एकूण 359 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
ठाणे : २१ ऑक्‍टोबरला राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. डोंबिवली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सावित्रीबाई फुले नाट्यगृह, तर कल्याण ग्रामीण मतदारसंघासाठी तरण तलाव येथे मतमोजणी होणार आहे. या कामासाठी सावित्रीबाई फुले नाट्यगृह पुढील १३ दिवसांसाठी, तर तरण तलाव ३ दिवसांसाठी बंद ठेवण्यात...
ऑक्टोबर 15, 2019
  उल्हासनगर : विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पाच ठिकाणी छापेमारी करून झाडाझुडपात लपवून ठेवलेल्या तब्बल सव्वासातशे लिटर हातभट्टीच्या दारू साठ्याचा वॉश नष्ट केला आहे. याप्रकरणी एका महिलेसह ११ आरोपींच्या मुसक्‍या आवळण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेचा माजी अध्यक्ष वरियाम सिंग याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुहू चौपाटी परिसरात त्याची तब्बल २५०० कोटींची मालमत्ता असल्याचे समजते. याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्याने नकार दिल्याचे एका...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भारत सरकारच्या "मेक इन इंडिया' उपक्रमाला अनुसरून इलेक्‍ट्रिक स्कूटर्सचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांनी सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या आनंदात भर घालण्यासाठी ई-स्कूटर्सवर विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. ओकिनावा स्कूटर्स, हीरो इलेक्‍ट्रिक या कंपन्यांनी ग्राहकांसाठी लकी ड्रॉ स्पर्धेसह 3 हजार...
ऑक्टोबर 14, 2019
महाड (बातमीदार) : इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शिकारी पक्षीगण संवर्धन परिषदेमध्ये रायगड जिल्ह्यातील गिधाड संवर्धन कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. भारतीय गिधाडांवरील रायगड जिल्ह्यातील गिधाड प्रकल्पांवर पक्षीतज्ज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांनी या परिषदेत स्लाईड शोद्वारे आपले सादरीकरण केले...
ऑक्टोबर 14, 2019
पोलादपूर : कशेडी घाटात नेहमीच अपघात घडत असतात. म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी गृहखात्याने महामार्गावर पोलिस ठाण्याची निर्मिती केली आहे. त्या अनुषंगाने पोलादपूर तालुका व रत्नागिरी जिल्हा या दोघांच्या सीमेवर कशेडी टॅपचीही निर्मिती करण्यात आली आहे. या कशेडी टॅप...
ऑक्टोबर 14, 2019
ठाणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. मुख्य नेत्यांच्या सभा झाल्यानंतर प्रचारासाठी उरलेल्या शेवटच्या रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त गाठत उमेदवार पायाला भिंगरी लावून प्रभागातील कोपरान्‌ कोपरा पिंजून काढताना दिसून आले. प्रचार रॅली, गृहसंकुलांना भेटीगाठी देत...
ऑक्टोबर 14, 2019
  ठाणे : दिवाळीसण, लग्नसराई, औषधोपचारांनादेखील हातात पैसे नसल्याने पीएमसी बॅंकेतील खातेधारक सध्या आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे मिळाले नाही, तर विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू; असा इशारा देत पीएमसी बॅंक खातेधारकांनी रविवारी ठाण्यात मूक मोर्चा काढला. खातेधारकांशी...
ऑक्टोबर 14, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महिला कार्यकर्त्या महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे चित्र सध्या पनवेल परिसरात पाहायला मिळत आहे. घरातील काम सांभाळून वेळ भेटेल तसा आपापल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी झटणारी महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी कामाला लागल्याचे दोन्ही पक्षांच्या मिरवणुकांमध्ये...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 14, 2019
खोपोली (बातमीदार) : रविवारच्या सुट्टीच्या दिवसामुळे खोपोलीत प्रचाराचा पारा सकाळपासूनच गरम झाला. युतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या शहरातील शिवसेना-भाजप व आरपीआय नेते व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार मोहीम राबविली. दुसरीकडे आघाडीकडूनही राष्ट्रवादी, काँग्रेस-शेकाप व समविचारी पक्षनेते व...
ऑक्टोबर 14, 2019
अलिबाग : अनेक प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरलेले अलिबाग मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सातही मतदारसंघातील ७८ उमेदवारांत ते याबाबत आघाडीवर आहेत.  घरगुती हिंसाचार, चोरी, मारामारी, जमीन हडप करणे या संदर्भात अलिबाग पोलिस...
ऑक्टोबर 14, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येऊन ठेपला आहे, तसतशी पनवेल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारातील रंगत वाढू लागली आहे. बुधवारी (ता. १६) खारघरमध्ये होणाऱ्या प्रचारसभेत  पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ उपस्थित राहणार आहेत.  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 10, 2019
अलिबाग (बातमीदार) : रस्त्यांची झालेली बिकट अवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट आदींमुळे शिवसेनेचे अलिबाग मतदार संघातील उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात नागरिकांमध्ये आक्रोश आहे. त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्‍यता आहे. दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या थळ जिल्हा...
ऑक्टोबर 09, 2019
विकास लोकांना भावेल असा नाही तर लोकांना कामाला येईल, असा  पनवेलचा विकास झाला पाहिजे. ‘साफ नियत, सही विकास’ हेच आमचे धोरण असणार आहे, असा विश्‍वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात  ‘कॉफी विथ सकाळ या विशेष मुलाखतीदरम्यान ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री...
ऑक्टोबर 09, 2019
महाड (बातमीदार) : महाड येथील सीस्केप संस्थेचे प्रेमसागर मेस्त्री यांची इंडोनेशिया (बाली) येथे ९ ते १६ आक्‍टोबर दरम्यान होणाऱ्या अकराव्या जागतिक आशियाई शिकारी पक्षी संशोधन-संवर्धन परिषदेत ‘गिधाड’ या विषयावरील संशोधन प्रबंधासाठी निवड करण्यात आली आहे.  जगातील ६० ते ७० देशांतून विविध शिकारी पक्षांच्या...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि जेएनपीटीचे विश्‍वस्त महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. बालदी यांनी अर्ज मागे घ्यावा, याकरिता विरोधकांनी देव पाण्यात ठेवले होते; परंतु बालदी यांनी माघार न घेतल्यामुळे विरोधकांचे मनसुबे उधळले...
ऑक्टोबर 08, 2019
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने पनवेल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात १० उमेदवार राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये शेकापकडून डमी अर्ज दाखल केलेले गणेश कडू, अरुण कुंभार, तसेच अपक्ष म्हणून...
ऑक्टोबर 07, 2019
कर्जत (बातमीदार) : कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व मित्र पक्ष यांचा संयुक्त कार्यकर्ता मेळावा सोमवारी (ता. ७) होणार आहे. हा मेळावा कर्जत दहिवली येथील यशदा मंगल कार्यालयात होणार आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात आघाडीच्या प्रचाराची रणनीती...