एकूण 204 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
जगाच्या पाठीवर नवी मुंबईची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी शहरात जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे निर्माण करण्याचे प्रतिपादन विद्यमान आमदार व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ या विशेष मुलाखतीत केले. बेलापूर मतदारसंघात मरिना, बटरफ्लाय गार्डन, किल्ले संवर्धन, सर्वात उंच...
ऑक्टोबर 02, 2019
नवी मुंबई : उच्च दाब वीजवाहिन्यांखालील जागेचा वापर करण्यास महापारेषणने मनाई केलेली असतानाही नवी मुंबई महापालिकेसह सिडकोचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. उच्चदाबाच्या वीजवाहिनीखाली नागरिकांचा वावर; तसेच बांधकाम केले जाऊ नये, अशी सूचना महापारेषणच्या वतीने देण्यात येते. तशा आशयाचे...
ऑक्टोबर 01, 2019
पनवेल : पनवेल महानगरपालिका मंगळवारी (ता.१) तीन वर्षांची होत आहे. पनवेलचा विकास करण्याकरिता महापालिका अस्तित्वात आली असल्याचे बोलले जात होते; मात्र प्रत्यक्षात परिसराचा फारसा विकास झाला नाही. तर घनकचरा व्यवस्थापन, तलावांचे सुशोभीकरण, झोपडपट्टीमुक्‍तीचा प्रयत्न, स्मार्ट व्हिलेज अंतर्गत ५ गावांतील...
सप्टेंबर 30, 2019
नवी मुंबई : पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शहरभर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामाला आता वेग आला आहे. शनिवार (ता. २८) आणि रविवार (ता. २९) असे दोन्ही दिवस महापालिकेला सुट्टी असतानाही अभियांत्रिकी विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्यांवर उभे राहून, तब्बल एक हजारपेक्षा जास्त खड्डे बुजवल्याची नोंद ऑनलाईन...
सप्टेंबर 28, 2019
नवी मुंबई : शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. या खड्ड्यांनी शहरातील नागरिकांची पाठ न सोडल्यामुळे आता कंबरदुखी आणि पाठदुखीमुळे नवी मुंबईकरांना रोज सकाळी कार्यालयात जाण्यासही विलंब होत आहे. शहरांतर्गत मुख्य रस्ते आणि नवी मुंबई शहराच्या मध्यभागातून जाणारा सायन-पनवेल...
सप्टेंबर 27, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेच्या गडकरी रंगायतनमधील उपाहारगृहात गेल्या कित्येक वर्षांपासून विविध विषयांवरील पत्रकार परिषद घेतल्या जात आहेत. "गडकरी कट्टा' हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने अनेक संस्था अथवा राजकीय पक्षांकडून या ठिकाणाला पसंती दिली जात होती. पण आता येथे पत्रकार परिषद घेण्यास महापालिका प्रशासनाने...
सप्टेंबर 25, 2019
नवी मुंबई : महापालिकेत येणारे नागरिक आणि अधिकारी व कर्मचारी यांची ओळख लक्षात यावी, याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना ओळखपत्र बाळगणे अनिवार्य केले आहे. महापालिका मुख्यालयासहीत महापालिकेचे रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र, विभाग कार्यालये आदी कार्यालयांमधील...
सप्टेंबर 24, 2019
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमातील (केडीएमटी) महिनोन्‌महिने दांडी मारणाऱ्या १२ वाहक-चालकांना वारंवार सूचना, नोटीस, निलंबन करूनही त्यांच्यामध्ये सुधारणा झाली नाही. अखेर केडीएमटी प्रशासनाने या दांडीबहाद्दरांना कायमस्वरूपी घरचा रस्ता दाखवत सेवेतून कमी केल्याचे जाहीर केले. ...
सप्टेंबर 24, 2019
ठाणे : तीन दिवसांपासून ठाण्यात पावसाने उघडीप घेतली आहे; पण त्यानंतरही संततधारेचे कारण सांगून खड्डे बुजवण्यात हयगय करणाऱ्या महापालिकेच्या बांधकाम विभागाला अद्याप खड्डे बुजवण्याचा मुहूर्त सापडलेला नाही. या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अखेर सोमवारी (ता. २३)...
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : ‘आई आज आपण स्ट्रॉबेरी बस थांब्यावर बसची वाट पाहूया, येताना मी बटरफ्लाय स्टॉपवर उतरेन हा, तिथे मला घ्यायला ये,’ असे संवाद आता ठाण्यातील मुले आणि पालकांमध्ये रंगणार आहेत. शाळेत जाताना त्यांचा मूड चांगला रहावा, शाळेच्या बसची वाट पाहणे त्यांना आवडावे, यासाठी ठाण्यात खास बच्चे पार्टीसाठी ट्रेन,...
सप्टेंबर 19, 2019
ठाणे : डबघाईला आलेल्या ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाला (टीएमटी) ऊर्जितावस्था देण्यासाठी नवनव्या क्‍लृप्त्या योजिल्या जात असताना खास महिलावर्गासाठी विशेष ५० तेजस्विनी बसेस ठाण्यातील रस्त्यावर धावणार आहेत. बुधवारी (ता. १८) या तेजस्विनी बसचे लोकार्पण ठाण्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम (...
सप्टेंबर 18, 2019
नवी मुंबई : पर्यावरणाच्या ऱ्हासास कारणीभूत ठरलेल्या प्लास्टिकचा भस्मासूर रोखण्याकरिता आधी स्वतःपासून सुरुवात व्हावी, म्हणून लवकरच नवी मुंबईचा गाडा हाकणारे पालिका मुख्यालय प्लास्टिकमुक्त होणार आहे.  मुख्यालयात व आवारात कुठेही प्लास्टिकचा वापर केला जाणार नाही. भोजनगृहात विकल्या जाणाऱ्या हवाबंद...
सप्टेंबर 18, 2019
नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे नवी मुंबई शहरातील रस्त्यांवर यंदाच्या वर्षी तब्बल पाच हजार खड्डे आहेत. अभियांत्रिकी विभागाच्या कामाकरिता तयार केलेल्या ‘दक्ष’ या ऑनलाईन प्रणालीत या खड्ड्यांची नोंद झाली आहे. हे खड्डे बुजवण्यासाठी अभियांत्रिकी विभागामार्फत युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या...
सप्टेंबर 17, 2019
नवी मुंबई : महापालिकेतील एका नेत्याच्या मर्जीतील कंत्राटदाराकरीता चिक्कीचा ठेका धरला जात असल्याचे शिवसेनेतर्फे होणाऱ्या आरोपामुळे वादात सापडलेल्या वादग्रस्त चिक्की वाटपाला अखेर पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. स्थायी समितीमध्ये प्रशासनाने पुन्हा सादर केलेल्या चिक्की वाटपाच्या प्रस्तावाला सर्वानुमते...
सप्टेंबर 16, 2019
नवी मुंबई : शहरातील नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या ८५ टक्के नागरी सुविधा या अभियांत्रिकी विभागामार्फत पुरविल्या जातात. अभियंत्यांना एवढी मोठी जबाबदारी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवन चरित्रातून मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेतून लीलया पार पाडता येते, असा विश्वास महापालिकेचे शहर अभियंते...
सप्टेंबर 16, 2019
नवी मुंबई : शहरातील थकीत मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी महापालिकेतर्फे जाहीर करण्यात आलेल्या अभय योजनेला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शवला आहे. शुक्रवारी सरकारने एका परिपत्रकाद्वारे यास मंजुरी दिली आहे. सरकारच्या या मंजुरीमुळे थेट एक लाख ४५ हजार ८८७ थकीत मालमत्ताधारकांना लाभ मिळणार आहे. नवी मुंबई...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
सप्टेंबर 12, 2019
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका स्वच्छता आणि पाणी या नागरी सुविधा पुरविण्यात अव्वल असली तरी येथील दूषित वातावरणामुळे टीबीच्या (क्षयरोग) रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ही बाब खुद्द नवी मुंबई महापालिकेच्या २०१८-१९ च्या पर्यावरण स्थिती अहवालात नमूद करण्यात आली आहे. हीच नोंद २०१६-१७ च्या पर्यावरण स्थिती...
सप्टेंबर 11, 2019
ठाणे : गेले पंधरा दिवस ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि सत्ताधारी शिवसेनेतील वाद आज अखेर शमला आहे. या वादामध्ये थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला आहे. त्यामुळे गेले पंधरा दिवस प्रशासन विरुद्ध सत्ताधारी सुरू असलेल्या संघर्षाला आता पूर्णविराम...
सप्टेंबर 11, 2019
नवी मुंबई : गणेश विसर्जनाआधी शहरात युद्धपातळीवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. खड्ड्यांमुळे नागरिकांना व गणेशभक्तांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी रस्त्यावर एक जरी खड्डा दिसला, तरी थेट निलंबन करण्याचे नोटिशीद्वारे अधिकाऱ्यांना बजावले आहे. त्यानुसार...