एकूण 1201 परिणाम
जून 16, 2019
पुणे : मध्य रेल्वेने पुणे-मुंबई मार्गावरील घाट भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याचा फायदा रेल्वेला झाला आहे. गुरुवारी (ता.13) रात्री रेल्वे मार्गावर दरड कोसळून मोठा दगड रुळावर येऊन पडला होता. घाट भागात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे दरड कोसळल्याची माहिती समजली. रेल्वे गाडी या दगडाला धडकण्याआधीच...
जून 13, 2019
खंडाळा : खंडाळा घाटात रेल्वे रुळावर दरड कोसळली. त्यामुळे मध्य रेल्वेची डाऊन लाईनची वाहतूक ठप्प झाली. ठाकूरवाडी ते मंकी हिलदरम्यान 117 वर भला मोठा दगड रेल्वे रुळावर कोसळला. दरड कोसळल्याने सह्याद्री एक्स्प्रेस सध्या घाटात उभी आहे. ही घटना आज (गुरुवार) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. दरड कोसळल्याने...
जून 13, 2019
मुंबई - आगीमुळे नादुरुस्त झालेले मोनोचे दोन डबे पुन्हा सेवेत दाखल होणार आहेत. डब्यांची दुरुस्ती पूर्ण झाली असून जूनअखेर ते पुन्हा कार्यरत होतील. त्यामुळे मोनोच्या दोन गाड्यांमधील वेळ लवकरच कमी होणार आहे. मोनोच्या प्रवाशांमध्ये पावसाळ्याच्या दिवसांत वाढ होण्याची शक्‍यता अधिक असल्याने, त्या काळात...
जून 12, 2019
मुंबई : अरबी समुद्रात थैमान घातलेल्या 'वायू' या चक्रीवादळामुळे पश्चिम रेल्वेवरील 70 गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. यापैकी 40 मेल, एक्स्प्रेस पूर्णपणे रद्द करण्यात आल्या असून एकूण 98 मेल, एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने अतिदक्षता म्हणून विशेष मेल, एक्स्प्रेस न...
जून 12, 2019
उल्हासनगर : उल्हासनगरात 46 मोठे नाले असून त्यांची 80 टक्के सफाई पूर्ण झाली आहे. त्यासाठी 4 पोकलेन,6 डंपर,2 जेसीबी आणि 350 कंत्राटी कामगार जुंपण्यात आले आहेत.2005 मध्ये उदभवलेली पुरपरिस्थिती टाळण्यासाठी वसाहतींच्या मधोमध असलेल्या नाल्यांना स्वच्छ करण्याकरिता प्राधान्य देण्यात आले आहे.आयुक्त सुधाकर...
जून 11, 2019
मुंबई - मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सोमवारी रात्री मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला असला, तरी पावसामुळे तिन्ही मार्गांवरील लोकलसेवा विस्कळित झाल्याने नोकरदारांचे हाल झाले. रात्री उशिरापर्यंत लोकल सुमारे अर्धा तास विलंबाने धावत होत्या....
जून 09, 2019
कळवा : गेल्या काही वर्षांत कळवा, ठाणे, मुंबई येथील रेल्वे रूळालगत असणाऱ्या गटारातील सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जात असल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकल्या आणि वाचल्याही असतील, परंतु कळवा, खारीगाव व ठाण्यातील महिलांनो भाजी खरेदी करताना जरा सावधान...मानवी मनाला चीड व संताप आणणारी आणि कळव्यातील लोकांच्या...
जून 09, 2019
मुंबई : गेले चार दिवस सतत मध्य रेल्वेचे बिघाडसत्र सुरू असतानाच शनिवारी सकाळी पुन्हा हार्बर मार्गावरील जुईनगर ते नेरूळदरम्यान पॉइंट फेलमुळे बिघाड झाला. परिणामी, शनिवारी (ता. 8) सलग पाचव्या दिवशीही प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला. हार्बर मार्गावरील जुईनगर ते नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी 10.15...
जून 08, 2019
मुंबई - रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायर दुरुस्तीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी (ता. 9) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते कल्याण मार्गादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.  असा असेल मेगाब्लॉक  - मध्य रेल्वे  कधी -...
जून 07, 2019
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकालगत असलेल्या स्कायवॉकवर मागील काही दिवसात लुटीच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे हा स्कायवॉक रात्रीच्या वेळी बंद ठेवण्यात यावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. यावर उपाययोजना म्हणून रात्री बारानंतर हा स्कायवॉक बंद करता येईल का? तसेच स्कायवॉक परिसरात सीसीटीव्ही आणि अधिक प्रकाश...
जून 07, 2019
मुंबई - शालिमार एक्‍स्प्रेसमध्ये स्फोटक वस्तू सापडल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली असून कसून तपासणी केली जात असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.  सीएसएमटी स्थानकावर गुरुवारी विशेष तपासणी मोहीम राबवण्यात...
जून 06, 2019
मुंबई - मुंबईतील लोकलसेवा देशातील सर्वात स्वस्त आहे. त्यामुळे या लोकल प्रवाशांना आणखी सोईसुविधा हव्या असतील, तर त्यांनी त्यासाठी अधिक पैसे मोजणे गरजेचे आहे, असे सांगत रेल्वे मंडळाचे (रोलिंग स्टॉक) सदस्य राजेश अग्रवाल यांनी बुधवारी भाडेवाढीचे अप्रत्यक्ष संकेतच दिले.  मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या...
जून 04, 2019
मुंबई - टिकटॉक ॲप्लिकेशनवर प्रसिद्ध असलेल्या रियाज अली याला भेटण्यासाठी घर सोडून नेपाळला निघालेल्या १४ वर्षांच्या मुलीचे समुपदेशन करून वडाळा पोलिसांनी तिला पालकांच्या ताब्यात दिले. या मुलीच्या कुटुंबीयांनी वडाळा पोलिसांचे आभार मानले आहेत. शिवडी कोळीवाडा परिसरात राहणारी १४ वर्षांची दहावीत शिकणारी...
जून 02, 2019
मुंबई - देशातील सर्वांत जुन्या रेल्वे गाड्यांपैकी एक असलेल्या पंजाब मेलने शनिवारी तिच्या प्रवासाची १०७ वर्षे पूर्ण केली. मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या ‘दख्खनच्या राणी’ने (डेक्कन क्वीन) तिच्या प्रवासाची ८९ वर्षे आजच पूर्ण केली. ‘पंजाब लिमिटेड’ या नावाने एक जून १९१२ पासून पंजाब मेलने आपला प्रवास सुरू केला...
जून 01, 2019
मुंबई : कुर्ल्याच्या अस्वच्छ लिंबू सरबत वाल्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबईत रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाबाहेर इटली-उडीद वडा विकणाऱा व्यक्ती चटणीसाठी शौचालयातील पाणी वापरत असल्याचे व्हिडिओ समोर आला आहे. #हे राम! नींबू शरबत के बाद...
जून 01, 2019
मुंबई - राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदरी १८ खासदार असतानाही पुन्हा निराशा पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्री म्हणून समावेश करण्यात आला असला तरी, खातेवाटपात शिवसेनेला अवजड उद्योग हे नेहमीचेच...
मे 31, 2019
मुंबई - पश्‍चिम रेल्वेच्या लोकलमधील महिला डब्यावर असलेले साडीतील महिलेचे रेखाचित्र (लोगो) बदलून आधुनिक कॉर्पोरेट वेशातील महिलेचे रेखाचित्र लावल्यामुळे महिला प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे जुने चिन्ह पुन्हा लावण्याची मागणी महिला संघटनांकडून होत आहे. लोकलमधील ११० महिला डब्यांवर नवे चिन्ह...
मे 31, 2019
औरंगाबाद : 'जागा उपलब्ध नसल्याने मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून मेट्रो रेल्वे धावणे सध्या शक्य नाही,' असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले. भविष्यात मेट्रोसाठी नियोजन करायचे ठरल्यास नव्याने भूसंपादन करावे लागेल. या महामार्गावर 40...
मे 30, 2019
मुंबई : 'जिनके घर शिशे के होते है, वो दुसरे के घरो पे पत्थर नही फेंका करते' 'वक्त' सिनेमातील राजकुमारच्या एव्हरग्रीन डायलॉगचा अनुभव आज रेल्वेच्या एका प्रवाशाला आला. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर येणाऱ्या अश्‍लिल जाहीरातींचा जाब या प्रवाशांने ट्विटवरवरुन विचारला त्यावर सर्च हिस्ट्री डिलीट करण्याचा सल्ला...
मे 30, 2019
देवळालीगाव (जि. नाशिक) - संपूर्ण मनमाड शहरात पाणीटंचाईचा प्रश्‍न निर्माण झाल्याने त्याची झळ रेल्वे प्रवाशांना व चाकरमान्यांना बसू नये, यासाठी रेल्वेने मनमाड स्थानकातून दररोज मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या राज्यराणी, पंचवटी व गोदावरी या रेल्वेगाड्यांच्या बोग्यांत पाणी भरण्याची सोय नाशिक रोड स्थानकात...