एकूण 77 परिणाम
फेब्रुवारी 16, 2020
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून 27 गावे वगळण्याबाबत मंत्रालयात शुक्रवारी (ता. 14) नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक झाली. 27 गावे पालिकेतून वगळून स्वतंत्र नगरपालिकेचा निर्णय आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात आहे. दरम्यान, केडीएमसीची निवडणूक ऑक्‍टोबर 2020...
फेब्रुवारी 16, 2020
ठाणे : ठाणे पालिकेत बऱ्याच काळानंतर उपायुक्तांच्या विभागांमध्ये फेरबदल करण्यात आलेले आहेत; पण या फेरबदलांमध्ये सत्ताधारी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेतल्याच्या मुद्द्यावरून वाद सुरू झाल्याचे कळते. शुक्रवारी या फेरबदलाचे आदेश निघाले असले, तरी त्याची अंमलबजावणी नक्की कधीपासून होणार, हे...
फेब्रुवारी 12, 2020
ठाणे : लोकसभा, विधानसभा निवडणुकीचे सारे वारे वाहून गेल्यानंतर आता ठाण्यात महापालिका प्रशासनाच्या दरवाढीचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे ठाणे महापालिकेच्या परिवहन (टीएमटी) उपक्रमाने तिकीट दरवाढीची तयारी केली असताना दुसरीकडे पालिकेनेही पाणी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा...
फेब्रुवारी 11, 2020
ठाणे : भरउन्हाळ्यातही आजूबाजूला हिमाच्छादित जमीन आहे आणि तुरळक हिमतुषार अंगावर येत आहेत... एका कोपऱ्यात संगीताच्या तालावर आबालवृद्ध "स्नो डान्सिंग'चा आनंद लुटत आहेत... तर कुठे बर्फावरील स्केटिंग सुरू आहे... असे चित्र आपण सहसा परदेशातील "स्नो वर्ल्ड'मध्ये पाहतो, पण हेच चित्र आता प्रत्यक्षात ठाणे...
फेब्रुवारी 11, 2020
ठाणे : ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुरुष गटातून महाराष्ट्र पोलिस संघ; तर महिला गटात ठाणे महापालिकेच्या संघाने विजेतेपद पटकाविले. महापालिकेच्या वतीने विजेत्या पुरुष व महिला संघाला प्रत्येकी एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते...
फेब्रुवारी 05, 2020
ठाणे : ठाणे महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी समूह विकास योजना अर्थात "क्‍लस्टर' अंतर्गत सहा "नागरी पुनरुथ्थान आराखड्यां'ना (अर्बन रिन्युअल प्लॅन) राज्य सरकारने मंगळवारी (ता. 4) अंतिम मंजुरी दिली. दरम्यान, आवश्‍यक त्या मंजुऱ्या प्राप्त नसतानाही क्‍लस्टर योजनेची अंमलबजावणी होत असल्याचा आरोप केला जात...
फेब्रुवारी 05, 2020
भिवंडी : भिवंडी महापालिका प्रशासनाने मालमत्ता करवसुलीसाठी सुरू केलेल्या "अभय योजने'त 52 दिवसात 25 कोटी रुपयांची वसुली केली आहे. त्यामुळे अभय योजनेंतर्गत आतापर्यंत 38 कोटींचा कर वसूल करण्यात पालिकेला यश आल्याची माहिती पालिका उपाआयुक्त वंदना गुळवे यांनी दिली. या कारवाईत 1 हजार 297 नळ जोडण्या कापण्यात...
फेब्रुवारी 02, 2020
ठाणे : डोंबिवली एमआयडीसी निवासी विभागांतर्गत असलेल्या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून बिकट अवस्था आहे. प्रत्येक वर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यांच्या डागडुजीचा प्रश्न समोर येत असतो. या रस्त्यांची डागडुजी कोणी करावी, याविषयी गेली अनेक वर्षे एमआयडीसी व महापालिका यांच्यात वाद असल्याने रस्त्यांची स्थिती...
जानेवारी 29, 2020
कल्याण : कल्याण पश्‍चिममधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला आज दुपारी दीडच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीतून धुराचे लोण कल्याण पश्‍चिममधील अनेक भागात पसरल्याने नागरिकांची श्‍वासकोंडी झाली. सतत लागणाऱ्या आगीमुळे आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड पुन्हा एकदा चर्चेत आले असून, ये आग कब बुझेगी? असा सवाल...
जानेवारी 28, 2020
कल्याण (बातमीदार) : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत होणारा पाणी पुरवठा "ना नफा ना तोटा' या तत्त्वावर केला जातो. मात्र त्यावर होणारा जमा खर्च यामध्ये ताळमेळ ठेवताना पाणी पुरवठा विभागाला तारेवरची कसरत करावी लागते. म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी, उत्पन्न वाढीसाठी महापालिका...
जानेवारी 28, 2020
कल्याण : शिळफाटा- डोंबिवली- कल्याण व्हाया टिटवाळा यादरम्यान रिंगरुट रस्त्याचे काम एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या माध्यमातून होणार आहे. यात रस्त्यातील अटाळी आणि आंबिवली परिसरामधील बाधित नागरिकांनी रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) नेतृत्वाखाली रविवारी (ता. 26) प्रजासत्ताकदिनी सकाळी 7...
जानेवारी 27, 2020
ठाणे : ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाचा (टीएमटी) प्रवास आता डिजिटलकडे होऊ लागला आहे. गेल्या वर्षी टीकेचे लक्ष्य झालेला "व्हेअर इज माय टीएमटी बस' हे ऍप अखेर उत्तम प्रकारे कार्यरत झाल्याचा दावा टीएमटी प्रशासनाकडून करण्यात आला आहे. हे ऍप टीएमटीच्या बस थांब्यावर उभारण्यात आलेल्या एलईडी टीव्हीबरोबर...
जानेवारी 27, 2020
ठाणे : आम्ही राज्यामध्ये दोनच विठ्ठलांची पूजा केली आहे. एक विठ्ठल आज आमच्या सोबत मंचावर बसले आहेत; ते शरद पवार आणि दुसरे विठ्ठल म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत. शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांनी आमच्यासारख्या सामान्य माणसाला बोट धरून मंत्रालय दाखविले. आता "अपना टाईम आया है'. शरद पवार यांनी...
जानेवारी 27, 2020
कल्याण : शिळफाटा-डोंबिवली-कल्याण व्हाया टिटवाला या दरम्यान रिंगरुट रस्त्याचे काम एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या माध्यमातून होणार आहे. यात रस्त्यातील अटाळी आणि आंबिवली परिसरामधील बाधित नागरिकांनी रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) नेतृत्वाखाली रविवारी (ता. 26) प्रजासत्ताक दिनी सकाळी 7...
जानेवारी 27, 2020
ठाणे : ध्वनिप्रदूषण ही प्रत्येक शहराला जडलेली एक बाधा आहे. वाहनांचे कर्ण कर्कश आवाज हा त्या प्रदूषणाचाच एक भाग. याच ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी डोंबिवलीकर एकवटले असून रविवारी प्रजासत्ताक दिनी डोंबिवलीत "नो हॉर्न डे' उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सकाळी 9 वाजता शहरात "बाईक...
जानेवारी 24, 2020
ठाणे : तुम्ही रस्त्यावरून वाहनाने जात आहात, समोर वाहनांच्या रांगा लागल्याने तुमचे वाहन थांबले आहे, त्यात पाठीमागील वाहनाने विनाकारण सतत हॉर्न वाजविल्यास तुम्हाला त्या आवाजाचा त्रास जाणवतो...हा केवळ वाहनचालकांचा नाही तर पादचाऱ्यांचाही अनुभव आहे. कर्णकर्कश हॉर्न किंवा सततचा कानावर पडणारा हॉर्नचा आवाज...
जानेवारी 15, 2020
  वसई ः वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून सुरू आहे; मात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांनी बुधवारी (ता.१५) सकाळी ५ पासून बस बंद करत वसई पूर्वेला संपाची हाक दिली. त्यामुळे रोज बसने ये-जा करणाऱ्या १ लाख प्रवाशांना गैरसोईला...
जानेवारी 14, 2020
ठाणे : शाळा-महाविद्यालयात प्रवेश असो की नोकरी; तसेच आयुष्यातील अनेक बाबींसाठी अथवा परदेशगमनासाठी जन्मदाखला आवश्‍यक ठरतो. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या जन्मदाखल्यांसाठी सर्वच आग्रही असतात. एक लाखांची बांगडी पोलिसांनी शोधली 1969 पूर्वी अथवा नंतर नावाशिवाय केवळ जन्माची...
जानेवारी 12, 2020
ठाणे : महापालिकेचे वृक्ष प्राधिकरण वृक्ष वाचविण्याऐवजी विविध विकासकामांसाठी ती तोडण्याच्या परवानगीसाठीच जास्तीत जास्त चर्चेत असते. त्यातही विकासकाकडून झाडे तोडण्यात आल्यानंतर त्यांना नव्याने झाडे लावणे बंधनकारक असते. पण अशी झाडे लावण्याच्या एकाच प्रकरणात वृक्षप्राधिकरण विभागाने तब्बल तीन अहवाल तयार...
जानेवारी 10, 2020
ठाणे : ठाण्यातील वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलावाची रया गेलेली आहे. या तलावाचे सुशोभिकरण नक्की कोणी करायचे, यावरून पालिका आणि एमआयडीसीमध्ये वाद होता. पण हा वाद अखेर शमल्यानंतर रायलादेवी तलावासाठी तब्बल 10 कोटी रुपये खर्च करून या तलावाचे रुपडे पालटले जाणार आहे. एमआयडीसी आणि ठाणे महापालिका...