एकूण 255 परिणाम
डिसेंबर 08, 2019
ठाणे : शहरातील महत्त्वाचे रस्ते रुंद करण्यासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने गेल्या तीन वर्षांत सातत्याने रस्तारुंदीकरण मोहीम राबविण्यात आली; मात्र त्यानंतर ही मोहीम थंडावली. पण पुन्हा एकदा रस्तारुंदीकरणाची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात शहरातील तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या रुंदीकरणाला...
डिसेंबर 04, 2019
कळवा : कळवा-खारीगाव परिसरातील कळवा-बेलापूर रस्त्यावर ठाणे महापालिकेने रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तसेच पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेने सुरक्षितपणे चालता यावे म्हणून लाखो रुपये खर्च करून पदपथ उभारले आहेत. त्यावर आकर्षक असे पेव्हरब्लॉक बसवले असून, नागरिकांना वाहनांच्या वर्दळीत हा मार्ग सोयीचा...
डिसेंबर 04, 2019
ठाणे : घोडबंदर येथील  महापालिका आयुक्तांचे वास्तव्य असलेला बंगलाच अनधिकृत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. हा बंगला महापालिकेच्या नावावर असल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे, पण मुळात या जमिनीवर "खासगी वन विभाग' असा उल्लेख आहे. एवढेच नव्हे, तर या बंगल्यात अंतर्गत बदल करण्यासाठी...
डिसेंबर 04, 2019
नवी मुंबई : शहरातील नागरिकांमध्ये वाचनाची आवड वाढावी, रुजावी याकरिता महापालिकेतर्फे अद्ययावत सेंट्रल लायब्ररी (वाचनालय) उभारण्यात येणार आहे. सानपाडा येथे सुमारे दोन हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर ही लायब्ररी उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. नवी मुंबई शहर बहुभाषीय लोकांचे शहर म्हणून ओळखले जाते....
डिसेंबर 03, 2019
ठाणे : बच्चेकंपनी आणि नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी ठाणे शहरात अनेक उद्याने उभारण्यात आली असून या उद्यानांची देखभाल व दुरुस्ती नियमित होत नसल्याने या उद्यानांना मरगळ आल्याचे चित्र आहे. वर्तकनगर येथील भीमनगरमधील थोर संगीतकार श्रीनिवास खळे उद्यानाचीही अशीच वाताहत झाली आहे. या उद्यानातील खेळणी आणि...
डिसेंबर 03, 2019
नवी मुंबई : शहरातील बेकायदा बांधकाम माफियांना अटकाव घालण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी पुढाकार घेतला आहे. बेकायदा बांधकामांना दिला जाणारा पाणीपुरवठा बंद करण्याची सक्त ताकीद मिसाळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली. बेकायदा बांधकामांना पाणीपुरवठा या मथळ्याखाली "सकाळ'ने बातमी प्रकाशित...
डिसेंबर 02, 2019
ठाणे : ठाणे शहरातील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांनी नोव्हेंबर महिन्यात विशेष मोहीम राबवून शेकडो हातगाड्यांवर आणि फेरीवाल्यांवर कारवाई केली. मात्र, पालिकेची कारवाई थंडावताच पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे फेरीवाल्यांचे..."मी पुन्हा येईन' हे सुरूच आहे. वागळे इस्टेट प्रभाग...
डिसेंबर 02, 2019
नवी मुंबई : महापालिकेच्या थकीत मालमत्ता करधारकांना दिलासा देणारी अभय योजना १ डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहे. या अभय योजनेमुळे शहरातील एक लाख ४५ हजारपेक्षा जास्त थकबाकीदारांना मालमत्ता करावरील दंडाची रक्कम भरण्यावर ७५ टक्केपर्यंत मुभा मिळणार आहे. ही अभय योजना १ डिसेंबर २०१९ पासून पुढील ४ महिने...
नोव्हेंबर 29, 2019
ठाणे : ठाणे शहरात 20 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर होत असताना महापालिका केवळ स्वतः केलेल्या दंडात्मक कारवाईवर खूश होताना दिसत आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदी ही केवळ कागदावरच आणि काही काळाच्या कारवाईपुरतीच मर्यादित आहे काय, असा प्रश्‍न ठाणेकरांना पडला आहे. गेल्या दहा...
नोव्हेंबर 28, 2019
ठाणे : स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे असे ब्रीद घेऊन ठाणे महापालिकेने "स्वच्छ सर्वेक्षण-2019' ही मोहीम सुरू केली असून यासाठी विविध उपक्रम महापालिकेद्वारे राबवले जात आहेत. असे असले, तरी नागरिकांकडून रस्त्यावरच इतस्ततः कचरा फेकला जात असल्याने पालिकेच्या या मोहिमेची "ऐशी तैशी' झाली आहे. ठाण्यातील पाचपाखाडीतील...
नोव्हेंबर 28, 2019
ठाणे : ठाणे महापालिकेसमोर डम्पिंग ग्राऊंडची समस्या कायम आहे. पालिकेचे कचरा डम्पिंग अद्यापही खासगी जागेत सुरू असून चार वर्षापूर्वी खासगी मालकाने नकार दिल्यानंतर ठाण्यातील रस्त्यारस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले पहायला मिळाले होते. या समस्येनंतर दिवा येथील खासगी जागेत कचरा टाकण्यास परवानगी...
नोव्हेंबर 28, 2019
नवी मुंबई : शहरात मोकळ्या भूखंडांवर वाढणाऱ्या बेकायदा झोपड्यांना आळा घालण्यासाठी, त्या ठिकाणी पाणी व घरपट्टी न देण्याचे आदेश महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी प्रशानाला दिले आहेत. काही दिवसांपूर्वी एका लोकप्रतिनिधीच्या मध्यस्थीने ऐरोलीत एका ठिकाणी नव्याने वसलेल्या झोपडपट्टीला पाणीपुरवठा...
नोव्हेंबर 27, 2019
भिवंडी : राज्यातील "गोदाम नगरी' म्हणून ओळख असलेल्या भिवंडीतील अनधिकृत गोदामांवर निष्कासन कारवाईचे आदेश न्यायालयाने एमएमआरडीए व ठाणे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. त्यानुसार सर्वत्र गोदामांवर कारवाई सुरू झाली आहे. भिवंडी तालुक्‍यातील भूमीपुत्रांवर यामुळे उपासमारीची वेळ येणार आहे. भविष्यात स्थानिक...
नोव्हेंबर 27, 2019
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकात जाण्यासाठी नौपाडा परिसर ओलांडून स्थानक गाठावे लागते, पण येथील प्रभाग समितीचे अधिकारी फेरीवाल्यांवर कारवाईचा केवळ फार्स करीत असल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावर उतरूनच पायपीट करावी लागत आहे. महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर नोव्हेंबरच्या सुरुवातीला पदपथ मोकळे करण्याची मोहीम...
नोव्हेंबर 27, 2019
नवी मुंबई : महापालिकेने सुरू केलेल्या ‘जन सायकल सहभाग प्रणाली’ या पर्यावरणपूरक सायकल प्रकल्पाला एक वर्षानंतरही लोकप्रियता कायम आहे. एका वर्षात तब्बल ७५ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सायकल सेवेचा लाभ घेतला. पूर्वी फक्त व्यायाम करण्यापुरतेच वापरली जात असलेली सायकल आता कार्यालय, रेल्वेस्थानके, बस...
नोव्हेंबर 26, 2019
ठाणे : न्यायालयाच्या आदेशानंतर ठाणे जिल्ह्यातील हरित पट्ट्यातील शेती होत नसलेल्या बांधकामांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईला सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केला आहे. श्रमजीवी संघटनेसह सर्वपक्षीय राजकीय पक्षांनी एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आज "बिऱ्हाड' मोर्चा काढून...
नोव्हेंबर 25, 2019
ठाणे : महापालिकेच्या जमिनीवर अतिक्रमण होण्याचे प्रकार अनेक वेळा घडत असतात. त्यावर महापालिकेला सवड मिळेल, त्याप्रमाणे कारवाईही होत असते; पण आता तर ठाणे महापालिकेच्याच वास्तूवर अर्थात तरण तलावावर कब्जा करण्यासाठी अनेक महाभाग पुढे येऊ लागले आहेत. त्यातही उद्‌घाटन न झालेली वास्तूदेखील आपल्याच ताब्यात...
नोव्हेंबर 25, 2019
नवी मुंबई : एप्रिल २०२० मध्ये होऊ घातलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तब्बल १६ कोटी ३२ लाख रुपये खर्च येणार असल्याचा अंदाज महापालिकेने बांधला आहे. एका मतदारामागे १९२ रुपये असे एकूण आठ लाख ५० हजार मतदारांमागे हा अंदाजित खर्च गृहीत धरण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत...
नोव्हेंबर 25, 2019
नवी मुंबई : पालिकेच्या आरोग्य विभागातील कोलमडलेल्या व्यवस्थेला एकीकडे जबाबदार धरून दुसरीकडे आरोग्य व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या डॉक्‍टरांची भरती रोखण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले. नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत डॉक्‍टर आणि इतर वैद्यकीय तज्ज्ञांच्या १६९ जागांवरील भरती...
नोव्हेंबर 24, 2019
ठाणे : अतिक्रमणमुक्त पदपथ आणि पोस्टर्समुक्त ठाणे शहरासाठी तीन दिवस विशेष मोहीम महापालिका आयुक्तांच्या आदेशाने नुकतीच राबवण्यात आली. तरीही शहरातील अनेक पदपथांवर भंगार सामान आणि बिघाड झालेल्या वाहनांचा खच पडला असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा अशा पदपथावरून चालायचे तरी कसे? असा सवाल पादचारी करीत आहेत....