एकूण 46 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 09, 2019
विकास लोकांना भावेल असा नाही तर लोकांना कामाला येईल, असा  पनवेलचा विकास झाला पाहिजे. ‘साफ नियत, सही विकास’ हेच आमचे धोरण असणार आहे, असा विश्‍वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात  ‘कॉफी विथ सकाळ या विशेष मुलाखतीदरम्यान ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री...
सप्टेंबर 25, 2019
पनवेल : महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आलेली आठ कोटी १४ लाखांची रक्कम कारखानदारांनी एमआयडीसीकडे जमा करावी, याकरिता तळोजा औद्योगिक परिसरातील ९७४ कारखान्यांना एमआयडीसीकडून पुन्हा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. वेळेत रक्कम जमा करणाऱ्या कारखान्यांचादेखील यात समावेश...
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा ते रबाळे दरम्यान मागील दोन महिन्यांपासून रस्त्याच्या कडेला असणारे पथदिवे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असून, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना वाहनांच्या हेडलाईटच्या रोषणाईवर वाहने चालवावी लागत आहेत; तर या अंधारामुळे पादचाऱ्यांची...
सप्टेंबर 23, 2019
नवी मुंबई : नवी मुंबईतील मुकुंद कंपनीनजीक रामनगरपासून एमआयडीसीला जाण्याकरिता नवीन रस्ता वर्षभरापूर्वी बांधण्यात आला आहे. या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असूनही या ठिकाणी पदपथावर आणि रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसवण्यात आलेले नाहीत. या ठिकाणी रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असल्याने...
सप्टेंबर 07, 2019
नवी मुंबई : ठाणे व नवी मुंबईच्या वेशीवरील प्रस्तावित दिघा रेल्वेस्थानकाजवळ ठाणे-बेलापूर मार्गावर होत असणाऱ्या दैनंदिन वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दिघा रेल्वेस्थानकाचे प्रवेशद्वार हे ठाणे-बेलापूर मार्गावरील ग्रीन वर्ल्ड या इमारतीजवळ होणार आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी मुंबईकडे...
सप्टेंबर 06, 2019
पनवेल : प्रदूषणप्रकरणी हरित लवादाने जिल्हाधिकाऱ्यांकडे १० कोटी रुपये जमा करण्याच्या दिलेल्या निर्देशानंतरही औद्योगिक वसाहतीमधील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या सीईटीपी सहकारी संस्थेने संपूर्ण रक्कम भरण्यास वेळकाढूपणा केल्यामुळे ३० सप्टेंबरपूर्वी उर्वरित रकमेसहित अतिरिक्त ५ कोटी रुपये असे एकूण ९...
ऑगस्ट 30, 2019
नवी मुंबई : ऐरोली नाट्यगृहाच्या ठिकाणी पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन करून त्या ठिकाणी प्लिन्थ करण्यासाठी खोदकाम करून ठेवले आहे. मात्र ८ मीटरपर्यंत करण्यात आलेल्या खोदकामामध्ये पाणी साचलेले असल्यामुळे या डबक्‍यात मागील आठवड्यात एका महिलेने आत्महत्या केली. तर एमआयडीसीच्या भूखंडावरील ऐरोली नॉलेज पार्क...
ऑगस्ट 17, 2019
नवी मुंबई : दिघ्यातील साने गुरुजी बाल उद्यान नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहे. उद्यान पाडून बांधकाम व्यावसायिकाला रस्ता काढून देण्यात येत असल्यामुळे साने गुरुजी बाल उद्यानासाठी पालिकेकडून करण्यात आलेला खर्च वाया गेला असून, त्यामुळे आता उद्यानाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. त्यामुळे रहिवाशांकडून नाराजी...
ऑगस्ट 15, 2019
नवी मुंबई ः नवी मुंबईतील मुकंद कंपनी नजीक रामनगरपासून रबाळे एमआयडीसीला जाण्याकरिता वर्षभरापूर्वी नवीन रस्ता बांधण्यात आला. या रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतानाही या ठिकाणी पदपथावर आणि रस्त्याच्या दुतर्फा पथदिवे बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरले असून, या...
ऑगस्ट 10, 2019
नवी मुंबई ः जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जलप्रलयाचा सर्वाधिक फटका तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावाला बसला. या नाल्याचे पाणी वस्तीतील रहिवाशांच्या घरात शिरल्याने अनेकांचे संसार वाहून गेले; मात्र त्यानंतर घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मनपा आयुक्त डॉ. एन. रामस्वामी यांनी या ठिकाणी पाहणी दौरा केला होता....
ऑगस्ट 09, 2019
बदलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रकल्प पूर्ण झाल्याने भविष्यात पाण्याची टंचाई भासणार नाही, असा विश्वास राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. उंची वाढल्यावर पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागलेल्या बारवी धरणाचे जलपूजन गुरुवारी उद्योगमंत्री देसाई...
ऑगस्ट 08, 2019
मुरबाड : मुरबाड तालुक्‍यातील बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या कोळे गावाला बेटाचे स्वरूप आले आहे. गावाला तिन्ही बाजूने बारवी धरणाचे पाण्याने वेढले आहे. तर चौथी बाजू जंगलाने वेढली असून, या मार्गावर दोन ओढे ओलांडावे लागतात. गावातून मुख्य रस्त्यावर येण्यासाठी ग्रामस्थांना बोटीवर अवलंबून रहावे...
ऑगस्ट 05, 2019
मुंबई ः नवी मुंबई शहरातील ठाणे-बेलापूर महामार्गासह एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील रस्ते मागील महिनाभरापासून संततधार सुरू असणाऱ्या पावसामुळे खड्डेमय झाले आहेत. पावसाळा सुरू होण्याअगोदर रस्त्यांची डागडुजी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले होते. महापालिकेच्या संबंधित विभागाकडून या खड्ड्यांची...
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : नवी मुंबई शहरातील अनेक अंतर्गत रस्ते दर्जेदार बनवण्यात न आल्याने या रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांबरोबरच वाहनचालकांचीही चांगलीच दमछाक होत असल्याने आधुनिक शहर ते हेच का? अशी म्हणण्याची वेळ नवी मुंबईकरावर आली आहे.  ऐरोली येथील सेक्‍टर ५,१६, दिवा सर्कल, घणसोलीमधील रबाळे, गोठिवली,...
ऑगस्ट 02, 2019
ठाणे : पाण्याची वाढती मागणी आणि जिल्ह्यावर कोसळलेले पाणीकपातीचे संकट पाहता राज्य सरकारने औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) बारवी धरणात अतिरिक्त पाणीसाठा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार यंदा बारवी धरणात अतिरिक्त पाणीसाठा करण्यात येत असून आजच्या घडीला हे धरण अतिरिक्त क्षमतेनुसार ७५ टक्के भरले...
जुलै 29, 2019
नवी मुंबई ः मुंबई, ठाण्यालगत पर्यायी शहर म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती झाली. या निर्मितीच्या वेळी औद्योगिक कंपन्यांना अग्रक्रम देण्यात आला. मात्र, असे असले तरी दिघा, रबाले, महापे, तुर्भे, नेरूळ या महत्त्वपूर्ण औद्योगिक पट्ट्यात आजही मूलभूत सुविधेबरोबरच पार्किंगची समस्या भेडसावत आहे.  दिघा...
जुलै 28, 2019
मुंबई ः नवी मुंबई शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेने उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, स्वच्छ भारत अभियान झाल्यानंतर उघड्यावर शौचास जाणाऱ्यांवरील कारवाई थंडावली असून, पहाटेच्या वेळी हागणदारीमुक्तीसाठी पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची वाजणारी शिट्टीही आता बंद झाली...
जुलै 15, 2019
नवी मुंबई : स्थायी समितीमध्ये मंजूर होणाऱ्या विकास कामांच्या कंत्राटावरील मलिदा खाणाऱ्यांना आता लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचा दणका बसण्याची शक्‍यता आहे. महापालिका प्रशासनाने कंत्राटदार आणि काही लोकप्रतिनिधींची माहिती लाचलुचपत विभागाकडे सोपवल्याचे विश्‍वसनीय सुत्रांकडून समजले आहे. विशेष म्हणजे...
जानेवारी 21, 2019
पुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणातील’ (एसपीव्हीए) सहभागासंदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) सिडको, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महांमडळ) यांच्याकडून अभिप्राय...