एकूण 36 परिणाम
जून 17, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : शिखर धवन पाठोपाठ भारतीय संघाला वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार जखमी होण्याचा फटका बसला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्नायूच्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करता आली नव्हती. आता तो किमान दोन ते तीन सामने खेळू शकणार नाही, असे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे....
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच...
एप्रिल 16, 2019
विश्‍वचषकासाठी निवडलेला भारतीय क्रिकेट संघ समतोल आहे. गोलंदाजांचा मोठा ताफा, कोहली आणि धोनीसारखे व्यूहरचनाकार आणि एकूणच अनुभवाला दिलेले महत्त्व ही ‘टीम इंडिया’ची वैशिष्ट्ये. भा रतीय पंतप्रधानपदाचा ‘विश्‍वचषक’ कोणीही जिंको आणि त्याच्या संघात कोणीही सामील होवो; पण त्या अटीतटीच्या स्पर्धेचा निकाल...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर अखेरच्या मालिकेतला सलग तिसरा आणि अखेरचा सामना भारताने ३६ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, कर्णधारपदी विराट कोहलीचे पुनरागमन झाले. इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनला वगळण्यात आले असून, पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या नवोदितांवर भिस्त ठेवण्यात आली आहे. केएल राहुल हा आता प्रमुख...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी फलंदाजांना दर्जेदार सराव मिळावा म्हणून "बीसीसीआय'ने "अ' संघातील पाच गोलंदाजांना धाडले आहे. मध्य प्रदेशचा आवेश खान, कर्नाटकचा एम. प्रसिध कृष्णा, पंजाबचा सिद्धार्थ कौल असे तीन वेगवान गोलंदाज, डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम, लेगस्पिनर मयांक...
जुलै 14, 2018
पहिल्या एकदिवसीय सामन्यात नॉटिंगहॅमला भारताने केलेली सफाईदार कामगिरी पाहता इंग्लंडचा संघव्यवस्थापन विचारात पडले असेल. पुढील दोन सामन्यांच्या तयारीसाठी त्यांना बराच विचार करावा लागेल. या खेळपट्टीवर गेल्या पाच वर्षांतील सरासरी धावसंख्या तीनशेपेक्षा जास्त होती. असे असूनही त्यांचा 268 धावांत डाव संपला...
एप्रिल 27, 2018
हैदराबाद - मुंबईविरुद्धच्या सामन्यात ११८ ही धावसंख्या निर्णायक ठरवणाऱ्या हैदराबादने आज १३२ धावा करूनही विजय मिळवला. आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी गुरुवारी पंजाबचा १३ धावांनी पराभव केला. गेल आणि राहुल यांनी ५५ धावांची सलामी देऊनही पंजाबचा डाव ११९ धावांत संपुष्टात आला. भुवनेश्‍वर कुमार...
मार्च 08, 2018
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतातील प्रमुख क्रिकेटपटूंच्या वार्षिक मानधनाच्या रचनेत आज (बुधवार) जाहीर केले. यानुसार, विराट कोहलीसह पाच खेळाडूंना वर्षाला सात कोटी रुपये इतके मानधन मिळणार आहे; तर माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीसह सात जणांना पाच कोटी रुपये मिळणार आहेत.  यंदापासून '...
फेब्रुवारी 01, 2018
डर्बन : डावाच्या सुरवातीच्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजविले असले, तरीही कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या झुंजार शतकामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांमध्ये 269 धावा केल्या. डू प्लेसिसने एका बाजूने झुंज देत 120 धावा केल्या.  डर्बनच्या या खेळपट्टीवर डू...
जानेवारी 25, 2018
विराट कोहली, चेतेश्‍वर पुजाराचे अर्धशतक; भारत सर्वबाद १८७ जोहान्सबर्ग - तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारतीय फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यासमोर शरणागती पत्करली. कर्णधार विराट कोहली, चेतेश्‍वर पुजारा यांची अर्धशतके वगळता भारतीय डावात काहीच घडले नाही. पहिल्याच दिवशी ७७ षटकांत भारताचा डाव १८७...
जानेवारी 21, 2018
मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय कर्णधार विराट कोहली याच्यासमोर अक्षरश: गुडघे टेकल्याने भारतास दक्षिण आफ्रिकेमध्ये मानहानीकारक पराभव स्वीकारावे लागत असल्याचे परखड टीकास्त्र बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे माजी सदस्य व प्रसिद्ध विचारवंत रामचंद्र गुहा यांनी सोडले आहे. "...
जानेवारी 20, 2018
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघ अपयशी ठरत असला, तरी वेगवान गोलदाजांनी आपली छाप पाडली आहे, परंतु पाकिस्तानचा तेजतर्रार गोलंदाज शोएब अख्तरच्या मते वेगवान गोलंदाजांची पंढरी अशी भारताची ओळख निर्माण होण्यासाठी अजून बराच वेळ लागेल.  प्रदीर्घ कालावधीनंतर भारतात चांगले वेगवान गोलंदाज तयार झाले आहेत...
जानेवारी 14, 2018
सेंच्युरियन - दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांचा सेंच्युरियनच्या खेळपट्टीचा अंदाज साफ चुकला. चहापानापर्यंत पहिल्या दिवसाच्या खेळावर फलंदाजांचे राज्य राहिले होते. कडक ऊन आणि फलंदाजीला पोषक विकेटवर भारतीय गोलंदाजांची चांगलीच दमछाक झाली होती. चहापानाच्या २ बाद १८२...
जानेवारी 09, 2018
केप टाऊन - दोन्ही संघांची गोलंदाजीतील ताकद लक्षात घेता मालिकेचा निर्णय फलंदाजांच्या कामगिरीवरच लागणार, हे पहिल्या कसोटी सामन्यातच सिद्ध झाले. दोन्ही संघांच्या गोलंदाजांच्या तालावर फलंदाजांचा अक्षरशः नाच करताना दिसत होते. फरक इतकाच की यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी बाजी मारली आणि भारतीय क्रिकेट...
जानेवारी 04, 2018
केपटाऊन : मायदेशात सलग मालिका जिंकणाऱ्या आणि आयसीसी कसोटी मानांकनात अव्वल स्थानी असलेल्या भारतीय क्रिकेट संघाची परदेशातील क्रिकेट सत्त्वपरीक्षा उद्यापासून (शुक्रवार) बघितली जाणार आहे. भारतीय संघ 2018 सालात तीन मोठे परदेश दौरे करणार असून त्यातील पहिल्या दौऱ्यातील पहिला कसोटी सामना केपटाउनच्या...
डिसेंबर 22, 2017
कोलकाता : 'नव्या वर्षाच्या सुरवातीला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाकडे यंदा दर्जेदार गोलंदाजांचा भन्नाट ताफा आहे. दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेलेला हा भारतीय गोलंदाजांचा सर्वोत्तम ताफा असेल', असे मत निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी व्यक्त केले. भारतीय...
नोव्हेंबर 27, 2017
नागपूर - पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध खेळविण्यात येणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आली आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद सलामीवीर रोहित शर्मा याच्याकडे सोपविण्यात आले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर एकदिवसीय...
नोव्हेंबर 21, 2017
कोलकता - चौथ्या दिवसअखेर अनिर्णित अवस्थेकडे झुकलेल्या कसोटीत विराट कोहलीच्या सुवर्णमहोत्सवी शतकाने जान ओतली. भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी आणि उमेश यादवने पुरेसा वेळ नसतानाही भारताच्या  विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण अखेर ईडन गार्डनवरील भारताविरुद्धची पहिली क्रिकेट कसोटी अनिर्णित राखण्यात...
नोव्हेंबर 04, 2017
राजकोट : पाच वर्षांत तिसऱ्या टी- 20 मालिकेचे विजेतेपद मिळविण्याची भारताला चांगली संधी असली, तरी झुंजार वृत्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या न्यूझीलंडकडून या सामन्यात प्रतिआक्रमणाची अपेक्षा बाळगली जात आहे.  पहिल्या टी- 20 सामन्यात भारताने 53 धावांनी सहज विजय मिळविला. आता दुसरा सामना जिंकून येथेच मालिका...