एकूण 2182 परिणाम
जून 26, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए-1 सरकारच्या कार्यकाळात विविध प्रकारच्या जाहिरातींवर तब्बल 5 हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी मागील आर्थिक वर्षात तब्बल बाराशे कोटी रुपये खर्च करण्यात आले. याबाबतची आकडेवारी 'ब्यूरो ऑफ आउटरीच अ‍ॅण्ड...
जून 26, 2019
नवी दिल्ली : आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणी मसुदा (एनआरसी) चे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या यादीतून जवळपास एक लाख लोकांना वगळण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आज (बुधवार) आसाम एनआरसीने नवी यादी जाहीर केली असून 31 जुलैला अंतिम मसुदा जाहीर करण्यात येणार आहे.  आसाम एनआरसीने आज...
जून 26, 2019
अलीगढ: कचोरीवाला एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला असून कर विभागाने दुकानदाराला नोटीस बजावली आहे. अलीगढमधील मुकेश कचोरीवाल्याचे वार्षिक उत्पन्न 60 लाख रुपये ते 1 कोटी रुपये असून मुकेशने जीएसटीसाठी नोंदणी केलेली नाही, असे कारण देत कर विभागाने दुकानदाराला नोटीस बजावली आहे. गेल्या 12 वर्षांपासून मुकेश...
जून 26, 2019
नवी दिल्ली : राजर्षी शाहू महाराजांच्या 145 व्या जयंतीनिमित्त आज (बुधवार) दिल्लीतील महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येत संसदेच्या आवारातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. Remembering Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj on his birth anniversary today. A progressive ruler,...
जून 25, 2019
नवी दिल्ली : सशक्त होण्याची संधी भारताने सोडता कामा नये. लोकसभेत झालेला विजय हा देशातील जनतेचा विजय आहे. जनतेसाठी झटून काम केल्याने आम्ही पुन्हा विजयी झालो आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) सांगितले. तसेच पाच वर्षांत केलेल्या कामांमुळे अविरत असे यश मिळाले, असेही ते म्हणाले....
जून 25, 2019
रेवाडी (हरियाणा) : भारतीय जनता पक्षाचे नेते सतीश खोडा यांची मोटार विरुद्ध बाजूने आल्यानंतर सुरक्षारक्षकाने अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मोटारीने सुरक्षारक्षकाला धडक देत 300 मीटर फरफटत नेल्याची घटना घडली आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेवाडीच्या भाडावास रेल्वे फाटकावर ही...
जून 25, 2019
नवी दिल्ली : ई-पासपोर्टच्या निर्मितीला प्राधान्य देत परराष्ट्र मंत्रालयाने तसा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी (ता.24) दिली. प्रवासाच्या कागदपत्रांसाठी आधुनिक सुरक्षाव्यवस्था लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, असे ते म्हणाले.  सातव्या पासपोर्ट सेवा...
जून 24, 2019
नवी दिल्ली : 'मेट्रो मॅन' या नावाने सर्वांना परिचित असणाऱ्या पद्मविभूषण ई. श्रीधरन यांनी लखनौ मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एलएमआरसी) मुख्य सल्लागारपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थाच्या कारणास्तव श्रीधरन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी ते प्रतिष्ठित दिल्ली मेट्रोचेसुद्धा अध्यक्ष...
जून 24, 2019
रांची : चोरी केल्याच्या संशयावरून बेदम मारहाण झालेल्या मुस्लिम युवकाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शम्स तरबेज अन्सारी असे या युवकाचे नाव असून, त्याला बळजबरी जय श्रीरामच्या घोषणा द्यायला लावल्या होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखंडमधील सिरीईकेला खर्सवान जिल्ह्यातील धतकिडीह गावात...
जून 24, 2019
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील रामपूरमध्ये सहा वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिच्या खून केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीवर पोलिस अधीक्षक (एसपी) अजयपाल शर्मा यांनी चक्क गोळीबार करत त्याला जखमी केले.  रामपूर येथे गेल्या महिन्यात 7 मे रोजी एका सहा वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार...
जून 24, 2019
नवी दिल्ली : एअर इंडियाच्या एका पायलटने ऑस्ट्रेलियातील सिडनी विमानतळावर असलेल्या एका स्टोअरमधून पाकीट चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एअर इंडियाने संबंधित पायलटला निलंबित करीत चौकशीचे आदेश दिले आहेत. रोहित भसिन हे एअर इंडियाचे वरिष्ठ पायलट असून, पूर्व विभागाच्या संचालकपदाची जबाबदारीही...
जून 24, 2019
पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना प्राप्तिकर विभागाने दणका दिला आहे. लालू यादव यांची तब्बल 3.7 कोटींची बेहिशेबी संपत्ती जप्त करण्यात येणार असून, यामध्ये पाटण्यातील काही घरांचाही समावेश आहे.  पाटण्याच्या जयप्रकाश नारायण विमानतळाजवळ लालूप्रसाद यादव...
जून 23, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवावी आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय 65 करावे, अशी विनंती सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे केली आहे. न्यायालयांमध्ये अनेक प्रलंबित प्रकरणे असून, त्यांचा निपटारा करण्यासाठी अधिक संख्येने...
जून 22, 2019
नवी दिल्ली : आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थतज्ज्ञ आणि उद्योग विश्वातील तज्ज्ञांशी संवाद साधला. मोदी सरकारच्या (एनडीए-2) कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. निती आयोगाने आयोजित केलेल्या 'इकॉनॉमिक...
जून 22, 2019
नवी दिल्ली : 'पिलाटस बेसिक ट्रेनर' विमानांच्या खरेदीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शस्त्रास्त्र डिलर संजय भंडारी याच्यासह इतर काही अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. भारतीय हवाई दलासाठी 2009 मध्ये 75 पिलाटस एअरक्राफ्ट खरेदीचा 2895 कोटी रुपयांचा करार स्विस...
जून 22, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या मुलीबाबत एक पोस्ट शेअर केली आहे, त्यावर कालपासून चर्चा सुरू आहे. त्यांच्या मुलीला- जोईश इराणीला शाळेतील मुलांनी तिच्या लूकवरून चिडवले. यावर स्मृती इराणी भडकल्या व त्यांनी इन्स्टावर पोस्ट टाकत आपला राग व्यक्त केला. 'मी काल...
जून 21, 2019
भुवनेश्वर : जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा येथे दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटामध्ये हुतात्मा झालेल्या जवानाचे पार्थिव तिरंग्याऐवजी राजकीय पक्षाच्या झेंड्यामध्ये लपेटल्याचे आढळून आले आहे. एका नेटिझन्सने ट्विटरवर हे छायाचित्र अपलोड केले आहे. हुतात्मा जवानांचे पार्थिव हे राष्ट्रध्वजामध्ये लपेटले जाते...
जून 21, 2019
नवी दिल्ली : 'वायू' चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्याने भारतातील अनेक शहरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येत्या 2020 पर्यंत राजधानी नवी दिल्ली, बंगळूर, चेन्नई, हैदराबादसह 21 शहरांतील भूगर्भातील पाणीपातळी संपुष्टात येईल आणि त्याचा फटका दहा कोटी नागरिकांना बसेल, असा इशारा...
जून 20, 2019
नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील मेचुकाजवळ 3 जूनला भारतीय वायुसेनेच्या (आयएएफ) एएन-32 या वाहतूक विमानाची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेतील 13 जणांचे मृतदेह शोधण्यात शोधपथकाला यश मिळाले आहे. दुर्घटनेतील मृतांचे मृतदेह अंतिम संस्कारांसाठी त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहेत.  खराब हवामानामुळे...
जून 20, 2019
आयबीपीएस मार्फत बँकींग क्षेत्रातील 8400 पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जुलै 2019 ही आहे. या पदभरती संदर्भात कोणत्या पदांसाठी नेमक्या किती जागा आहेत आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किती...