एकूण 28 परिणाम
मे 18, 2019
तापमानाचा पारा उंचावतानाच रुसलेल्या पर्जन्यराजाला प्रसन्न करण्यासाठी वृक्षारोपणाची कोटीची उड्डाणे राज्यात मारली. पण प्रत्यक्षात झाडे जगवण्याची बोंब आहे. तेरा कोटी वृक्षलागवडीचा डंका पिटला. मात्र यापूर्वीची किती झाडे जगली, याचा धांडोळा सर्वेक्षणापलीकडे घेण्याची आवश्‍यकता यंत्रणांना भासलेली नाही. ‘...
एप्रिल 17, 2019
भौगोलिक व सामरिक महत्त्व असलेल्या मालदीवमधील राजकीय स्थित्यंतर हा तेथील लोकशाहीचा विजय आहे. तेथील सत्तांतरामुळे त्या देशाबरोबरील संबंध नव्याने दृढ करण्याची अमूल्य राजनैतिक संधी भारताला उपलब्ध झाली आहे. मा लदीव या हिंदी महासागरातील द्वीपसमूहाच्या छोट्याशा; पण आपल्या शेजारी देशात नुकत्याच झालेल्या...
मार्च 31, 2019
संग्रामपूर(पंजाबराव ठाकरे) - चंद्रपूर नंतर आता खारपाणपट्ट्यातील संग्रामपूरात होणार बांबू ची शेती. चायना तुन  मोसा जातीचे बियाणे बोलावून लागवड योग्य रोपे तयार करण्यात आली आहेत. सोबतच बाबूसा बालकुवा जातीचे रोपे ही उपलब्ध करण्यात आली आहेत. भविष्याचा वेध म्हणून संग्रामपूर मधील रामेश्वर सातव वयाच्या 65...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य सरकारने...
फेब्रुवारी 24, 2019
आटपाडी  -  ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आटपाडी येथे नाट्यगृह उभारणीसाठी 13 कोटी 65 लाख रुपये निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार अनिलभाऊ बाबर यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठक बोलत होते. तानाजीराव पाटील, सरपंच वृषाली पाटील, दिघंचीचे...
डिसेंबर 17, 2018
धुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि "ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...
नोव्हेंबर 11, 2018
आर्वी (वर्धा) - अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन गुरुवार तारीख 15 ते शनिवार तारीख 17 पर्यंत नांदेड येथे आयोजित केले आहे. या अधिवेशनाला जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा माध्यमिक व उच्च...
नोव्हेंबर 04, 2018
जगभर महिलांना विविध हक्क आणि अधिकारप्राप्त करून घेण्यासाठी अगदी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत झगडावं लागलं. असं असलं, तरी अनेक स्त्रियांनी गेल्या काही दशकांत अनेक क्षेत्रांत प्रचंड भरारी घेतली आहे. काही आपल्या देशाच्या सर्वोच्च स्थानी आरूढ झाल्या आहेत आणि आजही वैद्यक, यांत्रिकी, व्यापार, उद्योग आणि...
ऑक्टोबर 31, 2018
सोलापूर : राज्यात एक नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी आज सोलापुरात कँडल मार्च काढण्यात आला. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास चार पुतळ्यापासून सुरू झालेला हा कँडल मार्च जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यामध्ये वेगवेगळ्या संघटनेच्या...
ऑक्टोबर 31, 2018
सरकारची खर्चाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे, त्यामुळे शिक्षणासह अनेक खात्यांच्या कारभारात खर्चाला कात्रीचे छुपे धोरण आहे. हा दावा नाकारण्यात येत असला तरी शिक्षण खात्याच्या कामकाजात डोकावले तरी त्याचे प्रत्यंतर येते आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे साधारणतः सरकारी धोरण असते....
ऑक्टोबर 30, 2018
सोलापूर : राज्यात 1 नोव्हेंबर 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी बुधवारी (ता. 31) जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने कँडल मार्च काढला जाणार आहे. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या घूमजावचा निषेध करण्यासाठी "जवाब दो'चा नारा देण्यात...
सप्टेंबर 28, 2018
भडगाव : कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील यांचा 62 वाढदिवस उत्साहात साजरा झाला. तर वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने केरळ राज्यातील पुरग्रस्तांसाठी 'सकाळ रिलीफ फंडा'च्या माध्यमाने 1 लाख 11 हजार 111 रूपयांची मदत दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...
सप्टेंबर 28, 2018
सेवाग्राम (जि.वर्धा) - जगातील सर्वांत मोठा चरखा सेवाग्राम येथील आश्रम  प्रतिष्ठानच्या जागेवर महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी उभारण्यात येणार आहे. हा चरखा देशातील एकमेव मेटल शिक्षण महाविद्यालयात निर्मित करण्यात आला आहे. गिनेस आणि युनिक बुक  ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारा हा चरखा तब्बल साडेपाच टन...
सप्टेंबर 09, 2018
वाघोली : जीवनात शिस्त खूप महत्त्वाची आहे. तुमच्या जीवनाला त्यामुळे एक वेगळी वाट मिळते. महाविद्यालयीन जीवनात त्याचे महत्त्व वाटत नसले तरी येथून बाहेर पडल्यावर त्याचे महत्व कळेल. त्यामुळे शिस्त आतापासूनच अंगीकृत करा, असे मत सहायक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी व्यक्त केले. वाघोलीतील जी एच रायसोनी...
ऑगस्ट 15, 2018
औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटीला शिर्डी संस्थानकडून मिळालेल्या पंधरा कोटींच्या एमआरआयच्या खरेदीला मंगळवारी (ता 14) प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यात ही खरेदी केंद्रीय खरेदीसाठी स्थापन हाफकीन महामंडळाकडून करण्याची अट घालण्यात आली आहे. गेल्या महिन्यात अर्थमंत्र्यांची नाराजी व्यक्त करूनही...
ऑगस्ट 15, 2018
कोल्हापूर - आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना काहीतरी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे; परंतु या संकल्पनेला फाटा देत वाघांची घटती संख्या आणि एकूणच वाघांच्या संवर्धनासाठी येथील तरुणांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद ठरतो आहे.  राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून स्मृतिचिन्ह म्हणून वाघाचे...
जुलै 12, 2018
औरंगाबाद : हाफकिन महामंडळाच्या खोळंबलेल्या खरेदी प्रक्रियेवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. नागपूर येथील वनविभागाच्या सभागृहात सोमवारी (ता. नऊ) सायंकाळी बैठक झाली. त्यावेळी शिर्डी संस्थानकडून मिळालेल्या 54.5 कोटींची यंत्रसामग्रीची खरेदी रखडल्याने पूर्वीच्या प्रक्रियेने...
जून 20, 2018
औंध : "जातीपातीची बंधने झुगारुन व जातीची उतरंड सारुन जोपर्यंत आपण माणूस म्हणून एकत्र येणार नाहीत. तोपर्यंत जात ही जाणार नाही. आजपर्यंत अनेक महापुरुषांनी यासाठी कार्य केले. त्यांना काही प्रमाणात यशही आले. तरीसुध्दा स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही आपल्या देशातील जाती व्यवस्थेचे समूळ निर्मूलन का होऊ...
जून 18, 2018
औरंगाबाद - प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांच्या "असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न्स'ने (अस्मी) बुधवारपासून (ता. 13) संप पुकारला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी नागपूर येथील चर्चेत वाढीव विद्यावेतन वैद्यकीय शिक्षण खात्याने त्यांच्या बजेटमधून देण्याची भूमिका मांडली. हा...
एप्रिल 12, 2018
गेले काही दिवस वर्तमानपत्रांत प्रवेशाविषयी येणाऱ्या बातम्या पाहिल्या आणि एक गोष्ट लक्षात आली, की प्रवेशाची समस्या आता गंभीर रूप घेऊ लागली आहे. शाळांमध्ये प्रवेश घेताना फक्त आपल्या पाल्यालाच विचार आपल्याकडून केला जातो. आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला की झाले, नाही मिळाला तर शाळेच्या माथी खापर फोडून...