एकूण 325 परिणाम
जून 25, 2019
नाशिक -  पंतप्रधान किसान सन्मान योजनेची मर्यादा वाढविल्याने जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या दीड लाखाने वाढण्याची आशा आहे. येत्या 30 जूनपर्यंत हे कामकाज पूर्ण करण्याचे नियोजन आहे. साधारण साडेचार लाख शेतकऱ्यांना योजनेचा लाभ शक्‍य आहे.  जिल्ह्यात साधारण आठ लाख खातेदार आहेत. त्यांपैकी कुटुंबात...
जून 19, 2019
दिंडोरी / सायखेडा : कर्जबाजारीपणाला कंटाळून नाशिक जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना आज (ता.19) घडली आहे.        अवनखेड (ता. दिंडोरी) येथील रामनाथ पोपट जाधव (वय 50) या शेतकऱ्याने बुधवारी (ता.19) पहाटे साडेपाच वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्यावर...
जून 19, 2019
नाशिक - प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना व वर्गांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी यापुढे फाइव्ह स्टार पद्धतीने मूल्यांकन करण्यात येणार असून, प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात येणार आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची वेतनवाढ...
जून 19, 2019
नाशिक - डिजिटल सेवांच्या नावाखाली विद्यार्थी-पालकांच्या खुलेआम लुटीचा "सकाळ'ने मंगळवारी (ता. 18) पर्दाफाश केला. सेतूच्या "टेंडर'चे गौडबंगाल चव्हाट्यावर आणले. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनातर्फे करार संपूनही शहर आणि तालुक्‍यातील सेतू केंद्रे चालवत जनतेला वेठीस धरल्याबद्दल अहमदाबादच्या गुजरात...
जून 19, 2019
रत्नागिरी - जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना रत्नागिरीच्या खुल्या कारागृहातून पलायन करणाऱ्या कैद्याला स्थानिक गुन्हे शाखेने सहा दिवसांनी  पेढे येथे मोठ्या शिताफीने जेरबंद केले. तीन दिवस मेहनत घेऊन आज ही कारवाई केली. रूपेश तुकाराम कुंभार (वय ३९, रा. वेळंब कुंभारवाडा, गुहागर) असे अटक करण्यात आलेल्या...
जून 07, 2019
नाशिक - यंदा मॉन्सूनचे आगमन पंधरा दिवस लांबणीवर पडणार असले तरी शहरासाठी मात्र धरणांमध्ये मुबलक साठा आहे. शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून पाणीपुरवठा होतो. ३१ जुलैपर्यंत पुरेल इतके आरक्षित पाणी धरणांमध्ये शिल्लक असल्याने तूर्त नाशिककरांना पाण्याबाबत काळजी करण्याची गरज नाही. परंतु पाऊस आणखी...
जून 07, 2019
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये राज्यातील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेला ७० टक्के कोटा पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. या वर्षी हा कोटा काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता. पर्यायाने स्थानिक विद्यार्थ्यांच्या हक्कावर...
जून 02, 2019
नाशिक - महापालिकेच्या मिळकतींसदर्भात राज्य शासनाने धोरण जाहीर केले असून, त्यानुसार आता महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, मुद्रांक उपजिल्हाधिकारी यांची समिती किंवा रेडीरेकनरचा आठ टक्के दर यापेक्षा जे अधिक असेल, असा दर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून निश्‍चित झालेल्या धोरणावर हरकती व...
मे 30, 2019
देवळालीगाव (जि. नाशिक) - संपूर्ण मनमाड शहरात पाणीटंचाईचा प्रश्‍न निर्माण झाल्याने त्याची झळ रेल्वे प्रवाशांना व चाकरमान्यांना बसू नये, यासाठी रेल्वेने मनमाड स्थानकातून दररोज मुंबईच्या दिशेने धावणाऱ्या राज्यराणी, पंचवटी व गोदावरी या रेल्वेगाड्यांच्या बोग्यांत पाणी भरण्याची सोय नाशिक रोड स्थानकात...
मे 29, 2019
मुंबई - राज्यातील दुष्काळी भागांत सुरू असलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांसाठी टॅंकरद्वारे पाणी देण्याचा; तसेच राज्यात प्रथमच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. मंत्रालयात दुष्काळावरील उपाययोजनांसाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. त्या...
मे 29, 2019
मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) घरांच्या किमती कमी केल्यामुळे चारही मंडळांतील सोडतीला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील एकूण ७,१०३ घरांसाठी एक लाख १७ हजार अर्ज आले आहेत. अनामत रक्कम भरून ५१ हजार ४५६ अर्जदार पात्र ठरले आहेत. गिरणी कामगारांच्या घरांसाठीही सोडत...
मे 22, 2019
नाशिक - महापालिकेच्या मिळकतींचे "सील' काढले जात असले, तरी व्यावसायिक वापरासाठी असलेल्या मिळकतींवर रेडीरेकनरनुसार अडीच टक्के दर लावल्याने आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने त्यातून मिळकतधारकांना दिलासा देण्यासाठी आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर 29 मेस तातडीची महासभा बोलावली आहे. त्यात दराबाबत धोरणात्मक...
मे 20, 2019
इगतपुरी (जि. नाशिक) - प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याने प्रस्तावित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे २२ सप्टेंबरला प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक भरतीच्या दृष्टीने आणि सेवेत असलेल्या व पात्रता धारण न केलेल्या...
मे 15, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ निवारणाबाबत आज 'वर्षा'वर जाण्याचे ठरवले असतानाच राज्य सरकारने या संदर्भात केलेल्या कामांचा तपशील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केला आहे. आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे.  तंत्रज्ञानाचा उचित वापर केला, तर...
मे 11, 2019
येवला : तालुक्यातील तब्बल ४१ गावांसाठी विविध निधीतून पाणीपुरवठा योजना राबविल्या गेल्या असल्या तरी त्यातील केवळ २३ गावातीलच योजना आजमितीस सुरू आहे.भूजल पातळी कमालीची घटल्याने व थेंबभर पाणी उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणच्या योजना बंद अवस्थेत असून काही योजनांना राजकीय वादाची किनार आहे. अशा तब्बल ४८...
मे 10, 2019
मुंबई : ''नमस्कार मी देवेंद्र फडणवीस बोलतोय.... दुष्काळाबाबत आपल्या समस्यांवर तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी आपणाशी संवाद साधत आहे''... गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील सरपंचांच्या भ्रमणध्वनीवर हा आवाज कानी पडत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लोकप्रतिनीधी, जिल्हा प्रशासन...
मे 08, 2019
बोदवड - बोदवड तालुका नेहमीच दुष्काळी समजला जातो. तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. शहरात १५ दिवसांआड, तर ग्रामीण भागात २० ते २५ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. नागरिकांना पाण्यासाठी वणवण...
मे 08, 2019
नाशिक - महापालिका अधिनियमानुसार शहरात बससेवा सुरू करायची असेल, तर नियंत्रणासाठी समिती स्थापन करणे बंधनकारक असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली सत्ताधारी भाजपने महसभेचा निर्णय बदलून कंपनी स्थापन करण्याचा ठराव दिला. याविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना...
मे 06, 2019
नाशिक - ओडिशा, पश्‍चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश राज्यांत फणी वादळाने मोठे नुकसान झाले. फणीने प्रभावित झालेल्या राज्यातील वादळग्रस्तांपर्यंत येणाऱ्या मदतीची मोफत वाहतूक करण्याचा रेल्वेने निर्णय घेतला. मदतीसाठी दिले जाणारे मदत साहित्य रेल्वे प्रशासन मोफत संबंधितांपर्यंत पोचविणार आहे. मध्य रेल्वे...
एप्रिल 30, 2019
जुने नाशिक - निवडणुकीपूर्वी जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून मतदारयाद्या तयार केल्या होत्या. मात्र हे काम अतिशय निष्काळजीपणाने झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. जुने नाशिक येथील एका केंद्रावर मतदारयादीत मृत दाखविलेले दोन मतदार चक्क मतदानासाठी अवतरल्याने केंद्रप्रमुखही आश्‍चर्यचकित झाले.  जुने...