एकूण 19 परिणाम
मार्च 15, 2019
स्वतःची जागा नसल्याने छोट्या-छोट्या धर्मशाळा भाड्याने घेऊन लग्न लावू लागले. लग्नामध्ये जेवणाचे काम मिळत गेल्याने आर्थिक कमाईही चांगली होऊ लागली. आता आमच्या जोशी मंगल कार्यालयात मोठी लग्ने होतात. कुटुंबाला हातभार म्हणून सुरवातीला मी भोजनालय सुरू केले. माउलींच्या मंदिराजवळ घर असल्याने भोजनालय चांगले...
फेब्रुवारी 03, 2019
श्‍याम आणि सतीश हे दोघं ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतात, तो समाज अत्यंत हुशार आणि संपन्न आहे, असं मानलं जातं. मात्र, तो हुशार आहे; पण संपन्न नाही, याची जाणीव पहिल्यांदा झाली ती श्‍याम आणि सतीश यांच्यामुळं. माझा भाऊ परमेश्वर काळे नाशिकला इंजिनिअर आहे. त्याला जगण्यातले बारकावे खूप कळतात. परवा सकाळीच...
डिसेंबर 05, 2018
देवळालीगाव : जनता एक्‍स्प्रेसने प्रवास करायचा आहे, असे सांगून हमालांकडे सामान सोडून परागंदा झालेल्या एका लष्करी जवानाच्या प्रतापामुळे रात्रपाळीतील चार हमालांना नाहक रात्रभर जागून कुठलाही मोबदला न मिळता सामानाची देखभाल करावी लागली. अशा परिस्थितीत स्थानक उपव्यवस्थापकांनी हमालांना कुठल्याही प्रकारचे...
नोव्हेंबर 21, 2018
नागपूर - समता, बंधुता आणि न्याय या तत्त्वांनुसार तळागाळातील शोषित, वंचित, महिला, दिव्यांगासह भारतीय समाजाला सन्मानाने जगण्याचे आणि जगवण्याचे अधिकार भारतीय संविधानात आहेत. त्या संविधानाची जागृती डोळस व्यक्तींना आहे. परंतु, अंधबांधव मराठीतील संविधानाच्या कलमांच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. मात्र, आता...
ऑक्टोबर 15, 2018
येवला - १९८१-८२ मध्ये पैठणी व्यवसाय ठप्प झाल्याने पैठणीचा कारागिर अडचणीत सापडला होता..अशाच एका कारागिराला त्यावेळी वर्तमानपत्रपत्रांनी पुन्हा उभे राहण्यासाठी विश्वास ठेऊन आधार दिला अन वर्तमानपत्र विक्रीच्या व्यवसायाने हे कुटुंब पुन्हा उभे केले. नव्हे तर दैनिक सकाळने गेले ३५ वर्ष या कुटुंबावर आभाळभर...
ऑक्टोबर 09, 2018
येवला : अलिशान बंगला अन् त्याच्यासमोर टुमदार उभी असलेली गाडी... हे स्वप्न कुणाचे नसते. पण खिशाला परवडत नाही म्हणून अनेकांना या आकांक्षेला मुरड घालावी लागते. मात्र नाशिकसह जिल्हाभरातील जुन्या चारचाकी वाहनांच्या बाजाराने अनेकांचे वाहन खरेदीचे स्वप्न पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे मुंबईतील गाड्यांनी...
सप्टेंबर 17, 2018
नाशिक - लग्नाच्या साखरपुड्याचे व्हिडिओ शुटिंग करण्याच्या ऑर्डरसाठी मुंबईतील फोटोग्राफरला नाशिकला बोलावून घेतले. त्यानंतर एका हॉटेलमध्ये त्यांना कोल्ड्रिंक्‍समधून गुंगींचे औषध पाजले आणि त्यानंतर संशयितांनी फोटोग्राफरचे सुमारे 11 लाख रुपयांचे महागडे कॅमेरे चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....
जुलै 25, 2018
वणी (नाशिक) : वणी परीसरातील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी बुधवारी पुकारलेल्या बंदला येथील व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळला. सोमवारी काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारली. यात काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर...
जुलै 14, 2018
मांजरी (पुणे) : खानावळीसाठी दिला जाणारा थेट निधी योजना तात्काळ बंद कारवी, बोगस विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी करावी, पेसा अंतर्गतच्या जागा त्वरीत भराव्यात आदी तेरा प्रकारच्या मागण्यांसाठी राज्यातील सर्व शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पुणे ते नाशिक ""पायी...
जुलै 04, 2018
मुंबई, पुण्यानंतर सांगली, मिरजेची 'मेडिकल हब' अशी ओळख निर्माण झाली आहे. येथील वैद्यकीय परंपरेला दोनशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. आजही ही ओळख टिकवून ठेवण्यात आणि तिचा नावलौकिक वाढवण्यात येथील डॉक्‍टरांचे मोठे योगदान आहे. व्यवसायासोबतच समाजसेवेचा वारसाही डॉक्‍टरांनी जपला आहे. त्यांच्या या सेवेचा...
मे 26, 2018
चाकण - अभिनेते, विनोदवीर प्रशांत दामले व शुभांगी गोखले यांच्या ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकाला रसिकांनी गुरुवारी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दामले यांच्या संवादांना रसिकांनी हशा आणि टाळ्यांच्या कडकडाट करून दाद दिली. चाकणमध्ये ‘सकाळ’च्या वतीने तीनदिवसीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सारा...
जानेवारी 30, 2018
पु. ना. गाडगीळ आणि सन्स पुरस्कृत सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र या तरुणींच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सौंदर्याला गुणवत्तेचे कोंदण देणारी आहे, असे गौरवोद्‌गार पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे अजित गाडगीळ व रेणू गाडगीळ यांनी ‘सकाळ’शी बोलताना काढले. त्यांच्याशी साधलेला...
डिसेंबर 20, 2017
नाशिक - इस्त्राईलची लोकसंख्या काही लाखांत आहे. पण जगभरात इस्त्राईलमार्फत उत्पादनांची निर्यात केली जाते. भारताचा विचार केल्यास ऑटोमोबाईलसह विविध यंत्रांच्या सुट्या भागांची बाजारपेठ सहा लाख कोटींची आहे. उद्योजकतेची संधी स्वीकारत सुट्या भागांचे उत्पादन करून तरुण चांगली कमाई करू शकतात, असे प्रतिपादन "...
ऑक्टोबर 10, 2017
नाशिक - द्वारका येथील वाढत्या वाहतुकीचे नियोजन व शिस्त लावण्यासाठी पोलिस, महामार्ग प्राधिकरणाने द्वारका सर्कल वळशाचा पर्याय रद्द करून एकतर्फी वाहतूक करून यू-टर्नचा पर्याय वाहनधारकांना खुला केला. परंतु त्या प्रयोगामुळे वाहनधारकांना आज मनस्ताप सहन करावा लागल्याने ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशीच...
सप्टेंबर 15, 2017
संतोष शिंदे यांनी संघर्षावर मात करीत केली ध्येयपूर्ती लॅम रोड - वयाच्या दुसऱ्या वर्षी पितृछत्र हरपले. आईने मोलमुजरी करून वाढविले. पत्नीला दहा वर्षांपूर्वी कर्करोगाने घेरले. या परिस्थितीत संतोष शिंदे यांनी नातेवाइकांच्या सलूनमध्ये काम करून उदरनिर्वाह चालविला; परंतु स्वत:चे दुकान एखाद्या वाहनात सुरू...
सप्टेंबर 15, 2017
स्वप्न, आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक. ते पाहणंही काही वाईट नाही. मोठी स्वप्न प्रत्येकांनीच पाहिली पाहिजे. ते पाहणंही गैर नाही. मात्र ती स्वप्न साकार करण्यासाठी धडपड, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे. नवउद्योजक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्या पद्धतीचे शिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींना आज ‘...
ऑगस्ट 20, 2017
तिडके कॉलनीतील रणरागिणींच्या संघर्षाला यश; ‘सकाळ’ सर्वांच्या साथीला नाशिक - तिडके कॉलनीतील लंबोदर ॲव्हेन्यूमध्ये दारू दुकान सुरू करण्यास अपार्टमेंटमधील रणरागिणींनी संघर्ष करत विरोध केला. अखेर रणरागिणींच्या विरोधाला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाने अपार्टमेंटमधील दारू दुकान बंद करण्याचा निर्णय...
जुलै 20, 2017
अतिरिक्त एफएसआयच्या माध्यमातून प्रकरणे मार्गी लावण्याच्या सूचना नाशिक - नव्या शहर विकास नियंत्रण नियमावलीत नऊ मीटर रुंदीखालील रस्त्यांवर दहा टक्के अतिरिक्त, तर नऊ मीटर रुंदीवरील रस्त्यांवर अधिक अतिरिक्त एफएसआय दिला आहे.  त्याअनुषंगाने नगररचना विभागात प्रस्ताव दाखल होत असले, तरी मंजुरीबाबत लेखी आदेश...
जून 21, 2017
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद इगतपुरी - नाशिक येथील योग प्रशिक्षक प्रज्ञा पाटील यांनी ‘लाँगेस्ट योगा मॅरेथॉन- फिमेल’ या संवर्गात सलग १०३ तास योगा मॅरेथॉनचा नवा विश्‍वविक्रम प्रस्थापित करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले. पिंपरी (ता. इगतपुरी) येथील ग्रॅंड गार्डन रिसॉर्टमध्ये ‘...