एकूण 133 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
नवी मुंबई : समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे नवी मुंबईत शुक्रवारी (ता.१८) सकाळपासून धुकट वातावरण दिसून येत होते. शहरामधील प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीचा हा परिणाम असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी नवी मुंबईतील प्रदूषण हे दिल्लीपेक्षाही अधिक असल्याचे सफर इंडिया एअर क्वॉलिटी सर्व्हिस...
ऑक्टोबर 18, 2019
कल्याण : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत बलशाली करण्यासाठी, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शक्तिशाली बनविण्यासाठी मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार...
ऑक्टोबर 17, 2019
कल्याण : महाराष्ट्रामध्ये विरोधक उरले नाहीत, अशी टीका भाजपवाले करतात. मग महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये राज्याबाहेरून भाजप नेते का येतात? जेव्हा कोल्हापूर, सांगलीमध्ये महापूर आला तेव्हा हे दिल्लीश्‍वर नेते कुठे होते, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. कल्याण पूर्व...
ऑक्टोबर 16, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी मुंबईतील खारघरमध्ये जाहीर सभा पार पडली. आता नवी मुंबईत माफियागिरीला माफी नाही असं नरेंद्र म्हणालेत. गेल्या काही वर्षात नवी मुंबईने इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती केलीये. पण 2014 च्या आधी महाराष्ट्रातील रियल इस्टेट क्षेत्रात बिल्डर आणि माफिया...
ऑक्टोबर 16, 2019
माणगाव (वार्ताहर) : माणगाव तालुक्‍यातील मौजे खरवली गावात महाराष्ट्र विद्युत महावितरणची सुरू असलेली वीजवाहिनी शेतात पडली होती. तेथूनच काही गुरे चरण्यासाठी आली होती. त्याच दरम्यान चरणाऱ्या गुरांना विजेचा धक्का लागून त्यातील दोन गुरे दगावल्याची घटना सोमवारी (ता. १४) सकाळी ८ वाजता घडली.  खरवली येथील...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या गैरव्यवहाराच्या...
ऑक्टोबर 15, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील रंगत दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता उमेदवारांकडून अनोखे फंडे आजमावले जात आहेत. पारंपरिक प्रचारावर भर देतानाच आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत सुरू असलेल्या या प्रचारात भारतीय जनता  पक्षाकडून भल्या पहाटे दारावर येणाऱ्या...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेचा माजी अध्यक्ष वरियाम सिंग याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुहू चौपाटी परिसरात त्याची तब्बल २५०० कोटींची मालमत्ता असल्याचे समजते. याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्याने नकार दिल्याचे एका...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 14, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई शहरातील बेलापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांनी आता मतदारांना प्रत्यक्ष भेटून प्रचार करण्यावर भर दिला आहे. नेरूळ, जुईनगर, सानपाडा व बेलापूर विभागातील कानाकोपरा अक्षरशः पिंजून काढला. या भागातील...
ऑक्टोबर 08, 2019
पनवेल : पनवेल विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने पनवेल विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात १० उमेदवार राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये शेकापकडून डमी अर्ज दाखल केलेले गणेश कडू, अरुण कुंभार, तसेच अपक्ष म्हणून...
ऑक्टोबर 03, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई परिसरातील बांधकाम क्षेत्रात परप्रांतीय उद्योजकांचा दबदबा निर्माण झाला आहे. हे जरी वास्तव असले तरी गेल्या काही वर्षांपासून नवी मुंबईतील मराठी उद्योजकांनी एकत्र येऊन महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून आपले अस्तित्व निर्माण केले आहे. दरवर्षी या संघटनेच्या अध्यक्षपदी...
सप्टेंबर 26, 2019
पनवेल : पनवेलमध्ये स्मार्ट सिटीची स्वप्नं बघताना देखणं शहर, आधुनिक बांधकाम, मेट्रोचं जाळं, प्रशस्त रस्ते या निकषांबरोबरच शहरातलं प्रदूषण नियंत्रण हीदेखील महत्त्वाची बाब आहे; मात्र त्याबाबतच पालिका गंभीर नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. जवळपास तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तयार...
सप्टेंबर 25, 2019
पनवेल : महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जमा करण्यात आलेली आठ कोटी १४ लाखांची रक्कम कारखानदारांनी एमआयडीसीकडे जमा करावी, याकरिता तळोजा औद्योगिक परिसरातील ९७४ कारखान्यांना एमआयडीसीकडून पुन्हा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. वेळेत रक्कम जमा करणाऱ्या कारखान्यांचादेखील यात समावेश...
सप्टेंबर 25, 2019
ठाणे : पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वापरलेल्या खडी आणि सिमेंटसदृश्‍य मातीच्या मिश्रणामुळे महामार्गावरील रस्त्यांवर जागोजागी धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सोमवारी रस्त्यावरील या खडीमुळे दोघे छायाचित्रकार दुचाकीवरून पडून जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान, रस्त्यावरून धूळ उडवत जाणाऱ्या वाहनांमुळे...
सप्टेंबर 25, 2019
अलिबाग : वडखळ-अलिबाग या २२ किलोमीटरच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार होते. त्यासाठी १७०० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाने केंद्र सरकारकडे पाठवला होता; परंतु निधीअभावी तो दुपदरी करावा, त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे द्यावी, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे; मात्र...
सप्टेंबर 25, 2019
अलिबाग : कोकणाची शान म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा जीआय मानांकन प्रमाणपत्राशिवाय विकता येणार नाही. त्यामुळे नोंदणी आवश्‍यक असली, तरी रायगड जिल्ह्यात त्याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या एक टक्का बागायतदारांनी अशी नोंदणी केली आहे. विशिष्ट चव आणि रंगासाठी हापूस आंबा प्रसिद्ध आहे. त्यामुळेच त्याला...
सप्टेंबर 24, 2019
पनवेल : महाराष्ट्रात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या अनुषंगाने ता. २१ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. येत्‍या २१ ऑक्‍टोबरला मतदान होणार आहे. पनवेल मतदार संघ हा महाराष्ट्रात सगळ्यात मोठा मतदार संघ आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तालुक्‍यातील पोलिस...
सप्टेंबर 23, 2019
पनवेल : हरित लवाद आणि प्रदूषण महामंडळ यांनी दिलेल्या आदेशानंतरही महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने प्रदूषणात दोषी ठरवण्यात आलेल्या कारखानदारांची वीज बंद करण्यात आली नाही. त्यामुळे महावितरण अधिकारी कारखानदार करत असलेल्या गैरप्रकारात भर घालण्याचे काम करत असल्याचे प्रदूषण महामंडळाकडून जाहीर...
सप्टेंबर 20, 2019
म्हसळा (वार्ताहर) : विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने राज्य सरकारने शैक्षणिक संस्था व शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शाळेच्या १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा आदेश सरकारने काढला. मात्र, या आदेशाची पायमल्ली झाल्याचे म्हसळा तालुक्‍यात...