एकूण 24 परिणाम
जून 08, 2019
खारघर : नवी मुंबई विमानतळच्या कामासाठी गाव आणि परिसरातुन काढलेल्या तीन हजार  हजार झाडांचे खारघर मध्ये  पुनर्रोपण करण्यात आले होते.  एकीकडे पर्यावरण वाचविण्याचा संदेश दिला जात असताना दुसरीकडे मात्र सिडकोकडून पुनर्रोपण करण्यात आलेल्या झाडांची मात्र योग्य प्रकारे निगा न राखल्याने मोठ्या प्रमाणात झाडे...
मे 14, 2019
नवी मुंबई - शाळांना उन्हाळ्याची सुट्टी लागल्यामुळे शहरातील महापालिकेची उद्याने सध्या बच्चे कंपनीने गजबजलेली आहेत. नेरूळमधील वंडर्स पार्क व संत गाडगेबाबा उद्यान (रॉक गार्डन), वाशीतील मिनी सी-शोअर, बोटिंग आणि मीनाताई ठाकरे उद्यानातील टॉय ट्रेन लहानग्यांचे आकर्षण ठरले आहे. मुलांचे प्रमाण वाढल्याने...
एप्रिल 22, 2019
वाशी - झोपाळे, घसरगुंडी, कासवाची भव्य प्रतिकृती यामुळे वाशीजवळच्या कोपरी गावातील ॲम्युजमेंट पार्क बच्चे कंपनीचे आवडते ठिकाण झाले आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे तर  सकाळ- संध्याकाळ हे उद्यान गर्दीने फुललेले असते. यामध्ये सध्या मोफत प्रवेश देण्यात येतो. नवी मुंबईतील प्रत्येक उपनगरात छोटी-मोठी उद्याने...
फेब्रुवारी 05, 2019
ऐरोली - उद्यानांचे शहर म्हणून शेखी मिरवणाऱ्या नवी मुंबई शहरातील महत्त्वाच्या विभागांपैकी एक असलेल्या नेरूळमधील काही उद्यानांची हिरवळ सुकत चालली आहे; तर काहींच्या प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचे ढीग आहेत. अनेक ठिकाणी तर प्रवेशद्वार तुटले आहेत. नवी मुंबई पालिका स्वच्छ भारत अभियानात पहिल्या क्रमांक...
जानेवारी 03, 2019
नवी मुंबई - सार्वजनिक स्वच्छतागृहांतील अस्वच्छता, अंगावर शिरशिरी आणणारी तेथील दुर्गंधी, नैसर्गिक हाकेला ओ देण्यासाठी केवळ अगतिकतेतून तोंडाला रुमाल बांधून, नाक मुठीत धरून नागरिकांना तेथे जावे लागते, हा तुम्हा-आम्हाला येणारा सार्वत्रिक अनुभव! याबाबत ढिगभर तक्रारींनंतरही संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष...
सप्टेंबर 12, 2018
मुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणी बाग) दीड वर्षांपूर्वी दाखल झालेल्या पेंग्विनच्या देखभाल, पालनपोषणाची जबाबदारी आता खासगी कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. यासाठी तीन वर्षे कालावधीच्या १२ कोटी खर्चाच्या प्रस्तावास मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. भाजपचा विरोध डावलून...
ऑगस्ट 05, 2018
बारामती : गेल्या काही दिवसात राज्यात उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर समाजात सलोखा नांदावा या साठी आजपासून बारामतीतून मराठा संवाद यात्रेस प्रारंभ झाला. प्रशांत नाना सातव यांनी मराठा संवाद यात्रेचे आयोजन केले असून बारामतीतून निघून मुंबईला नऊ ऑगस्टला आझाद मैदानात या यात्रेचा समारोप होणार आहे....
जुलै 03, 2018
तुर्भे - नवी मुंबई महापालिकेने वन महोत्सवानिमित्त एक लाख १८ हजार रोपांची लागवड करण्याचे निश्‍चित केले आहे. या नियोजनबद्ध मोहिमेचा प्रारंभ रविवारी (ता. १) झाला.  ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात प्राईड ऑफ इंडिया म्हणून नावाजलेल्या ताम्हण रोपांची लागवड या वेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. पावणे...
जून 28, 2018
तुर्भे - अमली पदार्थांच्या व्यसनातून तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असल्याचे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या होत असल्याचे धक्कादायक वास्तव यामुळे उघड झाले आहे. नवी मुंबईतील तरुणाईतही व्यसनांचे प्रमाण...
जून 28, 2018
नवी मुंबई - सावित्रीच्या लेकींसाठी नवी मुंबई महापालिकेने आता पुढाकार घेतला आहे. त्यात पालिका शहरात एक हजार वटवृक्ष लावणार आहेत. नवी मुंबईत सध्या तीन हजार वटवृक्ष आहेत. वटपौर्णिमेबरोबरच त्याचे इतरही नैसर्गिक फायदे असल्यामुळे वटवृक्षांच्या लागवडीवर पालिका भर देणार आहे.  शेकडो वर्षांच्या आयुर्मानामुळे...
मे 07, 2018
नवी मुंबई - ऐरोली-काटई नाका बोगद्याच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी ठाणे-बेलापूर मार्गावरील ऐरोली येथील १२१ झाडांची छाटणी करण्यात येणार आहे. १२.५ किलोमीटरच्या या मार्गासाठी आणखी काही झाडांचा बळी दिला जाणार आहे. या प्रकारामुळे नवी मुंबईतील वृक्षप्रेमी आणि सामाजिक संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे. झाडे...
मार्च 08, 2018
तुर्भे - वाशीचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या चौपाटीलगत ९० झाडांची कत्तल करून तब्बल आठ हजार ४२० झाडे लावण्याचा घाट नवी मुंबई पालिकेने घातला आहे. अमृत योजनेअंतर्गत यासाठी एक कोटी ९९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. पण यासाठी पूर्ण वाढ झालेल्या सुबाभुळांचा बळी दिला जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये...
फेब्रुवारी 22, 2018
बेलापूर - घणसोली येथील सेंट्रल पार्कमुळे बाधित होणाऱ्या सावली गावचे पुनर्वसन तीन महिन्यांत होईल. याबाबत पालिका आयुक्तांशी बोलणे झाले असून, त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्‍वासन दिले आहे, अशी माहिती आमदार संदीप नाईक यांनी दिली. महापौर जयवंत सुतार यांनी बुधवारी (ता. २१) आमदार नाईक यांच्यासोबत...
डिसेंबर 16, 2017
तुर्भे - पाम बीच मार्गावरील करावे येथील केंद्र सरकारच्या चाणक्‍य सागरी प्रशिक्षण संस्थेने मुख्य प्रवेशद्वारालगतची २० हून अधिक झाडे विनापरवानगी तोडल्याप्रकरणी नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने नोटीस बजावून जाब विचारला आहे; परंतु या नोटिशीला १५ दिवस झाले तरी संस्थेने उत्तर दिले नाही. त्यामुळे...
नोव्हेंबर 17, 2017
नवी मुंबई - २१ व्या शतकातील स्मार्ट सिटी अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेला डॉग पार्ककरिता खेळणी पुरवठादार मिळत नसल्याने हा प्रकल्प अडचणीत आला आहे. वाशीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी प्रशासनाकडे डॉग पार्कची मागणी केली होती. यावर पशुवैद्यकीय विभागाने...
सप्टेंबर 23, 2017
बेलापूर - जुईनगर सेक्‍टर 24 मधील उद्यानाला आंबेडकरी संघटनांनी "माता रमाबाई आंबेडकर' असे नाव दिल्यावर तेथील नगरसेवकाने "क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले' असे उद्यानाचे नामकरण करण्याचा प्रस्ताव प्रभाग समितीच्या बैठकीत मांडला आहे. हा वाद आता सोशल मीडियावर गेला आहे. तेथे नवी मुंबई शहराच्या जडणघडणीत...
सप्टेंबर 19, 2017
बेलापूर - जुईनगर प्रभाग- ८२ मधील सेक्‍टर- २४ येथील भूखंड क्रमांक एकवरील उद्यानाला आंबेडकरी संघटनांनी ‘माता रमाबाई आंबेडकर’ असे नाव दिले होते. त्याला विरोध करत नगरसेवकाने ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ असे नाव देण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा निर्णय प्रभाग समितीच्या बैठकीत घेतला असल्याने या...
सप्टेंबर 02, 2017
बेलापूर - नवी मुंबई शहर उद्यानांचे शहर म्हणून ओळखले जाते. परंतु, सानपाडा सेक्‍टर ७ मधील सीताराम मास्तर व संत शिरोमणी ही उद्याने सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत बंद ठेवली जातात. त्यामुळे येथील नागरिकांची गैरसोय होते; शिवाय बच्चे कंपनीचाही हिरमोड होतो. विशेष म्हणजे नेरूळ व सीवूडस्‌मधील अनेक उद्याने...
जुलै 20, 2017
बेलापूर - नेरूळ सेक्‍टर- १९ मधील वंडर्स पार्कमधील वाहनतळाच्या जागेचा वापर न करता प्रवेशद्वाराजवळ बेकायदा पार्किंग केले जात आहे. त्यामुळे येथील वाहनतळ ओस पडला आहे; तर दुसरीकडे पालिकेचा लाखोंचा महसूल बुडत आहे. नवी मुंबई शहराचे वैभव आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वंडर्स पार्कमध्ये दररोज शेकडो नागरिक...
मे 22, 2017
नवी मुंबई - नवी मुंबई महापालिका कोपरी गावाशेजारी अम्युझमेंट पार्क तयार करत आहे. त्याचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. त्यामुळे ते लवकरच नागरिकांसाठी खुले होणार आहे. या पार्कचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे तयार केलेली कासवाची भव्य प्रतिकृती आहे. ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे...