एकूण 9244 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई  ः शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी प्रचारासाठी जोरदार तयारी केली होती मात्र शनिवारी चेंबूर परिसरात  सकाळपासूनच पावसाने संततधार सुरू केल्याने याचा परिणाम प्रचारावर पाहायला मिळाला दुपारी बारा वाजेपर्यंत कुठल्याही उमेदवाराने प्रचाराला सुरवात केली नव्हती.  उमेदवारांनी शेवटच्या...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : बॉलीवुड अभिनेता सलमान खान आपल्या आगामी चित्रपट म्हणजेच दबंग 3 च्या शुटींग मध्ये व्यस्त आहे. त्यातच दुसरीकडे त्याचा बॉडीगार्ड शेरा राजकीय पक्षांसोबत काम करताना दिसत आहे. शेराचा नुकताच शिवसनेत प्रवेश झाला आहे. अशी माहिती एएनआई ने ट्वीट वरून दिली आहे. शेरा उद्धव आणि अदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना आता प्रचारात बॉलिवूड अभिनेत सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा मदत करताना दिसत आहे. शेराने काल शिवसेनेत प्रवेश केला आहे. सलमान खान याचा प्रसिद्ध बॉडिगार्ड आणि सुरक्षा संस्थेचा प्रमुख शेरा याने काल...
ऑक्टोबर 19, 2019
नवी मुंबई : नियोजित नवी मुंबई शहरात वाहनचालकांच्या बेपर्वा बेशिस्तीमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. त्यात पार्किंगच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. शहरातील अनेक ठिकाणच्या महत्त्वाच्या परिसरात नो पार्किंगमध्ये पार्किंग केले जात आहे. वाशी, ऐरोली, कोपरखैरणे, बेलापूर आणि नेरुळ परिसरातील रस्ते...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई: बाजारातील वस्तूंच्या मागणीमधील प्रचंड घट, बिगरबॅंकिंग वित्त संस्थांमधील रोकड संकट यांसारख्या परिणामांमुळे मंदीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेबाबत बड्या संस्थांनी विकासदराचा अंदाज घटवला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गोल्डमन सॅश या संस्थेनेही भारतातील सद्य आर्थिक स्थिती २००८ मधील...
ऑक्टोबर 19, 2019
नवी मुंबई : शनिवारपासून शाळा-महाविद्यालयांना दिवाळीच्या सुट्ट्या लागत असल्याने शहरातील अनेक कुटुंबांनी गावचा रस्ता धरला आहे. शनिवार आणि रविवारचे बुकिंग फुल झाल्याने मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्‍यता आहे.  नवी मुंबईतील शाळा-महाविद्यालयांच्या १९ ऑक्‍टोबरपासून दिवाळीच्या...
ऑक्टोबर 19, 2019
नवी मुंबई : दिवाळीसाठी मिठाईच्या दुकानांत गोडधोड पदार्थाची रेलचेल सुरू असून, मिठाईचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या पदार्थांची खरेदी करताना ग्राहकांचे तोंड कडू पडत आहे. बाजारात साधारण मिठाई ४०० ते १२०० रुपये किलो आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १०० ते १५० रुपये किलोमागे मिठाईची भाववाढ झाली आहे....
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : रेल्वेच्या मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी, 20 ऑक्‍टोबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर, हार्बरवर पनवेल-वाशी; तर पश्‍चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या मार्गवर ब्लॉकची कामे करण्यात येणार आहेत...
ऑक्टोबर 19, 2019
नवी मुंबई : बेलापूर मतदारसंघातील नागरिकांना न्याय मिळवून देणाऱ्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे या एकमेव उमेदवार असल्याने दलित समाज त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याची ग्वाही केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिली. आठवले यांनी गुरुवारी (ता.१७) रात्री म्हात्रे यांच्या घरी भेट दिली. या...
ऑक्टोबर 19, 2019
म्हसळा (वार्ताहर) : म्‍हसळा शहरात गेल्‍या दोन दिवसांपासून वाहतुकीत पूर्वसूचना न देता बदल करण्‍यात आला आहे. त्‍याचा परिणाम येथील स्‍थानिक प्रवासी आणि नागरिकांवर होत आहे. पोलिस ठाण्‍यात गेल्‍यावर संबंधित अधिकारी नसल्‍याचे कारण पुढे करून तक्रार घेण्‍यास विलंब  अथवा टाळाटाळ करत असल्‍याने नागरिक हैराण...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : जेईई मुख्य परीक्षेच्या भाषिक पर्यायांमध्ये हिंदी, इंग्रजीसोबत गुजराती भाषेचा समावेश करण्यात आला आहे. केंद्र सरकरच्या या निर्णयाला आंबेडकर स्टुडंट्‌स असोसिएशनने विरोध दर्शविला असून  इंग्रजी आणि हिंदीसोबत केवळ गुजराती या एकाच प्रादेशिक भाषेला दिलेली अनुमती हा निर्णय भाषिक असंतोष वाढवणारा...
ऑक्टोबर 19, 2019
नागपूर : शरद बोबडे वकिली व्यवसायात असताना भारतीय चित्रपटसृष्टीतील "ड्रीमगर्ल' हेमामालिनी यांचा खटला त्यांनी नागपूरमध्ये लढला होता. त्यांना मिळालेल्या धनादेशाचे अनादरण झाल्यामुळे त्यांना नागपूरच्या न्यायालयामध्ये हजर राहावे लागले होते. चित्रपट निर्माता एन. कुमार यांनी दिलेला हा धनादेश होता....
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : कमकुवत झालेल्या पादचारी पुलांची पावसाळ्यानंतर दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्याचा निर्णय पश्‍चिम रेल्वेने घेतला आहे. वर्षभरात या कामाला वेग येणार आहे. सीएसएमटी स्थानकाबाहेरील हिमालया पूल दुर्घटनेत मार्चमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.    मरिन लाईन (...
ऑक्टोबर 19, 2019
नवी मुंबई : समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे नवी मुंबईत शुक्रवारी (ता.१८) सकाळपासून धुकट वातावरण दिसून येत होते. शहरामधील प्रदूषणाच्या वाढलेल्या पातळीचा हा परिणाम असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी नवी मुंबईतील प्रदूषण हे दिल्लीपेक्षाही अधिक असल्याचे सफर इंडिया एअर क्वॉलिटी सर्व्हिस...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई:  जगातील निम्म्याहून अधिक जनता ही शहरांत राहते आणि 2050 पर्यंत दोन तृतीयांशहून अधिक नागरिक शहरांकडे कूच करणार आहेत. स्मार्ट तंत्रज्ञान स्मार्ट सिटी उभारण्यास फायदेशीर ठरणार असून सरकारने त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. मुंबईत आयोजित केलेल्या "स्मार्ट एशिया' प्रदर्शनात स्मार्ट सिटी पर्याय...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई: चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पाच टक्‍क्‍यांपर्यंत खाली असला तरी दुसऱ्या सहामाहीत विकासदर सात टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल, असा विश्‍वास निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी व्यक्त केला आहे.  खासगी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण झाल्यास ओघ...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या अल्फिया पठाण हिने आशियाई बॉक्‍सिंग कुमारी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर राज्यातील शर्वरी कल्याणकर हिने रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताने या स्पर्धेत सहा सुवर्णपदकांसह 23 पदके जिंकली. आशियात प्रथमच झालेल्या या स्पर्धेत भारताने सर्वांगीण विजेतेपद पटकावले....
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळताच, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करू, असे अश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मुंबईतील जाहीर सभेतून दिले. शिवस्मारकासंदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले. मुंबईत वांद्रे-कुर्ला...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : ''आमच्यासमोर कोणताही विरोधक शिल्लक राहिला नाही. शेंडाही नाही आणि बुडकाही नाही अशी अवस्था सध्या काँग्रेसची झाली आहे, तर राष्ट्रवादीची अवस्था आधे इधर है, आधे उधर है अशी झाली आहे. काँग्रेसवाले खाऊन खाऊन थकलेत. आता न खाणाऱ्यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता आहे, त्यामुळे महाराष्ट्राने गेल्या पाच...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबई : पीएमसी बॅंकेच्या आणखी एका खातेदाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलूंड येथे ही घटना घडली असून यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत पीएमसीच्या तीन खातेदारांचा मृत्यू झाला असून आजची ही चौथी घटना आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय उपचारासाठी बॅंकेतून पैसे काढता न...