एकूण 90 परिणाम
मे 19, 2019
पुणे - जी पावले कॅनव्हासच्या दिशेने पडायला हवी, ती उसाच्या फडात पडली. ज्या हातात रंगांचा कुंचला हवा, त्या हातात ऊस तोडण्याचा विळा... तरीही याच हातातून अनेक कलाकृतींनी जन्म घेतला. त्यातूनच साकारली गेली असामान्य चित्रे. जगण्यासाठी आयुष्यभर मिळेल ती मजुरी केली. परंतु, आयुष्याचा खरा अर्थ शोधण्यासाठी...
मे 17, 2019
जळगाव - एखाद्या ठिकाणी अपघात झाला की, अपघातग्रस्तांची मदत न करता त्यांचे फोटो काढत असल्याने अनेकांना उपचाराअभावी आपला जीव गमवावा लागला असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत; परंतु अपघात झाल्याचे समजताच हातातील काम सोडून अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारा देवदूत म्हणून राजेंद्र भाटिया यांची अशी...
मे 13, 2019
पुणे - शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे डॉ....
मे 09, 2019
येरवडा - वाघरी आणि शिकलगार समाजाच्या कुटुंबीयांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. या समाजातील मुलांना शैक्षणिक सुविधांचा लाभ देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश चेतन भागवत यांनी...
मे 07, 2019
सांगली - सांगलीचे हरित वैभव असलेल्या आमराईच्या समृद्धीसाठी काल शेकडो सांगलीकरांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत श्रमदान केले. महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनीही नागरिकांच्या बरोबरीने योगदान देत आमराई चकाचक करण्यात  हातभार लावला. यावेळी आमराईतील सुमारे हजार झाडांभोवती श्रमदानातून आळी करणे, खत...
एप्रिल 26, 2019
राशिवडे बुद्रुक - सेवानिवृत्तीनंतरचं गेट टुगेदर म्हणजे अनेक आठवणींना उजाळा, जीवनातील बऱ्या-वाईट घटना उलगडण्याचं निमित्त मानून ते सारे एकत्र येत. एक दिवसाची मौज करून घरी परतत. पण यावेळी त्यांचा मूड बदलला. ‘सकाळ’ने केलेल्या राधानगरी अभयारण्य स्वच्छतेवर प्रभावित होऊन त्या उपक्रमाचा एक हिस्सा होण्याचा...
एप्रिल 08, 2019
केरळमधील पुरात ‘महादेव’ गटांगळ्या खात होता.. दोन वर्षांचा ‘कारो’ जखमी अवस्थेत सोलापुरात फिरत होता.. ‘सीना’ची अवस्थाही अशीच होती. कोणी तरी येईल आणि असह्य वेदनांतून मुक्ती देईल या प्रतीक्षेत अंगभर वेदना घेऊन पंढरपुरात फिरत होती. ‘सोन्या’ आणि ‘गुणा’चे खांदे निखळले होते. प्रत्येकाच्या कहाण्या...
एप्रिल 01, 2019
पिंपरी-  ‘‘मागील दोन वर्षांपासून ‘मिशन शक्ती’ची तयारी सुरू होती. ६ महिन्यांत तयारीने जोर धरला. आम्ही सर्व शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी दिवस-रात्र एक करून ‘मिशन शक्ती’ मोहीम यशस्वी केली. प्रत्येकाकडे पैसा, संपत्ती, ऐश्‍वर्य येत राहते; परंतु देशासाठी काहीतरी करतोय, ही भावना खूप मोठी आहे. त्यातून खरे...
मार्च 24, 2019
चिपळूण - येथील गद्रे हायस्कूलच्या विद्यार्थिनी अनुष्का संदीप भागवत व वैष्णवी अनंत मोरे यांनी पाणी बचतीवर केलेल्या प्रयोगाची निवड लक्‍झेंबर्ग विद्यापीठाने (जर्मनी) आयोजित केलेल्या विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. मंगळवारी (ता. १९) आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात प्रयोग सादर करण्यासाठी या दोघी रवाना...
मार्च 22, 2019
मालेगाव कॅम्प - जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून बुधवारी (ता. २०) तळवाडे (ता. मालेगाव) येथील भामेश्‍वर युवा मित्रमंडळाच्या सदस्यांनी चिमण्या-पाखरांसाठी गाव परिसरातील झाडांवर १५० मातीची भांडी ठेवून दाणापाण्याची व्यवस्था केली. पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत या ध्येयवेड्या युवकांनी पदरमोड करून गाव...
मार्च 18, 2019
कळमनुरी - सामाजिक बांधिलकी जोपासत लासिना येथील युवकाने आपल्या विवाह सोहळ्यावर होणारा अनावश्‍यक खर्च टाळून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी एक लाखाची मदत केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं दत्तक घेणाऱ्या एका संस्थेकडे त्यांनी नुकतीच ही मदत सुपूर्द केली.  आई-वडील सालगडी म्हणून काम करीत...
मार्च 18, 2019
सांगली - विविध सामाजिक उपक्रम राबवण्याच्या उद्देशाने श्रीमती चंपाबेन बालचंद शाह महाविद्यालयातर्फे ‘माणुसकीची भिंत’ हा अनोखा उपक्रम शहरात राबविण्यात आला. परिसरातील नागरिकांकडून जुने कपडे संकलन करून ते गरजूंपर्यंत पोहचवण्यात आले. माजी विद्यार्थिनींनी हा पुढाकार घेतला. ‘माणुसकीची भिंत’ उपक्रमाचा लाभ...
मार्च 07, 2019
शिरूर - पत्नी आणि मुलाबाळांचा त्याचा संसार. आचारी म्हणून काम करून कुटुंबाचा चांगला उदरनिर्वाह चाललेला. पण या सुखी संसाराला दृष्ट लागावी तसे झाले. कर्ता माणूसच हृदयविकाराने गेला आणि अवघे कुटुंब उघड्यावर आले. पण गाव एक झाला आणि त्यांनी ‘या कुटुंबाची जबाबदारी आता गावाची’, असा निर्धार करून तब्बल ११ लाख...
फेब्रुवारी 27, 2019
बेळगाव -  मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत असल्याची ओरड सातत्याने केली जात आहे. परंतु, शिक्षकांनीच प्रयत्न केल्यास मराठी शाळांमध्येही पटसंख्या वाढू शकते, हे कॅंटोन्मेंट मराठी शाळेने दाखवून दिले आहे. विविध उपक्रम आणि दर्जात्मक शिक्षणामुळे या शाळेत प्रवेशासाठी गर्दी होत...
जानेवारी 28, 2019
सुपे - पारंपरिक ढोल-लेझीम या खेळाचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. या पार्श्‍वभूमीवर काऱ्हाटी (ता. बारामती) येथील काही ज्येष्ठ मंडळींकडून तरुण पिढीला या खेळाचे धडे दिले जात आहेत.    संत सावतामाळी लेझीम मंडळाच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू आहे. ग्रामदैवत श्री यशवंतराय मंदिराच्या आवारात तर कधी...
डिसेंबर 04, 2018
नागठाणे - सुश्‍मिता ही गुजराती दांपत्यांची कन्या. आई दुसरी शिकलेली, तर वडील तिसरी. गावोगावच्या आठवडा बाजारात दोघेही मसाल्याचे पदार्थ विकणारे. हातावरचे पोट असणारे. मात्र, जिद्दीच्या पंखाचे बळ असेल, तर परिस्थिती आड येत नाही, हे सुश्‍मिताने दाखवून दिले आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...
नोव्हेंबर 23, 2018
सांगवडेवाडी - गावात तलाव असणे म्हणजे गावची शान समजली जाते. अशाच वसगडे (ता. करवीर) येथील गाव तलावाचे रूप पालटले ते विवेकानंद कॉलेज, ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या सहकार्यातून. येथे ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेचे शूटिंग सुरू असून रोज सुमारे पाचशे पर्यटक भेट देतात. या तलावाजवळ छायाचित्र काढतात. सूर्य...
ऑक्टोबर 15, 2018
कोरेगाव - तो तसा जन्मतः पूर्ण अंध. पण, जात्याच हुशार. अंधाऱ्या आयुष्यात पांढऱ्या काठीच्या साथीने त्याने वाटचाल केली. ‘डीएड’ पर्यंत शिक्षण घेतले. तरीही नोकरी नव्हती म्हणून तो रडत बसला नाही. चार वर्षे खेड्यापाड्यात फिरून शाळांना खडू विकून त्याने आपल्या चरितार्थासाठी कुटुंबाला मदत केली. नोकरीही लागली...
ऑक्टोबर 09, 2018
नागठाणे : शिक्षक म्हणजे गावच्या विकासाचा वाटाड्या हे समीकरण आजही खेडोपाडी रूढ आहे. त्याचीच प्रचिती देताना दुर्गम भागात कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने गावातील वीस महिलांना 'मिश्री'मुक्तीची वाट दाखविली. इतकेच नव्हे, तर त्याने या महिलांचा स्वखर्चाने साडी- चोळी देऊन सत्कार केला. मोगरवाडी (ता. पाटण) हे...
सप्टेंबर 15, 2018
वारजे माळवाडी -  कर्वेनगर येथील बिजली चौकात दोन वर्षांचा मुलगा सापडला. मात्र, त्याला नाव, पत्ता व आई- वडिलांचे नाव सांगता येईना. त्यामुळे पोलिसांनी त्याला गल्लोगल्ली फिरवून, त्याच्या माता- पित्याचा शोध घेतला.  सायंकाळी सातच्या सुमारास रस्त्याच्या कडेला अंधारात रडत असलेला मुलगा अमर भोसले व राजू शेख...