एकूण 1278 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
ठाणे : मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून मतदान करण्यापूर्वी मतदाराच्या हाताच्या बोटाला शाई लावली जाते; मात्र या शाईचा धसका मतदान कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेवेळेस वापरण्यात आलेल्या शाईमुळे अनेक निवडणूक कर्मचाऱ्यांच्या हाताला इजा झाली होती. शाईच्या...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गँगस्टर इक्बाल मिर्ची याची मालमत्ता विकत घेतली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) प्रफुल्ल पटेल यांची आज (शुक्रवार) चौकशी करण्यात येणार आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या वरळीतील...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळेचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार ते पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, अद्यापही गणवेश नसल्याने विद्यार्थी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या ठेकेदारांमार्फत विद्यार्थ्यांची गणवेशाची मापे घेण्याचे काम सुरू आहे. मात्र, ही स्थिती...
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई : मध्य रेल्वेवरील मोटरमनच्या सतर्कतेमुळे लोकलमधून तोल जाऊन खाली पडलेल्या इडली विक्रेत्याचे प्राण वाचले आहेत. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील मानखुर्द-वाशी स्थानकांदरम्यान मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली.  मानखुर्द येथे राहणारा 19 वर्षाचा चुलबुल कुमार हा इडली विक्रेता आहे....
ऑक्टोबर 16, 2019
  नाशिक : मतदाना संबंधी नागरिकांमध्ये जनजागृती अधिक व्हावी तसेच मतदानाचा टक्का वाढावा या उद्देशाने विधानसभा निवडणुकीसाठी नाशिकचा ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अभिनेता चिन्मय उदगीरकर याची निवड करण्यात आली. मतदारांनी निवडणूकप्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन उदगीरकर करणार आहे. प्रचारप्रसारच्या मोहिमेतून...
ऑक्टोबर 16, 2019
रत्नागिरी - रोहा - वीर विभागातील 46 किलोमीटर लांबीचे दुपदरीकरण प्रगतीपथावर असून मार्च 2020 मध्ये ते पूर्ण होईल. तसेच दहा नवीन स्थानकांची तर आठ लूप लाईनची कामे प्रगतीपथावर आहेत. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल. त्यासाठी 1100 कोटी रुपये अंदाजित खर्च येणार आहे, असे कोकण...
ऑक्टोबर 15, 2019
देवणी(जि. लातूर) ः तालुक्‍यासह परिसरात डेंगीने थैमान घातले असून सोमवारी (ता. 14) वलांडी (ता. देवणी) येथील एका अठरावर्षीय मुलीचा डेंगीने मृत्यू झाला. तर रविवारी (ता. 13) याच आजाराने हिसामनगर (ता. देवणी) येथील एका 10 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांत डेंगीने दोन बालकांचे बळी घेतले असून...
ऑक्टोबर 14, 2019
हिंगणा (जि.नागपूर) : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत शासनाने शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समिती मागील तीन वर्षांपासून ठप्प आहे. व्यवहार ठप्प असल्याने बाजार समितीतून अडतेही गायब झाले आहे. नाफेड खरेदी केंद्र नाकारल्याने बाजार समितीत स्मशान शांतता पसरली आहे. ...
ऑक्टोबर 14, 2019
सातारा : विधानसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी जिल्ह्यात "म्हैसूर शाई'च्या नऊ हजार 334 बाटल्या निवडणूक प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी नऊ हजार 231 बाटल्यांचे वाटप केले आहे.   मतदानाच्या दिवशी ही शाई बोटावर लावताच 15 सेकंदांमध्ये तिचा ओलसरपणा नष्ट होतो...
ऑक्टोबर 14, 2019
पिंपरी - महापालिका रुग्णालयांसह दवाखान्यांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यात प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणखी महिनाभर औषध खरेदी लांबणीवर गेली आहे. तीन विभागांसाठी सुमारे पाच कोटींच्या औषधे खरेदीची निविदा तयार केली असून, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्याला स्थायी समितीकडून मंजुरी...
ऑक्टोबर 12, 2019
विधानसभा 2019 : पुणे - जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी...
ऑक्टोबर 09, 2019
लातूर: विविध कारणांमुळे नजर ठेवण्याची गरज असलेल्या जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतील तब्बल 201 मतदान केंद्रांवरील मतदानाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. वेब कास्टिंग स्वरूपाचे प्रक्षेपण सर्वांनाच ऑनलाइन पाहता येणार असून मतदान कालावधीत अकरा तास ते सुरू राहणार आहेत. यातच काही संवेदनशील मतदान...
ऑक्टोबर 07, 2019
पोलादपूर  (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदाराविरोधात लयभारी आदिवासी विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी बुधवारी (ता. २) पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या...
ऑक्टोबर 07, 2019
कामठी  (जि.नागपूर): तालुक्‍यातील येरखेडा ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या यशोधरा नगरात राहत असलेले डाक विभागात कार्यरत एका व्यक्तीचा डेंगीची लागण झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. दिनेश गुलाबराव खोब्रागडे (वय 57, रा. यशोधरा नगर, कामठी) असे मृताचे नाव आहे.  मागील ऑगस्ट...
ऑक्टोबर 07, 2019
उमरेड/कुही : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून मतदारसंघातील रस्त्यांची दुर्दशा कायम आहे. ग्रामीण भागातील शहरांना जोडणारे अनेक वर्दळीचे मार्ग खड्ड्यांनी ग्रस्त झालेले पाहायला मिळतात.  कुही तालुक्‍यातील डोंगरमौदा-चिकना मार्गाची दुर्दशा झालेली दीर्घकाळापासून निदर्शनास येते. मांढळवरून 5 किलोमीटर...
ऑक्टोबर 06, 2019
रत्नागिरी - तालुक्‍यातील वाटद येथील जमीन पर्यावरणपूरक किंवा रासायनिक प्रकल्प नव्हे, तर एमआयडीसीलाही द्यायची नाही असा निर्णय घेत वाटद-खंडाळा येथील ग्रामस्थ आणि मुंबईकर चाकरमान्यांनी शपथ घेतली. एमआयडीसीबाबत शेतकऱ्यांना अंधारात ठेवणाऱ्या प्रशासनाचा यावेळी जाहीर निषेध करण्यात आला.  वाटद एमआयडीसीचा...
ऑक्टोबर 05, 2019
अहमदनगर : केंद्र शासनाने मोटार वाहन कायद्यात केलेल्या बदलाचा धसका वाहनचालकांनी घेतला आहे. दंडापासून बचावासाठी कागदपत्रांचे जडबंबाळ सोबत वागवायचे कसे? असा प्रश्‍न सतावत आहे. काहीजण तर चक्क हेल्मेटला सर्व कागदपत्र बांधून प्रवास करीत आहेत. यावर नगरमधील इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याने उपाय शोधला आहे...
ऑक्टोबर 02, 2019
भिलार : महात्मा गांधी आणि पाचगणी हे नात अगदी घनिष्ठ आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान (1935 ते 1944) महात्मा गांधी यांचे वास्तव्य असलेल्या पाचगणीतील दिलखुश बंगला, वीरजी बंगला, बाथा प्रार्थना सभागृह, बहाई भवन या वास्तू आजही त्यांच्या आठवणी जाग्या करतात. मात्र, याठिकाणी वास्तव्यादरम्यान गांधीजींनी...
ऑक्टोबर 02, 2019
कऱ्हाड  ः सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील काही भाग दुष्काळीस्थिती असल्यामुळे टेंभू योजनेद्वारे त्या भागाला पाणी देण्यात येत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामासाठी योजनेचे सर्वच अधिकारी, कर्मचारी नियुक्त केल्याने योजना बंद करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचे दिसून येते. त्यामुळे दुष्काळ महत्त्वाचा की...
ऑक्टोबर 01, 2019
नवी मुंबई : पालिकेच्या बेलापूर येथील माता-बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रावसाहेब पोटे यांना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या आदेशावरून प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मिसाळ यांनी बुधवारी (ता.२५) संध्याकाळच्या सुमारास बेलापूरच्या रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली होती....