एकूण 703 परिणाम
जून 26, 2019
औरंगाबाद : बॅंकेतून 50 हजारांवरील रक्‍कम काढायची असल्यास ती धनादेशाने (चेक) काढावी लागत होती. या नियमात रिझर्व्ह बॅंकेने बदल केला आहे. आता 20 हजारांपुढील रक्‍कम काढायची झाल्यास ती स्लिपऐवजी चेकने काढावी लागणार आहे. 21 जूनपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. डिजिटलाइजेशन चळवळ वाढीस लागावी व...
जून 25, 2019
यवतमाळ  : मानवी आरोग्य व निसर्गातील ऋतुचक्र यांचा समातोल राहावा, यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वृक्ष लागवडीची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली. ग्रामपंचायतींपासून वनविभागासह राज्यभरातील 33 विविध विभागांना ही जबाबदारी देण्यात आली. प्रत्येक वर्षी रेकॉर्ड-ब्रेक रोपांची लागवड केल्याची...
जून 23, 2019
संगमेश्वर - भारत विरूध्द अफगाणिस्तान क्रिकेट सामन्यात भारताला विजय मिळाल्याच्या अति उत्साहाने आणि सामना पाहतानाच्या तणावाने गणपत जानू घडशी ( 68 )यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने मृत्यू झाला.  आंबव (पोंक्षे )गावचे रहिवासी गणपत घडशी हे क्रिकेट मॅचचे रसिक होते. मुंबईला शासकीय सेवेतून निवृत्त...
जून 22, 2019
गडचिरोली : दरवर्षीप्रमाणे यंदाही प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेत काही शिक्षक न्यायालयात गेल्याने गडचिरोली जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांमध्ये रोष निर्माण झाला असून बदलीपात्र शिक्षक मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी...
जून 20, 2019
'बालभारती'ने पहिली व दुसरीच्या पाठ्यपुस्तकातील संख्यानामांमध्ये केलेल्या बदलांना विविध स्तरांवर विरोध होत आहे. या विरोधाची कारणे; तसेच त्यामागची भूमिका स्पष्ट करणारा लेख.  पहिली व दुसरीच्या पाठ्यपुस्तकात संख्यानामात केलेला बदल विविध दृष्टिकोनांतून विचार करताना योग्य नाही, असे मला वाटते. मुळात अशा...
जून 19, 2019
लातूर : संख्या वाचनाची जुनी आणि नवी अशा दोन्ही पद्धती एकावेळी अवलंबल्यामुळे मुलांच्या मनात गोंधळ निर्माण होऊ शकतो. कोणतीतरी एक पद्धती पाठ्यपुस्तकात स्वीकारायला हवी होती. वास्तविक, संख्या वाचनाची जुनी पद्धतच अधिक योग्य आहे, असे स्पष्ट मत शिक्षणतज्ञांनी बुधवारी व्यक्त केले. दुसरीचा अभ्यासक्रम यंदा...
जून 17, 2019
कुडाळ - जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, तिला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, म्हणून येथील पुरुष मंडळींनी वडाची पूजा केली. गेली आठ वर्षे हा अनोखा उपक्रम ते राबवित आहेत. याचे राज्यभर कौतुक होत आहे. हिंदू सणामध्ये वट पौर्णिमा या सणाला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात वट...
जून 16, 2019
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेतील केवळ बीई (मॅकेनिक) याच विषयाचा पेपर फुटला नसून, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या तृतीय वर्षातील सहाव्या सेमिस्टरचा "थेरी ऑफ स्ट्रक्‍चर' या विषयाचा पेपरसुद्धा फुटल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून पुढे आली. आशीष...
जून 16, 2019
मंडणगड -  मंडणगड आगाराच्या माणगाव ताम्हाणे पुणे मार्गे शिर्डी या मार्गावर सुरु असलेल्या लांब पल्याचा गाडीचा नेहमीचा मार्ग बदलण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. रस्ता सुरक्षा या विषयावर जागरूक असलेल्या आगारव्यवस्थापनाने याकडे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. यंदा पाऊस...
जून 16, 2019
मुंबई : दहावीचा निकाल घसरल्याने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडे गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. तब्बल चार हजार विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे अर्ज दाखल केल्याने पालकांच्या खिशाला लाखोंचा भुर्दंड पडत आहे; मात्र...
जून 14, 2019
लातूर : गणित शिकवताना त्र्याहत्तर ऐवजी सत्तर तीन, अठ्ठ्याण्णव ऐवजी नव्वद आठ... असा नवा स्वर दुसरीच्या वर्गातून आपल्या कानावर पडणार आहे. जोडाक्षर असणारे अनेक शब्द मुलांच्या मनात गणिताची नावड आणि भीती निर्माण करतात. याचा अभ्यास करून जोडाक्षरे टाळणाऱ्या दाक्षिणात्य पद्धतीचा ‘बालभारती’च्या दुसरीच्या...
जून 14, 2019
सोलापूर - आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारने आता 12 हजार पदांची शिक्षकभरती काढली. मात्र, "पवित्र पोर्टल'ला लागलेले ग्रहण अद्याप सुटलेले नाही. त्यामुळे मागील तीन-चार महिन्यांपासून शिक्षकभरती खोळंबल्याने यंदा राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील 20 हजार 412 वर्ग शिक्षकाविना रिकामेच राहणार...
जून 13, 2019
कल्याण : कल्याण पूर्व मधील पावसाळ्यापूर्वी कामासाठी दरवर्षी निविदा काढून कामे केली जातात मात्र काही अधिकारी आणि ठेकेदार यांनी दुर्लक्षपणा करत असल्याने नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत असून याबाबत पालिका आयुक्त यांची आज भेट घेतली असून त्यांनी कामे मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले असून त्याचा...
जून 10, 2019
नंदोरी (वर्धा) : दहावीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. नवीन अभ्यासक्रम आणि कृतिपत्रिकांचे आव्हान व अंतर्गत तोंडी गुण बंद झाल्याने यंदा राज्याचा निकाल 77. 10 टक्‍के, तर नागपूर विभागाचा निकाल 67. 27 टक्‍के लागला. मागील वर्षी प्रमाणेच यंदाही नागपूर विभागाच्या निकालाने निच्चांक गाठला. नागपूर विभागात तर...
जून 10, 2019
चिपळूण - पिंपळी येथे उभारलेल्या ब्रेक टेस्टिंग ट्रॅकच्या उद्‌घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण गुहागरचे आमदार भास्कर जाधव आणि दापोलीचे आमदार संजय कदम यांच्यासह खासदार सुनील तटकरे यांनाही मिळाले नाही. येत्या अधिवेशनात हा विषय गंभीरपणे मांडणार असल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी दिली.  चिपळूण तालुक्‍...
जून 10, 2019
मुंबई - आर्थिक विकास दर 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्यासाठी सरकारला पुढील पाच वर्षांत रखडलेल्या प्रकल्पांचा तिढा सोडवण्याबरोबरच खासगी गुंतवणुकीला चालना द्यावी लागेल. यासाठी पुढील पाच वर्षांत देशात किमान 451 लाख कोटींची (6.62 ट्रिलियन डॉलर) गुंतवणूक आवश्‍यक आहे, असा अंदाज भारतीय उद्योग महासंघाच्या (...
जून 08, 2019
लातूर : दहावी आहे म्हणून अनेकजन टेंशन घेतात; पण मी अजिबात टेंशन घेतले नाही. शाळा-क्लासमधील अभ्यासाबरोबरच ‘सेल्फ स्टडी’वर अधिक भर दिला. त्यामुळेच शंभर पैकी शंभर गुण घेता आले, अशी भावना केशवराज विद्यालयातील विवेक भरत क्षीरसागर या विद्यार्थ्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक...
मे 31, 2019
शिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित...  प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...
मे 31, 2019
इचलकरंजी - शहरातून होणाऱ्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्‍न निकालात काढण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सुमारे १०० कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत हा प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. प्रस्ताव तयार करण्याचा...
मे 26, 2019
बोर्ड (पालघर) : राष्ट्रीयकृत बँकांचा हलगर्जीपणा, कृषी विभागाची उदासिनता आणि वीमा कंपनीच्या लबाडीच्या त्रिवेणी संगमाच्या अशुध्द पाण्यात शेतकऱ्याला मात्र गटांगळ्या खाण्याची वेळ आली आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजने अंतर्गत 2018 च्या खरिप हंगामातील बावीस तर 2016 च्या खरीप हंगामातील चौदा...