एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या सामन्यात भारताने विंडीजवर नऊ खेळाडू राखून विजय मिळवित पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. विंडीजने दिलेल्या 105 धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने 63 धावा केल्या तर कर्णधार विराट कोहलीने 33 धावा केल्या.  प्रथम फलंदाजी...
ऑक्टोबर 25, 2018
भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा सामना टाय विशाखापट्टणम - विराट कोहलीच्या दे दणादण करणाऱ्या नाबाद दीड शतकाला वेस्ट इंडीजच्या शिमरॉन हेटमेर आणि शाई होपने जशास तसे उत्तर दिले आणि भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ३२१ धावसंख्येवर टाय झाला. चौकार-षटकारांची तुफान आतषबाजी झालेल्या या...
सप्टेंबर 23, 2018
दुबई- साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या सामन्यात प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूला सामन्याचा मानकरी बनायचे स्वप्न पडत होते. त्यांच्या फाजील आत्मविश्‍वासाचा फायदा भारतीयांनी उचलला. आता उद्याच्या...
नोव्हेंबर 21, 2017
कोलकता - चौथ्या दिवसअखेर अनिर्णित अवस्थेकडे झुकलेल्या कसोटीत विराट कोहलीच्या सुवर्णमहोत्सवी शतकाने जान ओतली. भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी आणि उमेश यादवने पुरेसा वेळ नसतानाही भारताच्या  विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण अखेर ईडन गार्डनवरील भारताविरुद्धची पहिली क्रिकेट कसोटी अनिर्णित राखण्यात...
नोव्हेंबर 20, 2017
कोलकता - फलंदाजीस अनुकूल वातावरणाचा पुरेपूर फायदा घेत केएल राहुल आणि शिखर धवनने शतकी सलामी दिली. त्यामुळे चौथ्या दिवसअखेर भारताला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावातील पिछाडी भरून काढता आली. त्यामुळे श्रीलंकेच्या विजयाच्या धूसर आशाही मावळल्या. महंमद शमी, भुवनेश्‍वर कुमारने श्रीलंकेची...
ऑगस्ट 15, 2017
दोन वर्षांपूर्वी ज्या श्रीलंकेतून कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याची मोहीम सुरू केली तेथेच आता परदेशात प्रथमच व्हाइटवॉश देण्याचा पराक्रम भारताच्या "विराट सेने'ने केला. चॅंपियन्स करंडक जिंकण्यात आलेले अपयश आणि त्यानंतर प्रशिक्षकपदावरून झालेल्या वादाचा संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. याचे...
जुलै 27, 2017
गॉल : भारतीय फलंदाजांनी रचलेल्या धावांच्या डोंगराचे दडपण घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या अननुभवी संघाला भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आक्रमणाला तोंड द्यावे लागले. यामुळे पहिल्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला, तेव्हा भारताच्या पहिल्या डावातील 600 धावांसमोर श्रीलंकेची अवस्था 5 बाद...
जुलै 26, 2017
गॉल : नव्या प्रशिक्षकांसह पहिली कसोटी खेळणाऱ्या भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध आज (बुधवार) नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ठसा उमटविलेल्या हार्दिक पांड्याला कसोटीमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. नियमित सलामीवीरांना झालेल्या दुखापतींमुळे संघात स्थान मिळालेल्या अभिनव...
जुलै 11, 2017
किंग्जस्टन (जमैका) - डावखुरा घणाघाती फलंदाज एविन लुईसच्या धडाकेबाज नाबाद शतकाच्या जोरावर विश्‍वविजेत्या वेस्ट इंडीजने एकमेव टी-२० सामन्यात भारतावर नऊ विकेट राखून दणदणीत विजय मिळविला. लुईसच्या तडाख्यासमोर टी-२० मधील ‘आद्य फटकेबाज’ ख्रिस गेल याला प्रेक्षकाची भूमिका पत्करणे भाग पडले. विंडीजसमोर १९१...
जुलै 10, 2017
किंग्स्टन (जमैका) - विंडीजचा सलामीवीर इव्हीन लुईसने झळकाविलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर विडींजने भारताचा एकमेव ट्वेंटी-20 सामन्यात नऊ गडी राखून दारुण पराभव केला. पहिल्या चार फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताला विंडिजसमोर 191 धावांचे आव्हान ठेवता आले होते. विंडीजने हे आव्हान 19 व्या...
जून 12, 2017
लंडन - ‘जिंका किंवा मरा’ अशा स्थितीत असलेल्या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आठ गडी राखत परतवून लावत चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दक्षिण आफ्रिकेला किरकोळीत रोखून भारताने अर्धा सामना जिंकला होता. त्यानंतर शिखर धवन आणि...