एकूण 580 परिणाम
जून 26, 2019
मुंबई : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले सिल्लोडचे आमदार तसेच माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत सुमारे अर्धा तास चर्चा केली. काँग्रेस मधून बाहेर पडलेले सत्तार विधानसभा निवडणूक शिवसेनेतून लढवण्यास इच्छुक असून ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या...
जून 24, 2019
मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिवसेना- भाजप युतीत मुख्यमंत्रिपदाच्या संभाव्य उमेदवारावरून मतभेद होऊ लागले आहेत, युतीमध्ये मोठ्या भावाचा मान कोणाला मिळणार, याचा निर्णय पक्षपातळीवर घेतला जाणार असून, युतीबाबत बेलगाम वक्तव्य करणाऱ्यांची तक्रार थेट भाजपच्या हायकमांडकडे करण्याचा निर्णय शिवसेनेने...
जून 21, 2019
मुख्यमंत्र्यांना वर्धापन दिन सोहळ्याचे आमंत्रण देऊन शिवसेनेने आपलीच पंचाईत करून घेतली. कारण, या सोहळ्यातील भाषणातून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मुत्सद्देगिरीचेच दर्शन घडविले. त्यामुळे आता सत्तेतील समान वाटपाचे काय होणार, हे स्पष्ट झाले आहे. शि वसेनेचा यंदाचा वर्धापन दिन सोहळा केवळ शिवसैनिकांच्याच नव्हे...
जून 19, 2019
मुंबई - शिवसेनेचा 53वा वर्धापन दिन उद्या (ता. 19) शिव येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेच्या या वर्धापन दिनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असून, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसैनिकांना मार्गदर्शनही करणार आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला...
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 17, 2019
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा! फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...
जून 16, 2019
मुंबई : अमित शहा आणि रावसाहेब दानवे यांचे अध्यक्षपद कायम असताना मुंबईत आशीष शेलार यांना मंत्रिपदाची शपथ देण्याअगोदरच त्यांची जबाबदारी मनोज कोटक यांना सोपवण्यात आली आहे. कोटक हे नुकतेच खासदार म्हणून निवडून आले आहेत. गुजराती चेहऱ्याला दुहेरी जबाबदारी देताना पराग अळवणी, अतुल भातकळकर यांना डावलण्यात...
जून 14, 2019
चिपळूण - लोकसभा निवडणुकीनंतर गुहागरचे आमदार जाधव यांनी आपण चिपळुणातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे सांगत गुगली टाकली. मात्र, गुरुवारी पक्षाध्यक्षांच्या आढावा बैठकीला ते अनुपस्थित होते. तालुकाध्यक्षांसह पदाधिकारीही गैरहजर राहिले याचीच चर्चा मोठी होती. पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे गुहागर वगळून...
जून 12, 2019
मुंबई : अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज (बुधवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मनसे एकत्र येतील, अशी चर्चा अनेक दिवसांपासून रंगत...
जून 08, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसने विधानसभेची तयारी सुरू केलीय. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी दादरच्या टिळक भवनमध्ये काँग्रेसची बैठक होत आहे. काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात झाली असून या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे,...
जून 07, 2019
मुंबई: लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आणि एनयुएसआय कडून चिंतन करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी एनयुएसआय आणि युवक काँग्रेसचे युवक काँग्रेसचे राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मुंबईतील काँग्रेस भवनात खुली...
जून 07, 2019
मुंबई - लोकसभेतील उपाध्यक्ष हे पद शिवसेनेला मिळायलाच पाहिजे. ही आमची मागणी नाही तर आमचा नैसर्गिक दावा व अधिकार आहे, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.  केंद्रात शिवसेनेला केवळ एकच कॅबिनेट मंत्रिपद देताना, तेही अवजड उद्योगसारखे दुय्यम खाते दिले गेले, त्यामुळे शिवसेनेला भाजपकडून...
जून 07, 2019
वडाळा  - दक्षिण मुंबईत "सी' विभागातील म्हणजेच कुलाब्यातील चिराबाजार, धोबी तलाव, भुलेश्‍वर, भोईवाडा, काळबादेवी, मुंबादेवी, निजाम स्ट्रीट आदी अनेक परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. आधीच कपात असल्याने कमी दाबाने येणारे पाणीही गढूळ असल्याने त्यांना वणवण...
जून 06, 2019
मुंबई - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी एक अभिनव संकल्प केला आहे. लोकसभा निवडणुकीत जेवढी मते मिळाली, तेवढी वृक्षलागवड करणार असल्याची घोषणा करत त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा आदर्शच समोर ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीत शेवाळे यांना चार लाख २४ हजार ९१३ मते मिळाली होती....
जून 05, 2019
भोपाळ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वारंवार वादग्रस्त विधाने करुन भारती जनता पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी यापुढे आपण पक्षशिस्त पाळणार असल्याचे म्हटले आहे. पक्षशिस्तीला अनुसरुनच आपला कारभार असेल, असेही त्यांनी सांगितले. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा...
जून 04, 2019
मुंबई - मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर यांना सोमवारी विशेष न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. लोकसभा सदस्यत्वाची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी देण्याची त्यांची मागणी न्यायालयाने फेटाळली. या कारणावरून आरोपीला गैरहजर राहण्याची मुभा मिळणार नाही, असे...
जून 04, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काॅग्रेसने नव्या व सामान्य चेहऱ्यांना संधी देण्याची सुरूवात केली आहे. आज युवक राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी बीड जिल्ह्यातील युवा नेतृत्व मेहबुब शेख यांची निवड केली. तर प्रदेश कार्याध्यक्षपदी रविकांत वरपे व सुरज चव्हाण यांना संधी देण्यात आली आहे.  मेहबुब शेख यांच्यासह चव्हाण व...
जून 03, 2019
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे..."हिंदी आमची राष्ट्रभाषा नाही. उगाच ती लादून आमची माथी भडकावू नका.." अस ट्विट मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी केलं आहे. यावरून मनसे पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक होणार असल्याच स्पष्ट झालं आहे. हिंदी ही...
जून 02, 2019
कोल्हापूर - आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तरुणांना संधी दिली जाणार असल्याचे सूतोवाच मुंबईत झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. त्यामुळे जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या कोणत्या युवा नेतृत्वाला संधी मिळू शकते, या चर्चेला उधाण आले आहे. पहिल्या टप्प्यात...
जून 02, 2019
निवडणुकीच्या काळात सुपर-वन अधिकाऱ्याला एक पगार अधिक मिळतो आणि उन्हात तळपणाऱ्या पोलिसांना काहीच नाही... पोलिसांना आख्ख्या व्यवस्थेनं ओलीस धरलं आहे की काय असं वाटावं अशी ही परिस्थिती. या परिस्थितीतही हा नोकरदारवर्ग खिंड लढवत आहे, धारातीर्थी पडत आहे; पण ना कुणाला खंत, ना खेद... आज तुम्हाला मी ज्या...