एकूण 20 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने पंधरा वर्षात जनतेच्या विकासाचा आवाज दाबण्याचे काम केले. त्यांना प्रगतीची संधी नाकारली गेली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दिवाळीला आपण जसे घरात साफसफाई करतो तसे काँग्रेसला साफ करुन महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा, असे आवाहन केंद्रीय महिला बालविकास आणि...
सप्टेंबर 19, 2019
देयके देण्यासंबंधी आपल्या देशात वातावरण खराब आहे. देयके देण्याच्या नियमांचे पालन न करणे आणि देयके बुडविणाऱ्यांवर कारवाई करण्याची कमकुवत यंत्रणा यामुळे व्यवसायपूरक वातावरणाच्या मानांकनात जागतिक पातळीवर आपली घसरण होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत. आर्थिक आघाडीवर गेले काही आठवडे...
जुलै 29, 2019
मुंबई - राज्यात २०१४ साली १९० वाघ होते ते वाढून आता २०१९ मध्ये ३१२ इतके झाले आहेत. ही वाढ अंदाजे  ६५ टक्के आहे, स्थानिकांच्या सहभागातून वन विभागाने व्याघ्र संवर्धनासाठी जे प्रयत्न केले त्याचे हे यश असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. देशातील वाघांची संख्या २९६७ भारतीय वन्यजीव संस्था...
जुलै 28, 2019
नागपूर : आजपर्यंतचा इतिहास पाहता नामवंत संस्थांनीच मोठी शहरे, औद्योगिकरण व सामाजिक, सांस्कृतिक चळवळींना आकार दिला आहे. विद्यापीठ मानव संसाधनाची निर्मिती करतात आणि त्याद्वारे शहराच्या विकासाला चालना मिळते. नागपूरची वाटचाल आता कार्गो, लॉजिस्टिक आणि एव्हिएशन हब होण्याकडे आहे. त्यातच आयआयएम, एम्स,...
जून 18, 2019
मुंबई: विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडत असाताना विरोधकांनी थांबवला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवाराच्या ट्विटर अकाऊंटवरून अहवाल फुटला असल्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणल्यानंतर विधानपरिषदेत विरोधकांनी गोंधळ घातला. २ हजार २२० कोटी रु. किमतीचा महाराष्ट्र राज्य कृषी...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
नोव्हेंबर 26, 2018
नागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागाने आयोजित केलेल्या भारतीय रस्ते काँग्रेसच्या (आयआरसी) ७९ व्या अधिवेशनाचा समारोप आज झाला. शेवटच्या दिवशी प्रदर्शनाला राज्याचे वित्त व नियोजन मंत्री तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भेट दिली. रस्ते बांधणीतील तंत्रज्ञान पाहून ते भारावून गेले. मानकापूर येथील...
नोव्हेंबर 16, 2018
पुणे - एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरिधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (ॲडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी याची गुरुवारी (ता. १५) अधिकृत घोषणा केली...
ऑक्टोबर 28, 2018
ओतूर ता. जुन्नर - जैव विविधतेवर आधारीत जुन्नर तालुक्यातील दुर्गावाडी पठाराची माहिती देणारे 'बायोडाव्हर्सीटी ऑफ दुर्गावाडी प्याटुज' या पुस्तकाचे महाराष्ट्र वनविभागाकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. ओतूर ता. जुन्नर येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयातील प्राध्यापक संशोधक डॉ...
फेब्रुवारी 17, 2018
फेब्रुवारी महिना आला, की मराठी भाषेसंबंधी अनेक उत्सवी कार्यक्रम होऊ लागतात. हा महिना संपला, की पुढील फेब्रुवारीपर्यंत कोणालाही मराठी भाषेची आठवण होत नाही. उत्सव साजरे केले, की भाषेबद्दल आपले कर्तव्य झाले अशीच सरकारची, साहित्य संस्थांची कल्पना झालेली दिसते. आजच्या काळात केवळ मराठीच नव्हे, तर सर्व...
जुलै 04, 2017
औरंगाबाद: मराठवाड्यात 4.90 टक्के वनक्षेत्र आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात भारतीय स्थलसेनेच्या सहकार्याने वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी इको टास्क फोर्स बटालियनच्या मदतीने आगामी वर्षात 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे...
जुलै 02, 2017
विज्ञानयुगात खनिजांचं महत्त्व अधोरेखित करण्याची गरज नसावी. खनिज व संबंधित पदार्थांबाबत सर्वंकष संशोधन करण्यासाठी सीएसआयआरनं १९६४ मध्ये प्रादेशिक संशोधन संस्थेच्या रूपानं ओरिसा राज्यात खनिज व पदार्थसंशोधन संस्थेची स्थापना केली. अलीकडं २००७ मध्ये या संस्थेची पुनर्रचना होऊन विस्तार झालेला आहे....
मे 07, 2017
राष्ट्रीय वनस्पतीविषयक संशोधन संस्थेचा इतिहास १८ व्या शतकापासून सुरू होतो. तत्कालीन अयोध्येच्या नबाबानं लखनौमध्ये उभारलेल्या सिकंदरबागेचा उपयोग त्या वेळी संगीत, नृत्यकाम आणि काव्यमैफलींचा आनंद घेण्यासाठी करण्यात आला. याच बागेत १८५७ मधील बंडाच्या रणधुमाळीत दोन हजार भारतीय सैनिकांचं शिरकाण झालं....
एप्रिल 09, 2017
मध्य प्रदेशात भोपाळ इथं शेतीसंदर्भात केवळ मातीवर शास्त्रीय संशोधन करणारी भारतीय मृदा विज्ञान संस्था (आयआयएसएस) सन १९८८ मध्ये स्थापन झालेली आहे. भारतीय कृषी परिषदेच्या अंतर्गत या संस्थेचं कार्य चालतं. पर्यावरणरक्षण करत मातीची (मृदा) गुणवत्ता वाढवण्यासाठी पायाभूत आणि धोरणात्मक संशोधन करणं या मुख्य...
फेब्रुवारी 19, 2017
बदलत्या काळानुसार देशात आधुनिक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान (बायोटेक्‍नॉलॉजी) विषयात विकास आणि व्यावसायिक व्यवस्थापन करण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत १९८६ मध्ये स्वतंत्र अशा जैवतंत्रज्ञान विभागाची स्थापना करण्यात आली. जैवतंत्रज्ञानाचा विकास व संशोधन साध्य करत जैवतंत्रज्ञानाच्या...
फेब्रुवारी 12, 2017
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) ही संस्था म्हणजे आपल्या देशाचा अमूल्य ठेवा आहे. स्वातंत्र्यपूर्वकाळात सी. व्ही. रामन, जे. सी. घोष व ब्रिटिश अधिकारी सॅम्युअल सॅवेल यांचा प्रस्ताव, शांतिस्वरूप भटनागर यांचे अथक्‌ प्रयत्न आणि दूरदृष्टीचे तत्कालीन नेते रामस्वामी मुदलीयार यांचा पाठपुरावा...
फेब्रुवारी 06, 2017
सन १९१६ मध्ये त्या वेळच्या मद्रास प्रांतीय सरकारनं सध्याच्या केरळमधल्या राष्ट्रीय रस्ता क्रमांक ६६ वरच्या कासारगोड या जिल्ह्याच्या ठिकाणी नारळांवर संशोधन करणारी एक संस्था सुरू केली. १९४८ मध्ये ‘भारतीय नारळ समिती’कडं ही संस्था हस्तांतरित झाली. पुढं १९७० मध्ये केंद्रीय पीकलागवड संशोधन संस्था (...
जानेवारी 29, 2017
सन १९७० च्या दशकात निर्माण झालेल्या ऊर्जेच्या संकटाची झळ प्रामुख्यानं प्रगत देशांना बसली होती. त्यादरम्यानच्या पार्श्‍वभूमीवर भारतानंही ऊर्जेच्या भविष्यकालीन तरतुदीच्या दृष्टिकोनातून विज्ञान-तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीत अतिरिक्त ऊर्जास्रोत आयोगाची स्थापना केली. या आयोगाकडं नवीन आणि नवकरणीय (...
जानेवारी 15, 2017
भारताच्या आर्थिक विकासाच्या अनेक योजना १९५०च्या दरम्यान कार्यान्वित झाल्या. या दरम्यानच जागतिक हवामान परिषदेनं भरवलेल्या तिसऱ्या परिषदेत विषुवृत्तीय क्षेत्रातल्या देशांनी हवामानविषयक अभ्यास-संशोधनाची निकड स्पष्ट केली. यानंतर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत एका प्रस्तावाद्वारे भारतीय विषुववृत्तीय हवामान...
जानेवारी 08, 2017
रेडिओ, टेपरेकॉर्डर, म्युझिक सिस्टिम, टू-इन-वन, सीडी प्रॉडक्‍ट, कार ऑडिओ ही उत्पादनं तशी वरकरणी पाहता ‘किरकोळ’ वाटतात... या किंवा अशांसारख्याच अन्य उत्पादनांमध्ये सर्जनशीलता किंवा नवनिर्मिती ती काय असणार, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडू शकतो... पण त्यातही सर्जनशीलता असते, हे वास्तव आहे. त्याच...