एकूण 9 परिणाम
एप्रिल 28, 2019
केदार जाधव हा विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्राचा पहिला रणजीपटू ठरला. मुंबई, विदर्भाचे क्रिकेटपटू प्रगती करत असताना केदारच्या रूपानं महाराष्ट्राच्या क्रिकेटनंही आपलं अस्तित्व जाणवून दिलं. केदारसाठी हा मोठा टप्पा आहे. त्याच्या वाटचालीविषयी... तो दिवस होता 20 फेब्रुवारी 2013....
जानेवारी 04, 2019
सिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी धावसंख्या उभारली...
ऑक्टोबर 07, 2018
राजकोट : वेस्ट इंडीज संघाचा भारत दौरा निश्‍चित झाला, त्या वेळी भारत कसोटीत कसा विजय मिळवणार याचेच औत्सुक्‍य होते. वेस्ट इंडीजने तिसऱ्याच दिवशी भारताविरुद्धची विक्रमी हार पत्करली. भारताला विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ऑक्‍टोबर हीटमुळेच घाम गाळावा लागला.  विंडीज दोन्ही डावांत मिळून 100 षटकेही...
मे 29, 2018
‘आयपीएल’मुळे भारतासाठी अनेक तरुण खेळाडू प्रकाशझोतात आणले. त्यांच्या कामगिरीचेही प्रत्यंतर आले. आता त्यांना योग्य वेळी संधी उपलब्ध कशी होईल, हे पाहणे आवश्‍यक आहे. कोणत्याही सांघिक खेळात प्रत्येक खेळाडूची गुणवत्ता कमी-अधिक प्रमाणात असते, तरीही एखादा संघ सर्वोत्तम कामगिरी करतो, तो त्यामागे...
नोव्हेंबर 20, 2017
कोलकता - फलंदाजीस अनुकूल वातावरणाचा पुरेपूर फायदा घेत केएल राहुल आणि शिखर धवनने शतकी सलामी दिली. त्यामुळे चौथ्या दिवसअखेर भारताला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावातील पिछाडी भरून काढता आली. त्यामुळे श्रीलंकेच्या विजयाच्या धूसर आशाही मावळल्या. महंमद शमी, भुवनेश्‍वर कुमारने श्रीलंकेची...
ऑगस्ट 05, 2017
कोलंबो : डोळ्यांसमोर पत्त्यांच्या बंगला कोलमडून पडावा, तसा श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 49.4 षटकांत 183 धावांत गडगडला. अनुभवी फिरकी गोलंदाज आर. आश्‍विनने पाच गडी बाद करत कमाल केली. निरोशन डिकवेलाने केलेल्या अर्धशतकी खेळीचा अपवाद वगळता श्रीलंकेच्या इतर कोणत्याही फलंदाजाला खेळपट्टीवर संयमाने उभे राहता...
जुलै 30, 2017
गॉल, ता. २९ - मागील श्रीलंका दौऱ्यातील गॉल कसोटीतले अपयश धुवून काढण्याचे ‘मिशन’ विराट कोहलीने तडीस नेले. चौथ्या दिवशी त्याच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी लंकेच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही प्रतिकाराची संधी दिली नाही. ३०४ धावांनी दणदणीत विजय नोंदवीत भारताने तीन कसोटींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली...
जुलै 11, 2017
किंग्जस्टन (जमैका) - डावखुरा घणाघाती फलंदाज एविन लुईसच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर विश्‍वविजेत्या वेस्ट इंडीजने एकमेव टी-२० सामन्यात भारतावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय मिळविला. लुईसच्या तडाख्यासमोर टी-२० मधील ‘आद्य फटकेबाज’ ख्रिस गेल याला प्रेक्षकाची भूमिका पत्करणे भाग पडले. विंडीजसमोर १९१...
डिसेंबर 01, 2016
कोहली, जडेजाचे मानांकन उंचावले एका आठवड्यात भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याचे आयसीसीच्या कसोटी मानांकनांतील स्थान उंचावले आहे. आठवड्यापूर्वी चौथ्या स्थानावर असणारा कोहली नव्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.  कोहलीबराबेरच रवींद्र जडेजा याचेही मानांकन उंचावले आहे. इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या...