एकूण 1583 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
कळवा : गेल्या वर्षी पाणीटंचाईने हैराण झालेल्या कळवा-खारीगावातील नागरिकांना या वर्षी भरपूर पाऊस पडल्याने दिलासा मिळाला होता. मुसळधार पाऊस पडून बारवी धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही स्टेम, एमआयडीसी व ठाणे महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे दिवाळी सणानंतर पुन्हा एकदा येथील नागरिकांना "पाणीबाणी'ला सामोरे...
नोव्हेंबर 13, 2019
ठाणे : अपुऱ्या मनुष्यबळामुळे सर्वत्र पोलिस उभे करणे शक्‍य नसल्याने परदेशातील पद्धतीनुसार मोठा गाजावाजा करून ठाणे शहरात सीसी टीव्हींचे जाळे उभारण्यात आले. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत हे सीसी टीव्ही उभारण्यात आले आहेत. ठाण्यातील नगरसेवकांच्या निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपये घेऊन बसविण्यात...
नोव्हेंबर 13, 2019
नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू होती. आता आचारसंहिता संपल्यानंतरही ही बांधकामे जोमाने सुरू आहेत. यात नवी मुंबईबाहेरील बिल्डर लॉबीने शहरात शिरकाव केल्याने सध्या तीन ते चार महिन्यांतच या ठिकाणी मोठमोठे इमले उभे राहत आहेत. काही...
नोव्हेंबर 13, 2019
अलिबाग (बातमीदार) : गुरुनानक जयंतीनिमित्त सरकारी कार्यालयांसह अनेक खासगी कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे सुटीचे निमित्त साधत मंगळवारी अलिबाग, नागाव, वरसोली, किहीम, आक्षी, रेवदंडा अशा अनेक समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यामुळे घोडागाडी, स्पीड बोट मालकांचा व्यवसाय तेजीत होता. अनेक...
नोव्हेंबर 13, 2019
पाली : सुधागड तालुक्‍यात पाली व जांभूळपाडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातून खोकल्यासाठी जवळपास १ हजार औषधांच्या बाटल्यांची मागणी असते; मात्र जिल्ह्यातून केवळ २५ औषधांच्या बाटल्या पाठवल्या जातात. त्यामुळे येथील रुग्णांची आरोग्य विभागाकडून अक्षरशः बोळवण होत आहे....
नोव्हेंबर 13, 2019
पोलादपूर : स्वयंपाक म्हटला की वाटप आलेच आणि हे वाटप दगडी पाटा, वरंवट्यावरील असेल, तर जेवणाचा स्वादच वेगळा असतो. मात्र, आधुनिक राहणीमान उंचावल्याने पूर्वी वापरात असणारे चूल, दगडी जाते, पाटे-वरवंटे या वस्तूंची जागा आता अनुक्रमे गॅस, पीठ गिरणी व मिक्‍सरने घेतल्याने त्या अडगळीच्या ठिकाणी दिसत आहेत. ...
नोव्हेंबर 13, 2019
खोपोली (बातमीदार) : स्वच्छता अभियानांतर्गत घनकचरा संकलनाच्या नावाखाली खोपोली नगरपालिकेकडून आकारण्यात येत असलेल्या अतिरिक्त कराला खोपोलीत तीव्र विरोध होत आहे. काँग्रेसनंतर आता खोपोली शहर शिवसेनेकडूनही या करआकारणीला विरोध करण्यात आला आहे. या संदर्भात खोपोली शहर शिवसेना महिला आघाडीकडून मुख्याधिकारी...
नोव्हेंबर 13, 2019
नवी मुंबई : शहरातील नागरी वसाहतींमधून निघणारे सांडपाणी व मलमिश्रित पाण्याचा शास्त्रोक्त पद्धतीने निचरा न करता थेट नाल्यांत सोडल्यास यापुढे महापालिकेला महागात पडणार आहे. महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट पाणी नाल्यांमध्ये सोडल्यास दर दिवशी तब्बल २० लाख रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद...
नोव्हेंबर 12, 2019
ठाणे : औरंगाबाद येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्‍सिंग स्पर्धेत ठाणे बॉक्‍सिंग अकॅडमीच्या दीक्षा इंगळेने रौप्य तर खुशी यादवने कांस्य पदकाची कमाई केली. दीक्षाने 19 वर्षाखालील मुलींच्या 51 किलो वजनी गटात तर खुशीने 17 वर्षाखालील मुलींच्या 55 किलो वजनी गटाच्या लढतीत हे यश संपादन केले आहे. मुंबई...
नोव्हेंबर 12, 2019
ठाणे : शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त होण्यासाठी महापालिकेच्या वतीने गेल्या आठवड्यात सलग चार दिवस अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली होती. पण या कारवाईपासून नौपाडा प्रभाग समितीमधील अधिकारी मात्र अद्याप कोसो दूर असल्याचे दिसते. त्यामुळेच या काळात काही मोजक्‍या वेळेत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करताना...
नोव्हेंबर 12, 2019
अलिबाग : अलिबाग येथील एसटी बसस्थानक सर्व सोई-सुविधांयुक्त बांधले जाणार आहे. २७ ऑगस्टला या कामाचे भूमिपूजन थाटामाटात झाले. सुमारे सात कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च असलेल्या स्थानकाच्या कामाची प्रतीक्षा वाढली आहे. सहा महिन्यांनंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती या विभागाकडून मिळाली...
नोव्हेंबर 12, 2019
पाली : अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीत ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत, ही खूप मोठी समस्या आहे. स्वच्छतागृहाअभावी शासकीय कामांसाठी किंवा खरेदीसाठी बाजारात आलेले नागरिक व भाविक यांची कुचंबणा होत आहे. त्यामुळे पालीत महत्त्वाच्या ठिकाणी, तसेच नाक्‍यांवर सार्वजनिक स्वच्छतागृह व...
नोव्हेंबर 12, 2019
नवी मुंबई : शहराचा ‘क्विन नेकलेस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पामबीच रस्त्याच्या शेजारच्या तलावातील नौकाविहार प्रकल्प रखडला आहे. पामबीच रस्त्याच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या तलावात कारंजे उभारून विविध रंगांचे लाईट शो केले जाणार होते. या सुशोभीकरणानंतर या तलावात नौकाविहार सुरू केला जाणार होता. मात्र...
नोव्हेंबर 12, 2019
अलिबाग : मुरूड-शेगवाडा येथील साईबाबा मंदिर परिसरात शनिवारी रात्री उशिरा आढळून आलेल्या सव्वाचार फुटी घोणस सापाला सुरक्षितपणे पकडण्यात आले. त्यानंतर सर्पमित्र संदीप घरत यांनी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जंगलात सोडून त्याला जीवदान दिले. शहरातील शेगवाडा...
नोव्हेंबर 12, 2019
पेण (वार्ताहर) : पेण-दिवा मेमु रेल्वे सेवेला आज (ता. ११) एक वर्ष पूर्ण झाल्याने या रेल्वे सेवेचा पहिला वर्धापन दिन ‘मी पेणकर, आम्ही पेणकर शाश्वत विकास समिती’तर्फे पेण रेल्वेस्थानकात प्रवाशांना साखर वाटून साजरा करण्यात आला. या वेळी गाडीमध्ये पताकाही लावण्यात आल्या होत्या. पेणकरांनी मिळून ‘मी पेणकर,...
नोव्हेंबर 12, 2019
अलिबाग (बातमीदार) : वाढते मुरूम मातीचे दर, खळी बनवण्यासाठी येणारा वाढता खर्च, शेणाचा तुटवडा अशा अनेक कारणांमुळे मासळी सुकवण्यासाठी पारंपरिकरीत्या बनवण्यात येणारी शेणाची खळी आता कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत. तुलनेत खर्च कमी येत असल्याने अनेकांनी गेली काही वर्षे सिमेंटपासून कायमस्वरूपी खळी...
नोव्हेंबर 12, 2019
नवी मुंबई : देशातील सार्वजनिक परिवहन क्षेत्रात ‘इन्टीग्रेटेड इन्टेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम’ या प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी केल्याची दखल घेत केंद्र सरकारतर्फे नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन व्यवस्थेला सर्वोत्कृष्ट यंत्रणा म्हणून पुरस्कार देण्यात आला. सरकारच्या गृहनिर्माण व नागरी विकास...
नोव्हेंबर 11, 2019
पनवेल : नेरूळ ते उरण रेल्वे प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या रेल्वेमार्गावरील पहिल्या टप्प्यातील उपनगरीय रेल्वेसेवा शुभारंभ खारकोपर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत झाला होता. या रेल्वे सेवेला सोमवारी (ता. ११) एक वर्ष पूर्ण होत आहे. पहिल्या टप्प्यात नेरूळ-बेलापूर-...
नोव्हेंबर 11, 2019
राज्यात सरकार स्थापन करणार नसल्याचं भाजपनं जाहीर केल्याचा सर्वाधिक धक्का महाभरतीत भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांनाच सर्वाधिक बसल्याची चर्चा आता रंगलीय. सर्वाधिक जागा मिळूनही भाजप विरोधी बाकांवर बसणाराय. त्यामुळे आता सत्तेच्या लालसेनं भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर हात चोळत बसण्याची वेळ आलीय....
नोव्हेंबर 11, 2019
नवी मुंबई : एनएमएमटीचा वाढता तोटा कमी करण्यासाठी आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सिडको, एमआयडीसी व पनवेल महापालिकेला केले आहे. या तिन्ही प्राधिकरणांनी दरमहा एनएमएमटीच्या तोट्याची प्रतिपूर्ती केल्यास त्यांच्या क्षेत्रात उत्तम बस सेवा पुरविण्याचे काम...