एकूण 62 परिणाम
डिसेंबर 10, 2019
औरंगाबाद : केवळ कागदोपत्री नागरिकत्व ठरविणे ही पद्धतच चुकीची आहे. एखाद्या व्यक्तीला नव्याने नागरिकत्व दिल्यास त्यानंतरची किमान 12 वर्षे मतदानाचा अधिकार द्यायला नको, यामुळे राजकीय सत्तेचा गैरवापर होतो, त्यातून समस्या उभ्या राहतात, अशी सडकून टीका कायदेतज्ज्ञ ऍड. असिम सरोदे यांनी औरंगाबादेत केली....
डिसेंबर 09, 2019
सोलापूर : हैदराबाद येथे घडलेल्या निर्भया प्रकरणानंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणारे सोलापूर महिलांसाठी किती सुरक्षित आहे? हे "सकाळ'ने जाणून घेतले. अन्य शहरांच्या मानाने सोलापूर सुरक्षित आहे; परंतु काही रस्त्यांवर भीती वाटते...
डिसेंबर 07, 2019
जालना - हिंगोली जिल्ह्यातील एका शेतात तब्बल 23 दिवस डांबून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (ता.सहा) रात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी शुक्रवारी (ता.सहा) रात्री उशिरा हिंगोली जिल्ह्यातून एकास तर चंदनझिरा परिसरातून दोन महिलेसह अशा तिघांना ताब्यात घेतले...
डिसेंबर 04, 2019
हिंगणा एमआयडीसी (जि.नागपूर) : नीलडोह ग्रामपंचायतने परिसरात बार होऊ नये याकरिता वारंवार ठराव घेऊन बारला विरोध केला. यापूर्वी ठराव पारित झाला. परंतु ठरावाला "केराची टोपली' दाखवीत पुन्हा बार सुरू करण्याचे कारस्थान सुरू झाले. म्हाडा कॉलनीसमोर नव्याने सुरू होत असलेल्या बारविरोधात परिसरातील महिला पुन्हा...
डिसेंबर 03, 2019
अंबरनाथ : इंजेक्‍शनमुळे 12 रुग्णांना बाधा होऊन त्यांची प्रकृती ढासळल्याची घटना अंबरनाथ येथील डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी (ता. 3) घडली. सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेनंतर आरोग्य विभागाने संबंधित इंजेक्‍शनचा वापर...
नोव्हेंबर 21, 2019
  सोलापूर ः स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या सोलापूर शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये फक्त महिलांसाठी अशी स्वच्छतागृहाची व्यवस्था एकाही ठिकाणी नाही. त्यामुळे शहरातील महिलांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.  पालकांच्या मजुरीवर सावित्रीच्या लेकींची भिस्त महिलांची एक प्रकारे थट्टाच ...
नोव्हेंबर 21, 2019
कुही/पचखेडी(जि.नागपूर) ः पोलिस म्हणतात, परिसरात अवैध दारू पकडून आम्ही परिसर "हंड्रेड परसेंट' दारूमुक्‍त केला. राजकीय नेते चमकोगिरी करीत मोठमोठे भाषणं ठोकून जातात. परंतु वेलतूर परिसरात दररोज अवैध दारूचा महापूर वाहताना उघड्या डोळ्यांनी पाहत असलेले ग्रामस्थ मात्र हे ऐकून चकीत होत एवढी दारू येते कुठून...
नोव्हेंबर 21, 2019
उस्मानाबाद : मागील 15 ते 20 दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर आणि लोहारा या तालुक्यातील गावांमध्ये गुढ आवाज ऐकायला येत आहे. 1993 च्या भूकंपाची पार्श्वभूमी असणाऱ्या या तालुक्यांमध्ये या आवजाने भीतीच वातावरण पसरलं आहे. दोन दिवसापूर्वीही असाच आवाज लोहारा आणि तुळजापूर परिसरात ऐकायला मिळाला....
नोव्हेंबर 20, 2019
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) वसतिगृहाच्या शुल्कवाढीविरोधात सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यास विद्यार्थी तयार नाही. शुल्कवाढ पूर्णपणे मागे घेण्याच्या मुद्यावर समितीने 'जेएनयू'च्या विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयूएसयू) शिष्टमंडळाने बुधवारी (ता.20) चर्चा केली. या वेळी मोर्चातील...
नोव्हेंबर 19, 2019
ओरोस ( सिंधुदुर्ग ) - सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपद पुढील अडीच वर्षासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. मुंबईत आज राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपद सोडत काढण्यात आली. यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी राखीव झाले असून सत्ताधारी भाजपच्या समिधा...
नोव्हेंबर 15, 2019
बोर्डी ः चिकू फळांचे उत्पादन घटल्याने फळ प्रक्रिया उद्योगावर गदा येण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षभरात वातावरणात घडलेल्या नैसर्गिक बदलांमुळे चिकू फळांचे उत्पादन १० टक्‍क्‍यांवरती येऊन ठेपले आहे. त्यामुळे बागायत आणि शेतीचे व्यवस्थापन विस्कळित झाले आहे. त्याचबरोबर पूरक व्यवसाय म्हणून...
नोव्हेंबर 13, 2019
पोलादपूर : स्वयंपाक म्हटला की वाटप आलेच आणि हे वाटप दगडी पाटा, वरंवट्यावरील असेल, तर जेवणाचा स्वादच वेगळा असतो. मात्र, आधुनिक राहणीमान उंचावल्याने पूर्वी वापरात असणारे चूल, दगडी जाते, पाटे-वरवंटे या वस्तूंची जागा आता अनुक्रमे गॅस, पीठ गिरणी व मिक्‍सरने घेतल्याने त्या अडगळीच्या ठिकाणी दिसत आहेत. ...
नोव्हेंबर 01, 2019
वसई ः सणासुदीच्या काळात खरेदीकडे बहुतांश ग्राहकांचा कल असतो. त्यातच दिवाळीचा मुहूर्त साधून आवर्जून नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. यंदा मात्र दिवाळीत वसई तालुक्‍यात वाहनांच्या खरेदीला ब्रेक लागल्याचे चित्र आहे. मंदीचे सावट, इंधनात सातत्याने होणारी वाढ आणि खर्च यामुळे ग्राहकांनी वाहनखरेदीकडे पाठ...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवरील मोटरमनच्या सतर्कतेमुळे लोकलमधून तोल जाऊन खाली पडलेल्या इडली विक्रेत्याचे प्राण वाचले आहेत. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील मानखुर्द-वाशी स्थानकांदरम्यान मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.  मानखुर्द येथे राहणारा 19 वर्षाचा चुलबुल कुमार हा इडली विक्रेता आहे....
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
ऑक्टोबर 06, 2019
रत्नागिरी - तालुक्‍यातील वाटद येथील जमीन पर्यावरणपूरक किंवा रासायनिक प्रकल्प नव्हे, तर एमआयडीसीलाही द्यायची नाही असा निर्णय घेत वाटद-खंडाळा येथील ग्रामस्थ आणि मुंबईकर चाकरमान्यांनी शपथ घेतली. एमआयडीसीबाबत शेतकऱ्यांना अंधारात ठेवणाऱ्या प्रशासनाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.  वाटद एमआयडीसीचा...
सप्टेंबर 23, 2019
नेरळ (बातमीदार) : नवी मुंबई येथून सहा गिर्यारोहकांची टीम शनिवारी (ता. २१) पेब किल्ल्यावर गिर्यारोहणासाठी आली होती; परंतु त्यातील एकाच पाय घसरून तो ५०० फूट दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलिस व माथेरान येथील ‘सह्याद्री रेस्क्‍यू टीम’ने पाच तासांचे अथक प्रयत्न करत व्यक्तीचे प्राण वाचवले. पेब...
सप्टेंबर 04, 2019
एक ः जग वेगाने बदलू लागले. परंतु, लाल गाय पाळणारे भारवाड अद्याप लाचारी अन्‌ गरिबीच्या जिण्यातून मुक्त होऊ शकला नाही. "आज येथे तर उद्या तेथे' अशी भटकंती आयुष्य जगण्यासाठी आणि जगविण्यासाठी सुरू आहे. रस्त्यावरचा प्रवास अंगवळणी पडलेला नाथजोगी समाजाचा प्रवास कधी दूर होईल? दोन ः गोऱ्या लोकांचं राज्य...
सप्टेंबर 01, 2019
मुंबई - कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य...
ऑगस्ट 22, 2019
वसई ः विरार पूर्वेकडील भागात काही दिवसांपासून गढूळ, दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेने याची कोणतीच दखल घेतली नसल्याने संतप्त महिलांनी थेट वसई-विरार महापालिकेच्या...