एकूण 17 परिणाम
मे 04, 2017
मुंबई - पावसाळ्याच्या अगोदर मुंबईतले रस्ते पूर्ण होण्यात राज्य सरकारचा दगडखाणी बंदीचा निर्णय आडवा येत असल्याची तक्रार घेऊन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट बुधवारी घेतली.  "वर्षा' या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्यासह ठाकरे...
एप्रिल 07, 2017
मुंबई - शहरातील सर्व झोपडपट्टीधारकांची नोंदणी करण्याच्या अनुषंगाने परिशिष्ट तयार करण्याचे काम मुंबई महापालिका आणि एसआरएच्या माध्यमातून सुरू आहे. मात्र रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांचे परिशिष्ट अद्याप तयार करण्यात आले नाहीत. त्यामुळे त्यांचेही पुनर्वसन करता यावे, यासाठी परिशिष्ट तयार करण्यात...
मार्च 26, 2017
इंदू मिलची जमीन राज्य सरकारकडे हस्तांतरित मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाकडील इंदू मिल येथील जमीन राज्य शासनाकडे आज हस्तांतरित करण्यात आली. विधान भवनात झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी...
मार्च 06, 2017
मुंबई - मुंबई महापालिका कायद्यातील 520 व्या कलमाचा वापर करून राज्य सरकारचा पालिकेतील हस्तक्षेप वाढवायचा आणि सत्ताबाह्य सत्ताकेंद्र बनून शिवसेनेच्या नाकीनऊ आणायचे, अशी रणनीती भाजपने आखली असल्याची चर्चा मुख्यालयातील वरिष्ठ पालिका अधिकाऱ्यांमध्ये आहे.  मुंबई महापालिका अधिनियम 1888 मधील कलम 520 (क)...
मार्च 05, 2017
मुंबई - राज्यातले सरकार आणि स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवत महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष, खासदार अशोक चव्हाण यांनी शनिवारी केली. मुंबई...
मार्च 04, 2017
मुंबई महापालिकेच्या सत्तासंघर्षातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने अचानक माघार घेत शिवसेनेला पुढे चाल दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. भाजपने "पारदर्शी' पद्धतीने माघार घेण्यामागची कारणे काय? आणि राज्याच्या राजकारणावर या घटनेचे परिणाम काय? या बाबत चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना...
मार्च 04, 2017
पुणे - मुंबई महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी अथवा खुर्चीसाठी आम्ही लढत नव्हतो. पारदर्शकता या मुद्द्यावर आमचा भर होता. या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप यांच्यात एकमत झाले आहे. त्यामुळे लवकरच चांगला निर्णय होईल, असे सूचक वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले....
फेब्रुवारी 27, 2017
मुंबई - मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेच्या तिकिटावर दोन मुस्लिम उमेदवार निवडून आल्यामुळे मराठी आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेला आता मुस्लिम समाजमनातही स्थान मिळू लागले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उघडपणे टिका करत, महापालिका निवडणुकीत भाजपाला आव्हान देणाऱ्या...
फेब्रुवारी 08, 2017
मुंबई - भारतीय जनता पक्षाबरोबरची युती तोडण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभांचा धडाका लागवत प्रचारात आघाडी घेल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.  मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे जागावाटपावरून बिनसले. त्यानंतर गोरेगाव येथे प्रजासत्ताकदिनी झालेल्या सभेत उद्धव...
जानेवारी 26, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाटपाची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संवादावर अवलंबून आहे. फडणवीस-ठाकरे यांच्यातील संवादाबद्दल अद्याप कोणीही वाच्यता केलेली नाही. या दोघांतील चर्चेत नेमके काय झाले, याकडे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे डोळे...
जानेवारी 25, 2017
मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढल्यास 100 जागा शिवसेनेला मिळतील, असे अनेक सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे 100 जागांचे स्वप्न शिवसेनेला खुणावत आहे. भाजपशी युती करण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गंभीर नाहीत, असे भाजपच्या वर्तुळातून सांगण्यात येते; मात्र मुंबईत युती झाली नाही,...
जानेवारी 24, 2017
मुंबई - जे बोलतो ते करून दाखवतो, अशी टॅगलाइन घेत जाहीरनामा प्रसिद्ध करताना सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला पुन्हा लक्ष्य केले. निवडणुकीनंतर बोललेले विसरून जायचे, ही आमची जातकुळी नाही. 114 जागा मागून भाजपने कुचेष्टा केली, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला चढवला. दादर...
डिसेंबर 25, 2016
मुंबईतील सभेत काळा पैसाधारकांवर पंतप्रधान बरसले मुंबई - "देशातील पाचशे आणि एक हजाराच्या चलनी नोटा बाद करण्याचा निर्णय आठ नोव्हेंबर रोजी घेतला. सर्वसामान्यांचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी मी पन्नास दिवसांची मुदत मागितली आहे. ही मुदत काही दिवसांत संपणार असून, त्यानंतर मात्र या देशातील...
डिसेंबर 05, 2016
अधिवेशनातच राष्ट्रवादीला दणका देण्याची तयारी; चित्रा वाघ यांच्याकडून इन्कार मुंबई - विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर अद्याप न सावरलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातली अस्वस्थता आता शिगेला पोचली आहे, याचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी भाजपने अनेक नेते व संघटन कौशल्य असलेल्या राष्ट्रवादीच्या...
डिसेंबर 03, 2016
मुंबई : शिवसेना-भाजपचा गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेला कलगितुरा आता थांबण्याची चिन्हे असून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वात जुने दोस्त पुन्हा गळ्यातगळा घालण्याची दाट शक्‍यता आहे. उभय पक्षांच्या नेत्यांकडून युतीचे संकेत दिले जात असले दोघांनीही अद्याप पत्ते मात्र खुले केले नाहीत. ...
डिसेंबर 02, 2016
मुंबई - नगरपालिका आणि नगरपंचायतीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 10 डिसेंबरला मुंबईतील महत्त्वाकांक्षी मेट्रो 2 ब आणि मेट्रो 4 प्रकल्पांचे भूमिपूजन करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पंतप्रधानांची...
ऑक्टोबर 22, 2016
दसरा मेळाव्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी "हिंमत असेल तर युती तोडा' असे आव्हान भारतीय जनता पक्षाला दिले होते. शिवसेनेच्या आक्रमकपणाकडे भाजप नेतृत्वाने तसे दुर्लक्षच केले. परंतु, नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर होताच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला. त्यामुळे भारतीय जनता पक्ष बॅकफूटवर आला आहे...