एकूण 137 परिणाम
जुलै 23, 2019
मुंबई : महात्मा फुले मंडईची (क्रॉफर्ड मार्केट) डागडुजी होईपर्यंत मच्छीविक्रेत्यांची त्याच ठिकाणी पर्यायी व्यवस्था केली जाईल. त्यांना स्थलांतरित केले जाणार नाही, असे आश्‍वासन महापालिका आयुक्तांनी दिले आहे. मंडईतील मासळी विक्रेत्यांना मुंबईबाहेर हलवण्याच्या प्रश्‍नावर सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण...
जुलै 23, 2019
ठाणे : ठाण्यात पावसाचा लपंडाव सुरू असताना महापालिका क्षेत्रात गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. घराघरातील नळाद्वारे येणारे पाणी पिवळसर असल्याने कावीळ व नानाविध आजारांची लागण झाली असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेला महिनाभर हा गढूळ पाण्याचा त्रास नागरिकांना सोसावा...
जुलै 23, 2019
नवी मुंबई - नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरण क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत अद्यापपर्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत धरणात ५९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा समाधानकारक नसल्याने येत्या काही दिवसांत पावसाने ओढ दिल्यास पुन्हा ऑगस्टपासून पाणीकपातीचे संकट नवी...
जुलै 21, 2019
ठाणे : घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक मुला-मुलींना कलागुणांना मुरड घालावी लागते. या मुलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. शहरातील "गल्ली बॉय' यांना व्यापक व्यासपीठ देण्यासाठी "गल्ली आर्ट स्टुडिओ' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे आर्थिक...
जुलै 21, 2019
मुंबई - मुंबईत पावसाच्या येण्या-जाण्यामुळे आता साथीचे आजार डोके वर काढत आहेत. गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले असून, डेंगी आणि न्यूमोनियाचाही प्रादुर्भाव होत असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले.  पावसाने उघडिप दिल्यानंतर आर्द्रता वाढल्यामुळे साचलेल्या पाण्यात डेंगीच्या डासांची पैदास होत आहे. त्यामुळे डेंगीचे रुग्ण...
जुलै 19, 2019
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्यामुळे पाणीकपातीचे संकट टळले आहे. सध्या तलावांत 51 टक्के म्हणजे 203 दिवस पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द केल्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने शुक्रवारी (ता. 19) स्थायी...
जुलै 15, 2019
नवी मुंबई : स्थायी समितीमध्ये मंजूर होणाऱ्या विकास कामांच्या कंत्राटावरील मलिदा खाणाऱ्यांना आता लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाचा दणका बसण्याची शक्‍यता आहे. महापालिका प्रशासनाने कंत्राटदार आणि काही लोकप्रतिनिधींची माहिती लाचलुचपत विभागाकडे सोपवल्याचे विश्‍वसनीय सुत्रांकडून समजले आहे. विशेष म्हणजे...
जुलै 15, 2019
नवी मुंबई : महापालिकांतील टक्केवारी सर्वसामान्यांसाठी नवी नाही. सत्ताधारी नगरसेवकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक कंत्राटामागे काही टक्के रक्कम वसूल केली जाते, असे उघडउघड बोलले जाते. मात्र, यात केवळ सत्ताधाऱ्यांचाच वाटा नसून, टक्केवारीचे हे लोणी विरोधकांच्याही ताटात पडत असल्याचे वास्तव नुकतेच...
जुलै 13, 2019
मुंबई  : ‘फिफा... फिफा...’ अशा घोषणांनी पुन्हा नवी मुंबईचा आसमंत दणाणणार आहे. २०२० मध्ये होणाऱ्या १७ वर्षांखालील महिलांच्या फुटबॉल विश्‍वचषक सामन्यांच्या यजमानपदी नवी मुंबई शहराची निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉल असोसिएशनच्या आग्रहामुळे २०१७ मध्ये येथे ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली होती....
जुलै 13, 2019
नवी मुंबई - भिंती कोसळणे, दरड कोसळणे, इमारत दुर्घटना आणि पूरपरिस्थितींसारख्या अस्मानी संकटांशी दोन हात करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या स्वतंत्र पथकाचा महापालिकेत अभाव आहे. शहरात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे विभाग कार्यालय अथवा अग्निशमन दलाच्या...
जुलै 12, 2019
नवी मुंबई : भिंती कोसळणे, दरड कोसळणे, इमारत दुर्घटना आणि पूरपरिस्थितींसारख्या अस्मानी संकटांशी दोन हात करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या स्वतंत्र पथकाचा महापालिकेत अभाव आहे. शहरात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे विभाग कार्यालय अथवा अग्निशमन दलाच्या...
जुलै 12, 2019
नवी मुंबई : मर्यादित जागेत घनदाट झाडी निर्माण करणारी जपानी तंत्रज्ञानावर आधारित असणारे मियावकी उद्यान महापालिका शहरात विकसित करणार आहे. नेरूळ येथील पाम बीच रस्त्यालगत ज्वेल ऑफ नवी मुंबईत मियावकी उद्यान निर्माण केले जाणार आहे. महापालिकेचे उद्यान विभाग त्याकरिता काही वनस्पतीतज्ज्ञांची मदत घेणार आहे....
जुलै 03, 2019
नवी मुंबई -  गेले दोन दिवस जलमय परिस्थितीत अडकलेल्या कोकण भवन प्रशासनाला महापालिका नोटीस बजावण्याची शक्‍यता आहे. भवनाच्या आवारातील डेब्रीज साफसफाई, अंतर्गत गटारांची स्वच्छता आदी बाबींची खबरदारी घेण्यात कोकण भवन प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका महापालिकेने ठेवला आहे. कोकण भवनात साठलेल्या पाण्यामुळे...
जून 20, 2019
"सरकारी काम, सहा महिने थांब' याचा अनुभवही अनेकांनी आजपर्यंत घेतला आहे. महिनेच नव्हे, तर वर्षानुवर्षे काहींच्या "फाईल'वरील धूळ साफ झालेली नाही. या परिस्थितीत तसूभरही बदल झालेला दिसत नाही हे काही सरकारी कार्यालयांत गेल्यानंतर जाणवते. सकाळी कार्यालयात हजेरी लावल्यानंतर सायंकाळी निघेपर्यंत सरकारी बाबू...
जून 17, 2019
नवी मुंबई : स्वतःची अथवा स्वतःच्या कंपन्यांची जाहीरात करण्यासाठी आजकाल सर्रासपणे राबवल्या जाणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धांचे शहरामध्ये उत आले आहे. अशा व्यावसायिक मॅरेथॉनच्या आयोजनासाठी महापालिकेने थेट शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी त्याकरीता एक धोरण तयार केले...
एप्रिल 27, 2019
वाशी - नवी मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांतील ३५० परिचारिकांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्यांची पूर्तता १५ दिवसांत न झाल्यास सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. नवी मुंबई महापालिका कर्मचारी-अधिकारी संघटनेने परिचारिकांच्या मागण्यांसंदर्भात पालिका आयुक्त डॉ. एन....
एप्रिल 24, 2019
नवी मुंबई -  महापालिकेच्या वाशी रुग्णालयातील वैद्यकशास्त्र विभागातील दोन डॉक्‍टरांवर पालिका प्रशासनाने कारवाई केल्यानंतर दोन दिवसांपासून रुग्णालयातील अतिदक्षता विभाग बंद केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. अतिदक्षता विभागातील रुग्णांना मुंबईतील जे. जे. सारख्या इतर सरकारी रुग्णालयांमध्ये पाठवण्यात...
एप्रिल 15, 2019
ऐरोली - राहण्यासाठी चांगले शहर म्हणून लौकिक असणाऱ्या नवी मुंबईत अनेक महिन्यांपासून ठिकठिकाणी लाल रंगाच्या बेकायदा चायनिज गाड्या दिसू लागल्या आहेत. त्या ठिकाणी रात्रभर मद्यपींच्या पार्ट्या झडत असल्याने उशिरा कामावरून घरी येणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. याकडे महापालिका...
मार्च 08, 2019
तुर्भे -  शहरातील बेकायदा बांधकामांना केवळ नोटिसा पाठवून मालकांवर गुन्हे नोंदवण्यापलीकडे नवी मुंबई महापालिका काहीच करत नसल्याने भूमाफियांचे फावले आहे. नोटीस मिळाल्यानंतरही ते बांधकामे पूर्ण करून ती विकून नागरिकांची फसवणूक करत आहेत. शहरात हा प्रकार खुलेआम सुरू आहे.  पालिकेने नोटीस बजावलेली व गुन्हे...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार...