एकूण 45 परिणाम
जून 10, 2019
भवन्ति नम्रास्तरवः फलोद्गमैः  नवांबुभिर्भूमिविलंबिनो घनाः !  अनुद्धता सत्पुरुषाः समृद्धिभिः  स्वभाव एवैष परोपकारिणाम !!  ज्याप्रमाणे फळांच्या भाराने वृक्ष खाली झुकतो किंवा जलभारित मेघ आकाशातून खाली येऊन पृथ्वीतलावर वृष्टी करतात, तद्वतच सज्जन व महान व्यक्ती कितीही समृद्ध झाल्या, तरी त्यांच्यातील...
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....
जून 02, 2019
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (रविवार) करण्यात आला. यामध्ये नऊ नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मात्र, संयुक्त जनता दल (जेडीयू)-भाजपचे सरकार असलेल्या बिहारमध्ये भाजपला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही.  नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात फक्त...
जून 01, 2019
पाटणा : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचे सर्व दरवाजे संयुक्‍त जनता दलाने (जेडीयू) बंद केले आहेत. भविष्यात आम्ही केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे पक्षाध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर येथे...
मे 31, 2019
नवी दिल्ली : स्पष्ट बहुमतासह सत्तेत दाखल झालेल्या भाजपप्रणित 'एनडीए'च्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीपूर्वीच घटकपक्षांतून नाराजीचे सूर उमटू लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने नकार दिल्यानंतर यासंदर्भातील चर्चा सुरू...
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी गेल्या पाच...
मे 19, 2019
पाटणा : नथुराम गोडसे देशभक्त होते, असे वक्तव्य करणाऱ्या भाजप उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची भाजपमधून हकालपट्टी करा, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केली. तसेच या वक्तव्याबाबत भाजपने कोणतीही तडजोड करू नये, असेही नितीशकुमार म्हणाले.  माध्यमांशी संवाद साधतना नितीशकुमार यांनी हे...
मे 09, 2019
"हर लढाई जितने के लिए नही होती. बीजेपीको युपीमें हरानेके लिए आयी हूँ,' कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे सूचक वक्तव्य. हे विधान केवळ उत्तर प्रदेशपुरतेच मर्यादित नसावे. यातच कॉंग्रेसची यंदाची निवडणुकीची दिशा स्पष्ट होते. गेल्या निवडणुकीत देशभरात 19.5 टक्के मते मिळवित केवळ 44 जागा जिंकल्या...
मे 03, 2019
‘अगर सच कहना बगावत है, तो मैं भी बागी हूँ!’  पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानासमोरच्या ‘मौर्य’ या पंचतारांकित हॉटेलमधील आलिशान दालन आणि बिहारच्या या राजधानीतून लोकसभेच्या मैदानात उतरलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची फटाफट डायलॉगबाजी सुरू. गेल्या वेळी त्यांनी हा मतदारसंघ अडीच लाखांच्या मताधिक्‍यानं...
एप्रिल 25, 2019
भाजपच्या किमान 50 ते 60 जागा कमी होत असल्यामुळे, त्यांना या निवडणुकीत बहुमत मिळणार नाही. त्यांच्या मित्रपक्षांकडूनही या जागा भरून निघण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सध्या बहुमताचा 272 आकडा गाठण्यासाठी निकराची लढाई लढत आहे.  लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत केंद्रातील युपीए...
मार्च 29, 2019
बिहारात आघाडीचे राजकारण गतिमान झाले आहे. नितीशकुमार यांनी भाजपकडून तर राजदच्या समविचारी मोटेत आलेल्या घटक पक्षांनी आपापल्या जागांचा वाटा वसूल करत त्यांना नमते घ्यायला भाग पाडलंय. दुसरीकडे कन्हैयाकुमारला सर्वार्थाने बेगुसरायमध्ये घेरण्याचा डाव भाजपने आखलाय, त्याला अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय जनता...
मार्च 19, 2019
नवी दिल्ली : "चौकीदार' या कॉंग्रेस नेतृत्वाच्या आरोपाचा चपखल उपयोग करूनच प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधानांपासून भाजपच्या साऱ्या नेत्यांनी कंबर कसली असून, सर्व वरिष्ठ नेत्यांनी आपापल्या ट्विटर नावामागे "चौकीदार' अशी जोड दिली. मात्र, भाजपच्या एका नेत्याने अशी पाटी गळ्यात अडकवून घेण्यास साफ नकार दिला...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
सप्टेंबर 30, 2018
सध्याचं राजकारण हे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि युवक यांच्या भोवती उभं केलं जात आहे. हा भारतीय राजकारणातला राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंतचा महत्त्वाचा बदल घडत आहे. या बदलाला प्रतिसाद निवडणूक आयोगालाही द्यावा लागला आहे. निवडणूक आयोगानं "सी व्हिजिल ऍप' सुरू केलं असून, आचारसंहिताभंगाचे...
सप्टेंबर 23, 2018
भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी "आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे "शिवभक्त राहुल' असं राहुल गांधी यांचं प्रतिमांतर करत ते ठसवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. कधीतरी देशात धर्माला महत्त्व देणारं राजकारण...
सप्टेंबर 17, 2018
नवी दिल्ली- देशाचे 14 वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 68 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान मोदी आज वाढदिवस वाराणसी या त्यांच्या मतदारसंघात शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करणार आहेत.  ट्विटरवरही पंतप्रधानांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात येत आहे. #HappyBdayPMModi आणि #HappyBirthDayPM हे हॅशटॅग सध्या...
ऑगस्ट 12, 2018
ओडिशा- राज्यसभेत गेल्या गुरुवारी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवाराला पाठिंबा देत सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला. त्यांच्या या खेळीने विरोधी पक्षांच्या स्वप्नांना तडा गेला आणि उपाध्यक्षपदी...
ऑगस्ट 10, 2018
राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रीय लोकशाही आघाडी मजबूत करण्याची मोदी-शहा यांची खेळी यशस्वी ठरली, तर एकत्र येण्याची भाषा करणाऱ्या विरोधकांमधील विसंवाद समोर आला. लोकसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली असताना राज्यसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी बाजी मारली आहे, तर भारतीय...
जुलै 10, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमधील जागावाटपाच्या मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र, एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता अखेर भाजप देईल, तेवढ्याच जागांवर त्यांना समाधान मानावे लागेल असे दिसते. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला अचानक मित्रपक्षांची आठवण झाली...