एकूण 1266 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
महाड (बातमीदार) : इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय शिकारी पक्षीगण संवर्धन परिषदेमध्ये रायगड जिल्ह्यातील गिधाड संवर्धन कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. भारतीय गिधाडांवरील रायगड जिल्ह्यातील गिधाड प्रकल्पांवर पक्षीतज्ज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांनी या परिषदेत स्लाईड शोद्वारे आपले सादरीकरण केले...
ऑक्टोबर 14, 2019
पोलादपूर : कशेडी घाटात नेहमीच अपघात घडत असतात. म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी गृहखात्याने महामार्गावर पोलिस ठाण्याची निर्मिती केली आहे. त्या अनुषंगाने पोलादपूर तालुका व रत्नागिरी जिल्हा या दोघांच्या सीमेवर कशेडी टॅपचीही निर्मिती करण्यात आली आहे. या कशेडी टॅप...
ऑक्टोबर 14, 2019
ठाणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. मुख्य नेत्यांच्या सभा झाल्यानंतर प्रचारासाठी उरलेल्या शेवटच्या रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त गाठत उमेदवार पायाला भिंगरी लावून प्रभागातील कोपरान्‌ कोपरा पिंजून काढताना दिसून आले. प्रचार रॅली, गृहसंकुलांना भेटीगाठी देत...
ऑक्टोबर 14, 2019
  ठाणे : दिवाळीसण, लग्नसराई, औषधोपचारांनादेखील हातात पैसे नसल्याने पीएमसी बॅंकेतील खातेधारक सध्या आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे मिळाले नाही, तर विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू; असा इशारा देत पीएमसी बॅंक खातेधारकांनी रविवारी ठाण्यात मूक मोर्चा काढला. खातेधारकांशी...
ऑक्टोबर 14, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महिला कार्यकर्त्या महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे चित्र सध्या पनवेल परिसरात पाहायला मिळत आहे. घरातील काम सांभाळून वेळ भेटेल तसा आपापल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी झटणारी महिला कार्यकर्त्यांची मोठी फळी कामाला लागल्याचे दोन्ही पक्षांच्या मिरवणुकांमध्ये...
ऑक्टोबर 14, 2019
कर्जत (बातमीदार) : जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस, एसआरपी या महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांच्या प्रचाराला कर्जत शहराचे ग्रामदैवत धापया महाराज यांचे दर्शन घेऊन रविवारी सकाळी शहरातील प्रभागात सुरुवात करण्यात आली. धापया मंदिरापासून निघालेली रॅली बाजारपेठेतून रेल्वेस्थानकापासून पुढे...
ऑक्टोबर 14, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नवी मुंबई शहरातील बेलापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अशोक गावडे यांनी आता मतदारांना प्रत्यक्ष भेटून प्रचार करण्यावर भर दिला आहे. नेरूळ, जुईनगर, सानपाडा व बेलापूर विभागातील कानाकोपरा अक्षरशः पिंजून काढला. या भागातील...
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 14, 2019
खोपोली (बातमीदार) : रविवारच्या सुट्टीच्या दिवसामुळे खोपोलीत प्रचाराचा पारा सकाळपासूनच गरम झाला. युतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या शहरातील शिवसेना-भाजप व आरपीआय नेते व कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार मोहीम राबविली. दुसरीकडे आघाडीकडूनही राष्ट्रवादी, काँग्रेस-शेकाप व समविचारी पक्षनेते व...
ऑक्टोबर 14, 2019
अलिबाग : अनेक प्रकरणांमुळे वादग्रस्त ठरलेले अलिबाग मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सातही मतदारसंघातील ७८ उमेदवारांत ते याबाबत आघाडीवर आहेत.  घरगुती हिंसाचार, चोरी, मारामारी, जमीन हडप करणे या संदर्भात अलिबाग पोलिस...
ऑक्टोबर 14, 2019
पनवेल : विधानसभा निवडणुकीचा दिवस जसजसा जवळ येऊन ठेपला आहे, तसतशी पनवेल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रचारातील रंगत वाढू लागली आहे. बुधवारी (ता. १६) खारघरमध्ये होणाऱ्या प्रचारसभेत  पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ उपस्थित राहणार आहेत.  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या...
ऑक्टोबर 14, 2019
नवी मुंबई : बनावट वाहन परवाना बनवून देणाऱ्या टोळीला एपीएमसी पोलिसांनी अटक केली. या टोळीने नवी मुंबई आरटीओ कार्यालयातील बाद झालेले वाहन परवाने चोरून त्याद्वारे सुमारे अडीचशेहून अधिक वाहन परवाने बनविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या टोळीकडून मोठ्या प्रमाणात बनावट लायसन्स, नवी मुंबई, पनवेल, ठाणे...
ऑक्टोबर 13, 2019
शहरांमध्ये नागरिक राहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीदरम्यान केला...
ऑक्टोबर 10, 2019
अलिबाग (बातमीदार) : रस्त्यांची झालेली बिकट अवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट आदींमुळे शिवसेनेचे अलिबाग मतदार संघातील उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात नागरिकांमध्ये आक्रोश आहे. त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्‍यता आहे. दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या थळ जिल्हा...
ऑक्टोबर 09, 2019
विकास लोकांना भावेल असा नाही तर लोकांना कामाला येईल, असा  पनवेलचा विकास झाला पाहिजे. ‘साफ नियत, सही विकास’ हेच आमचे धोरण असणार आहे, असा विश्‍वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला. ‘सकाळ’च्या बेलापूर कार्यालयात  ‘कॉफी विथ सकाळ या विशेष मुलाखतीदरम्यान ठाकूर यांनी पनवेलच्या विकासाची त्रिसूत्री...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवानंतर मंगळवारी (ता. ८) विजयादशमीच्या दिवशी शहरात देवीचे विर्सजन करण्यात आले. नऊ दिवस-रात्र देवीच्या मंडपासमोर दांडिया खेळत देवीचा जागर करण्यात आला; तर विजयीदशमीच्या दिवशी विर्सजनाच्या वेळी ढोल-ताशांच्या निनादात बेधूंद होऊन, भक्तांनी नाचत विर्सजन मिरवणूक काढून...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून विविध पक्षांच्या राजकीय जनसंपर्क कार्यालयांवर कार्यकर्त्यांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे; तर विविध पक्षांतील कार्यकर्त्यांना गळाला लावण्यास पदाधिकारीदेखील संपर्क साधत आहे. या राजकीय नेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयावर येत असणाऱ्या कार्यकर्त्यांना...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीने जाहीर पाठिंबा घोषित केला आहे. एमआयडीसी व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समितीच्या शिष्टमंडळाने म्हात्रे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली....
ऑक्टोबर 09, 2019
महाड (बातमीदार) : महाड येथील सीस्केप संस्थेचे प्रेमसागर मेस्त्री यांची इंडोनेशिया (बाली) येथे ९ ते १६ आक्‍टोबर दरम्यान होणाऱ्या अकराव्या जागतिक आशियाई शिकारी पक्षी संशोधन-संवर्धन परिषदेत ‘गिधाड’ या विषयावरील संशोधन प्रबंधासाठी निवड करण्यात आली आहे.  जगातील ६० ते ७० देशांतून विविध शिकारी पक्षांच्या...
ऑक्टोबर 09, 2019
नवी मुंबई : भाजपचे जिल्हा सरचिटणीस आणि जेएनपीटीचे विश्‍वस्त महेश बालदी यांनी उरण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. बालदी यांनी अर्ज मागे घ्यावा, याकरिता विरोधकांनी देव पाण्यात ठेवले होते; परंतु बालदी यांनी माघार न घेतल्यामुळे विरोधकांचे मनसुबे उधळले...