एकूण 122 परिणाम
जुलै 23, 2019
ठाणे : ठाण्यात पावसाचा लपंडाव सुरू असताना महापालिका क्षेत्रात गढूळ व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. घराघरातील नळाद्वारे येणारे पाणी पिवळसर असल्याने कावीळ व नानाविध आजारांची लागण झाली असून आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेला महिनाभर हा गढूळ पाण्याचा त्रास नागरिकांना सोसावा...
जुलै 15, 2019
नवी मुंबई : महापालिकांतील टक्केवारी सर्वसामान्यांसाठी नवी नाही. सत्ताधारी नगरसेवकांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक कंत्राटामागे काही टक्के रक्कम वसूल केली जाते, असे उघडउघड बोलले जाते. मात्र, यात केवळ सत्ताधाऱ्यांचाच वाटा नसून, टक्केवारीचे हे लोणी विरोधकांच्याही ताटात पडत असल्याचे वास्तव नुकतेच...
जुलै 06, 2019
मुंबई -  मालाड येथील जलाशयाच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम काळ्या यादीतील कंत्राटदाराकडून करण्यात आले होते. महापालिका प्रशासनाने याबाबतचा अहवाल रखडवल्यानेच संबंधित कंत्राटदाराने भिंत बांधली. कंत्राटदाराला काम मिळावे यासाठीच प्रशासनाने हा अहवाल पुढे ढकलला, असा गंभीर आरोप शुक्रवारी (ता. 5) स्थायी समितीत...
जून 25, 2019
मुंबई - शहरातील वाहतुकीची समस्या दूर करण्यासाठी पालिकेकडून पार्किंगच्या जागा निश्‍चित करण्यात आल्या असून, त्या जागांव्यतिरिक्त एक किलोमीटर जागेत पार्किंग केल्यास 10 हजार रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला पालिका सभागृहात सर्वपक्षीय नगरसेवकांनी कडाडून विरोध...
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
मे 01, 2019
नवी मुंबई - वाशीतील धारण तलावावरील पादचारी पुलाचा काही भाग गेल्या पंधरवड्यात कोसळला. या दुर्घटनेमुळे हादरलेल्या पालिका प्रशासनाने अखेर वाशीतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या दालनात शुक्रवारी झालेल्या ‘...
मार्च 23, 2019
मुंबई - 'ईशान्य मुंबईत विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना शिवसेनेचा विरोध असल्यामुळे या मतदारसंघात आम्ही सांगू त्या उमेदवाराला तिकीट द्या,' असा प्रस्ताव शिवसेनेने भाजपला दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांनीदेखील आम्ही काही नावे भाजपला सुचविल्याचे खासगी...
मार्च 17, 2019
मुंबई : माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, रस्त्यावरून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर अचानक रेल्वे पुलाचा स्लॅब कोसळतो आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात 5 लोकांचा नाहक बळी जातो तर 40 हून अधिक लोक गंभीर जखमी होतात. सेकंदापेक्षाही कमी वेळात मृत्यूला डोळ्यांसमोरून जाताना...
फेब्रुवारी 26, 2019
ठाणे - महापालिका प्रशासन आणि नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने शहरातील विकासकामे ठप्प होण्याची शक्‍यता आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाचे चार महत्त्वाकांक्षी प्रस्ताव परत पाठवल्याने आयुक्त संजीव जयस्वाल आक्रमक झाल्याचे कळते. त्यांनी शहरात सुरू असलेल्या विविध...
फेब्रुवारी 17, 2019
ठाणे  - ठाणे परिवहन सेवेने तिकीट दरवाढ करण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ जीसीसी कंत्राटदाराची झोळी भरण्यासाठी घेतला आहे. अशी पाकिटमारी करून त्यातून निवडणूक निधी मिळवण्याचा सत्ताधारी शिवसेनेचा डाव आहे; मात्र या विरोधात आत्ता गप्प बसणार नसून, या जीसीसी ठेक्‍याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार...
फेब्रुवारी 08, 2019
नवी मुंबई - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना न्याहरीत शिजवलेल्या अन्नाऐवजी चिक्की वाटप करण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्णयाविरोधात शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सादर केलेली जनहित याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे. लवकरच त्यावर सुनावणी होणार...
फेब्रुवारी 04, 2019
कळवा - कळवा परिसरातील कळवा, खारीगाव, विटावा, शिवाजी नगर, भास्कर नगर, घोळाई नगर परिसरात गेल्या काही वर्षापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी नळाला पाणीच येत नसल्याने महापालिका प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार(दि 4)ला खारीगाव ते कळवा प्रभाग...
जानेवारी 31, 2019
मुंबई - मराठी माणसाची वाचनाची भूक १०० वर्षांहून अधिक काळ भागवणारे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय वाढत्या खर्चामुळे बेजार झाले आहे. परंतु, महापालिका त्याकडे दुर्लक्ष करून ग्रंथालये चालवण्यासाठी खासगी संस्थांची निवड करणार आहे. त्यासाठी धोरणही केले जात येत आहे. मुंबईतून मराठी माणसाचे उपनगरात स्थलांतर...
जानेवारी 09, 2019
नवी मुंबई - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठीच्या गणवेश प्रस्तावावर अनेक शंका-कुशंका उपस्थित झाल्यामुळे वर्षभर रखडलेला प्रस्ताव अखेर मंगळवारी स्थायी समितीच्या सभेत मंजूर झाला, परंतु गणवेश पुरवठा कंत्राटदाराच्या विश्‍वासार्हतेच्या मुद्द्यावर नगरसेवकांनी प्रशासनावर अशरक्षः प्रश्‍नांचा भडिमार केला...
जानेवारी 05, 2019
ठाणे - क्‍लस्टरचा विषय मार्गी लागण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून बायोमेट्रिक सर्व्हे महापालिकेकडून करण्यात येणार होता; पण एकाचवेळी एखाद्या विभागात हजारो रहिवाशांचे सर्वेक्षण सुरू केल्यास गोंधळ उडण्याची शक्‍यता आहे. ते टाळण्यासाठी मालमत्ता कर विभागाकडे जमा असलेली यादी अद्ययावत करून पुढील...
डिसेंबर 06, 2018
पिंपरी (पुणे) - पाण्यासाठी रास्ता रोको करणाऱ्या नगरसेवक रोहित काटे यांच्यासह इतरांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) दापोडी येथे घडली. गेल्या काही दिवसांपासून दापोडी परिसरामध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांनी...
डिसेंबर 04, 2018
नवी मुंबई - शहरातील सिडको निर्मित मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिर उभारण्यास अखेर महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे. पुनर्विकासाच्या जागेवरील उर्वरित जागेत संक्रमण शिबिर उभारण्यास पालिकेच्या नगररचना विभागाने वाशीतील विकसकांना परवानगी दिली आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन...
नोव्हेंबर 15, 2018
ठाणे - उत्तर भारतीय समाजाने केलेल्या छटपूजेच्या कार्यक्रमानंतर बुधवारी संपूर्ण उपवन तलावाच्या किनाऱ्यावर तेलाचा तवंग आढळून आला; तर मासुंदा, जेल तलाव, कोलशेत या भागातही काही प्रमाणात तेलाचा तवंग आढळून आला. त्यामुळे ठाण्यातील तलाव या छटपूजेनंतर प्रदूषित झाल्याचे दिसून आले. या प्रदूषणामुळे जलचरांना...
ऑक्टोबर 06, 2018
माणसाचे मरण किती स्वस्त झाले आहे, याचे ज्वलंत उदाहरण आपण काल पुण्यातील लोकशाहीर अमर शेख चौकात (जुना बाजार) झालेल्या अपघातामधून अनुभवले. रस्त्यावरील सिग्ननला उभे राहून आपल्या विचारत निघालेल्या लोकांच्या अंगावर मोठे लोखंडी होर्डिंग पडते आणि काही सेकंदांमध्ये होत्याचे नव्हते होऊन बसते. यात चार लोकांचा...
ऑक्टोबर 01, 2018
नवी मुंबई - नातेवाइकांनी केलेल्या बेकायदा बांधकामांमध्ये संबंधित लोकप्रतिनिधी राहत असतील तर तेसुद्धा जबाबदार आहेत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. या निर्णयाच्या आधारे नवी मुंबई महापालिका आता उच्च न्यायालयात बाजू मांडणार आहे. त्यामुळे बेकायदा बांधकामप्रकरणी अपात्र ठरलेल्या...