एकूण 27 परिणाम
जुलै 08, 2019
ठाणे:  देशात वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र, नवीन रोजगार निर्मिती बाजूलाच राहिली असून दिवसेंदिवस कंपन्या बंद होत असल्याने अनेकांचे रोजगार हातातून निसटू लागले आहेत. याच्या निषेधार्थ सोमवारी ठाणे स्टेशन परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ‘ढोल...
जून 07, 2019
नवी मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक निवृत्ती जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक 29 च्या जागेसाठी पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे त्यांच्या पत्नी नीलम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवृत्ती जगताप यांचे समाजकार्य लक्षात...
एप्रिल 29, 2019
मुंबई : मुंबईतील सर्वांत जास्त लक्षवेधी लढत असलेल्या उत्तर मुंबईत आज (सोमवार) सकाळपासून मतदानासाठी नागरिकांची गर्दी आहे. काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकर आणि भाजपकडून गोपाळ शेट्टी यांच्यात येथे थेट लढत आहे. सायंकाळी सातपर्यंत 57.27 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विद्यमान खासदार आणि राजकीय वजन असलेल्या...
एप्रिल 22, 2019
नवी मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कल्पकतेने मागण्या मांडण्याचा आणि प्रचाराचा नवा पांयडा पाडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कल्पक आंदोलनात नवी मुबंई मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांची भूमिका नेहमीच लक्षवेधी असते. यावेळी गजानन काळे यांनी भाजप-सेनेला कोपरखळी मारत गाजर विवाह सोहळ्याचे आयोजन...
मार्च 14, 2019
मुंबई - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पश्‍चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापुरातून शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचे बाण सुटणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत येत्या २५ रोजी युतीची पहिली संयुक्त प्रचारसभा येथे...
जानेवारी 18, 2019
नवी मुंबई - नवी मुंबई फ्री होल्डसंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश फसवा असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. अध्यादेशात सिडकोसोबतच्या फक्त ६० वर्षांच्या कराराला ९९ वर्षांपर्यंत मुदतवाढ देऊन नागरिकांची फसवणूक केली आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी भाजपवर शरसंधान साधले आहे. लोकसभा...
डिसेंबर 21, 2018
नवी मुंबई - सिडकोनिर्मित घरे, रहिवासी भूखंड आणि वाणिज्य मालमत्तांच्या भाडेपट्ट्याचा ६० वर्षांचा कालावधी वाढवून तो ९९ वर्षांचा करण्यात आला आहे. या महत्त्वाच्या निर्णयावर राज्याच्या नगरविकास विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. त्याचा फायदा सिडकोच्या हद्दीतील नवी मुंबईसह उरण-पनवेलमधील तब्बल एक लाख ३० हजार...
सप्टेंबर 12, 2018
मुंबई - भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणी बाग) दीड वर्षांपूर्वी दाखल झालेल्या पेंग्विनच्या देखभाल, पालनपोषणाची जबाबदारी आता खासगी कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे. यासाठी तीन वर्षे कालावधीच्या १२ कोटी खर्चाच्या प्रस्तावास मंगळवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. भाजपचा विरोध डावलून...
ऑगस्ट 23, 2018
तुर्भे - केरळमधील पूरग्रस्तांसाठी वाशीतील केरळ भवनमध्ये शहरातील नागरिकांकडून मदतीचा ओघ सुरूच आहे. येथून केवळ आठवडाभरात जवळपास पाच जहाजे आणि तीन ट्रक मदत केरळला रवाना झाली आहे. केरळमध्ये पुराने हाहाकार माजवल्याने त्यांना मदत करणाऱ्यांचे हात पुढे येत आहे. ही मदत केरळ पर्यटन विभागाकडून थेट केरळमधील...
ऑगस्ट 04, 2018
तुर्भे - सीवूड्‌स सेक्‍टर 44 मधील पोद्दार इंटरनॅशनल शाळेजवळच्या रस्त्यावर क्रेन व इतर भंगार वाहने पडून असल्याने त्याचा त्रास विद्यार्थी आणि पालकांना होत आहे. यामुळे येथे वाहतूक कोंडीचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. महापालिका इतर ठिकाणची भंगार वाहने हटवत असताना येथील वाहने का हटवत नाही, असा प्रश्‍न...
एप्रिल 08, 2018
बेलापूर : आगामी काळातील निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपचा आत्मविश्‍वास डगमगला आहे. अपयशाची भीती वाटल्याने कालच्या (ता. 6) भाजप मेळाव्यात एनडीए एकत्रित निवडणुका लढणार असल्याचे वक्तव्य भाजपचे अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ही टीका शिवसेना नेते व राज्याचे...
एप्रिल 06, 2018
मुंबई - भाजपच्या पक्ष स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी (ता. 6) वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्‍समध्ये होणाऱ्या महामेळाव्यासाठी राज्यभरातून पक्षाचे कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत. मेळाव्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेत शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत...
एप्रिल 04, 2018
डोंबिवली - पोस्ट ऑफीसमधे पासपोर्ट सेवा कार्यालय सुरु करण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्या ठिकाणी पुरेशी जागा नसल्याचे कारण देत हे कार्यालय कल्याण पश्चिममध्ये हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. डॉ शिंदे यांनी पासपोर्ट सेवा कार्यालय डोंबिवलीत आणण्यात...
डिसेंबर 12, 2017
नवी मुंबई - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी गोरे-बिंद्रे बेपत्ता प्रकरणात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजेश पाटील याला कळंबोली पोलिसांनी अटक केली. आज पनवेल न्यायालयात त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 15 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अश्‍विनी बेपत्ता...
नोव्हेंबर 07, 2017
कल्याण : कल्याण पूर्व मधील विविध मार्गावर धावत असणाऱ्या केडीएमटी बसेस बंद करण्यात आलेल्या त्या पुन्हा सुरू करण्यासाठी मुहूर्त भेटला असून या आठवड्यात गुरुवार ता 9 नोव्हेंबर पासून कल्याण पूर्व मध्ये विविध मार्गांवर केडीएमटी बस धावणार असल्याने नागरिकांत उत्सुकता लागली आहे. कल्याण डोंबिवली महानगर...
ऑक्टोबर 20, 2017
नवी मुंबई - नोव्हेंबरमध्ये महापौरपदाची मुदत संपणार असल्याने नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यात शिवसेना आघाडीवर आहे. शिवसेनेने राष्ट्रवादी व काँग्रेसचे नगरसेवक गळाला लावण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्‍यता तर...
सप्टेंबर 24, 2017
कल्याण : सोशल मीडियावर काय सुरू आहे मला माहित नाही, मला शासनाने नियुक्त केले आहे, त्यानुसार येथे काम करत आहे, अनेक विकास कामे हाती घेतल्याने कमी वेळेत जास्त नियोजनबद्ध काम करायचे आहे, मला काम कुणाला करून दाखवायचे नाही, नागरिकांना आवाहन आहे तुम्हाला मूलभूत सुविधा निश्चित मिळतील मात्र थोडा वेळ द्यावा...
सप्टेंबर 21, 2017
नवी मुंबई -  महापालिकेतील कायम व कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा "जोरात' जाणार असून, स्थायी समितीपाठोपाठ कर्मचाऱ्यांच्या बोनसच्या (सानुग्रह अनुदान) रकमेत महापालिकेच्या महासभेतही वाढ करण्यात आली. आता कायम कर्मचाऱ्यांना 20 हजार व कंत्राटी कामगारांना 15 हजार रुपये बोनस देण्याचा ठराव महासभेत मंजूर...
मे 04, 2017
नवी मुंबई - नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपमध्ये सुरू असलेली धुसफूस पुन्हा एकदा फ्री होल्डच्या मुद्द्यावरून बाहेर आली. सिडको अधिग्रहित जमिनींवर वसलेल्या वसाहती व भूखंड फ्री होल्ड करण्याला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर हे श्रेय आपले असल्याचे सांगण्यास भाजपने सुरुवात केली आहे. तर...
मे 03, 2017
नवी मुंबई - महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या झालेल्या निवडणुकीत पदे भोगलेल्यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्याने नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे; तर पक्षात माजी महापौरांचा...