींविषयी बेताल वक्तव्य करून स्त्रीशक्तीचा अपमान करणारे हे राम नव्हे तर रावण कदम असून त्यांनी केलेले वक्तव्यबद्दल त्यांचा राजनामा घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख सुनीता गडाख यांनी केली.  नेवासे येथील श्री खोलेश्वर...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : साहित्यिक, विचारवंतांच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारसह पोलिसांची खरडपट्टी काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक व पुणे पोलिस आयुक्तांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल...
सप्टेंबर 06, 2018
बारामती शहर - मुलींना पळवून आणण्याची भाषा करणाऱ्या आमदार राम कदम यांचे आज बारामतीतील महिलांनी रावण कदम असे प्रतिकात्मक नामकरण करत निषेध नोंदविला.  'राम्या कदम हाय हाय....राम्या तुझ करायच काय....खाली डोक वर पाय..' अशा घोषणांनी आज राष्ट्रवादीच्या महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी आमदार राम कदम यांचा...
सप्टेंबर 06, 2018
दौंड (पुणे) : आमदार राम कदम यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची वादग्रस्त वक्तव्ये अचानकपणे निघालेली नसून त्यांना त्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. कोणी कोणावर बोलायचे याचे देखील प्रशिक्षण पक्षाकडून त्यांना दिले जात आहे, असा आरोप पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार रमेश थोरात...
सप्टेंबर 05, 2018
इंदापूर- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र व राज्यातील सरकार विरूध्द काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या सहाव्या दिवशी यात्रेस इंदापूरात विक्रमी प्रतिसाद मिळाला. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विधानसभा  उमेदवारीची सर्व वक्त्यांनी उस्फुर्त घोषणा केली. मात्र...