एकूण 47 परिणाम
जून 12, 2019
आजची तिथी : विकारी नाम संवत्सरे श्रीशके १९४१ ज्येष्ठ शुद्ध नवमी. आजचा वार : मंडेवार. आजचा सुविचार : नमो मुखे म्हणा। नमो मुखे म्हणा। पुण्याची गणना। कोण करी।। कमळाच्या मिषें। मीची गा सीएम। बाकीच्यांचा नेम। चुकलाचि।। ............................. नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (रोज १०८ वेळा लिहिणे.)...
जून 08, 2019
प्रत्येक भाषेला एक संस्कृती असते. ती केवळ संवादाचे माध्यम नसते, तर भाषकाशी तिचं जैविक नातं असतं. मराठीलाही एक विशिष्ट संस्कृती आहे. कोणतीही भाषा ही समाजव्यवहाराचे साधन, त्या व्यवहाराचा अंगभूत भाग असल्यामुळे त्या त्या भाषिक समाजाच्या परंपरेचा व संस्कृतीचा ठसा तिच्यावर पडत असतो. या दृष्टीने मराठी...
जून 08, 2019
बकाल झाली पखाल येथील रिक्‍त मनाची शुभ्र मेघुटे चरचरणाऱ्या चराचरामधि जीवित्वाची शिळी संपुटे कंठकोरड्या आकांताला मुक्‍या मनाची तुटकी ढाल दुष्काळाचे गाणे म्हणता भवतालाचा चुकतो ताल निष्पर्णाच्या फांदोऱ्यावर घरटे शेणामेणाचे मुग्ध कावळी तशात बघते स्वप्न आपुल्या पिल्लांचे उडता उडता एक पारवा धुळित कोसळे...
जून 01, 2019
रायसीना हिल्सवरल्या त्या सुविख्यात प्रांगणात झालेल्या भपकेदार शपथविधी सोहळ्याला आम्हीही निमंत्रित होतो. अशा ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभणे हे दुर्मीळ असत्ये. आदल्या दिशीच नमोजींचा फोन आल्याने आम्ही खरे तर बुचकळ्यात पडलो होतो. म्हटले हे काय! निवडणूक न लढविताच आपल्याला फोन कसा आला? पण...
एप्रिल 20, 2019
हे मौला, तू सोडव गा ही अवकाळाची गणिते अंधाऱ्या वाटेवरती तू पेटव ना ते पलिते भेगाळ भुईच्या पोटी दडलेले उष्ण उसासे माध्यान्ही कण्हते सृष्टी शेवटल्या श्‍वासासरिसे विहिरींचे सुकले कंठ वाऱ्याला नुरले त्राण माळावर निवडुंगाचे करिते का कुणि अवघ्राण? भेगांचे दूर नकाशे भूवरी कोण आखेल? शुष्काच्या साम्राज्याची...
मार्च 20, 2019
जय गंगा मय्याकी! पुन्हा एकवार हा नश्‍वर देह पुनित जाहला आहे. पुन्हा एकवार पूर्वसंचित फळां आले आहे! मन कसे तृप्त जाहले आहे. तसे पाहू गेल्यास मी एक गुह्य नावाचा साधासुधा होडीवाला! परंतु तीन दिवसांपूर्वी नशीब फळफळले. देवलोकीचीच जणू अवतारमूर्त प्रकटली. आमच्या सर्वांच्या आवडत्या नेत्या प्रियंकादीदी...
जानेवारी 29, 2019
प्रिय अहो, सौ. कमळाबैचा शिर्साष्टांग नमस्कार. फार दिसात गाठभेट नाही. ‘दोन ध्रुवावर दोघे आपण, तू तिकडे अन मी इकडे’ हे जुने गाणे गुणगुणत कसेबसे दिवस काढत्ये आहे. ‘आता आपण वेगळे राहू आणि गुपचूप भेटत जाऊ’ असे तुम्ही सांगितल्याने हे दिवस आले!! (गेले नाहीत, आले, आले!!) मी म्हणून तुमचे ऐकले. दुस्री कोणी...
जानेवारी 28, 2019
"भारतरत्न' हा खरे तर आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आणि त्यासाठी झालेली निवड ही वादातीत असावी, अशीच अपेक्षा कोणाचीही असणार. मात्र आपल्या देशात कोणतीही निवड ही सोबत वादांचे मोहोळ सोबत घेऊनच येते! यंदाही नेमके तसेच झाले असून, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना दिलेला "भारतरत्न' हा पुरस्कार हा...
डिसेंबर 29, 2018
बरेच काही सरलेले, थोडे उरलेले ते घेऊन नववर्षात पदार्पण करावे लागते. अलीकडच्या काळात एका वर्षाचा विचार केला, तर ते वर्ष संपते कधी नि कसे याचा थांगही लागत नाही, इतके जग गतिमान झाले आहे. जणू काळाला ओलांडून जग पुढे सरकत आहे. "रात्र थोडी सोंगे फार' असेच काहीसे अलीकडे झाल्याचे दिसते. त्यामुळे प्रत्येकाचे...
नोव्हेंबर 29, 2018
पाणी हे जीवन आहे याची जाणीव एव्हाना पृथ्वीवरील प्रत्येक प्राणिमात्राला झालेली आहे. सध्या तरी या विश्‍वात पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे जीवसृष्टी आहे. मानव रेडिओलहरींच्या माध्यमातून कित्येक प्रकाशवर्षे प्रवास करीत आहे. पण पृथ्वीशी साधर्म्य दर्शविणारा किंवा सजीव असणारा ग्रह अद्याप तरी निदर्शनास आलेला...
सप्टेंबर 13, 2018
तीन नावाड्यांची गोष्ट तुम्ही ऐकली आहे का? ऐकाच मग आता. बरे का, कुठल्याही गोष्टीत असते, तसे एक गाव होते. कुठल्याही गावालगत असते, तशी तिथंही एक नदी वाहात होती. कुठल्याही नदीला असतो, तसा तिलाही दुसरा किनारा होता. कुणालाही शेजारीण जशी (बायकोपेक्षा) देखणी वाटते, (खुलासा : सन्माननीय अपवाद समाविष्ट), तसा...
सप्टेंबर 08, 2018
संगीत ही थेट ईश्‍वराशी संवाद साधणारी हृदयाची भाषा असल्याच्या ठाम धारणेतून सप्तसुरांचा वावर बव्हंशी मंदिराच्या गर्भागारात राहिला. भक्‍तीची भाषाच तेव्हाही संगीत हीच होती आणि आजही तीच आहे. मात्र, कालौघात हे संगीत जानपदी लोकगीतांमध्ये थोडाफार खट्याळपणा करू लागले. भावभावनांची अभिव्यक्‍ती करू लागले....
ऑगस्ट 02, 2018
डिअरम डिअर होम मिनिष्टर मा. ना. ना. ना. साहेब यांशी शिर्साष्टांग नमस्कार व साल्युट! साहेब मी एक साधासिंपल ट्रॉफिक हवालदार असून डायरेक लेटर लिहिण्याचे धाडस करीत आहे. माफी असावी! आपल्याला म्हाईत असेलच की सध्या किकी डॅन्स नावाचा एक टेन्शनवाला आयटेम रस्तोरस्ती फेमस होत आहे व त्यामुळे ट्रॉफिकचे बारा...
जुलै 21, 2018
सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वी, १८६५ मध्ये द्रष्टा फ्रेंच लेखक ज्यूल व्हर्न ह्यांनी ‘फ्रॉम दि अर्थ टू द मून’ या शीर्षकाची एक कादंबरिका लिहिली होती. बाल्टिमोर गन क्‍लबच्या सदस्यांनी डोके चालवून एक महाकाय तोफ तयार केली, आणि त्यातून तीन ‘अंतराळवीर’ चंद्रावर डागले, असे कथासूत्र होते. कथा गंमतीदार होती...
जुलै 18, 2018
आजची तिथी : विलंबिनाम संवत्सरे, श्रीशके १९४०, आषाढ शुद्ध पंचमीआजचा वार : ट्यूसडे विदाऊट मिल्क !आजचा सुविचार : दूध दूध दूध दूध...पीता है इंडिया ! नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) माणसाने आयुष्यात काहीही व्हावे, पण महाराष्ट्राचा कारभारी होऊ नये. नागपूरला आल्यावर दिवस जरा बरे जातील...
जुलै 14, 2018
(चाल : गीताई) ऐका ऐका सुजन ऐका कहाणी थोर ही असे कानास टोचली तरिही, ओठाशी येतसे हसे गीताग्रंथ वितरणी या, घडले ते महाभारत उदंड पेटला वाद, भलते झाले पराजित भगवद्‌गीता ग्रंथ मोठा तत्त्व-सत्त्व यशोधरा वांचता नित्य ही गीता, गोची जाई दिगंतरा जीवनाचे कळे गुह्य, बदल होई बाह्यांतरी गीतेने साधते सर्व, स्वप्न...
जून 27, 2018
(एक पाणीदार पत्रव्यवहार...) आ दरणीय मा. साहेब (वांद्रे) यांस, जय महाराष्ट्र. घाईघाईने पत्र लिहिण्यास कारण की मी एक साधासुधा महापौर आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईत मजबूत पाऊस पडून काही ठिकाणी पाणी तुंबल्यासारखे दिसले. गेल्या चोवीस तासांत मुंबईत २३१ मिमी इतका पाऊस नोंदला गेला असला, तरी कुलाबा, भायखळा...
जून 14, 2018
फुटबॉल म्हणजे सारा मिळून नव्वद मिनिटांचा खेळ; पण त्यावर यश, कीर्ती, देशाभिमान यांचे आलेख चढत-उतरत जातात. हे सारेच अतर्क्‍य आणि अतिशयोक्‍त वाटले, तरी ते वास्तव आहे. मॉस्कोमधल्या विशाल, आधुनिक लुझनिकी स्टेडियमवर जमा झालेल्या तब्बल ८१ हजार भाग्यवंत साक्षीदारांच्या समोर ‘फिफा’ विश्‍वचषक फुटबॉल...
जून 11, 2018
"स्वरसम्राज्ञी' या संगीत नाटकात एक पद आहे.... "कशी केलीस माझी दैना, मला तुझ्याबिगर करमेना... !' भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा बहुधा हे गाणे मनातल्या मनात गुणगुणतच सध्या मित्रपक्षांच्या नेत्यांना भेटत असावेत. वर्तमान राजवटीचे महानायक आणि त्यांचे सहनायक अमितभाई यांना ते सत्तेत आल्यापासून फक्त...
जून 08, 2018
गेल्या तीन-साडेतीन वर्षांत शिवसेनेच्या असंतोषाकडे भाजपने दुर्लक्षच केले. अमित शहा यांच्या एका भेटीने शिवसेनेची नाराजी दूर होईल अशी शक्‍यता नाही. त्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी लागेल. भा रतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्राच्या सत्तेतील भागीदार शिवसेना यांच्यात गेली...