एकूण 22 परिणाम
ऑगस्ट 21, 2019
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये मागील आठवड्यात सोमवारी (ता. १२) महक ही पाच मजली इमारत झुकल्याने ३१ कुटुंबीयांना बाहेर काढून खाली करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी ती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळण्याची घटना  घडली होती. आज मंगळवारी (ता. २०) पालिकेची महासभा होती. ते लक्षात घेऊन, या...
फेब्रुवारी 12, 2019
उल्हासनगर : ओल्या-सुक्या कचऱ्या पासून खत-गॅस-विज अशा भव्य इंंधन निमिर्तीचा वेेेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची पाहणीसाठी आज नेदरलँडच्या पाच पाहुण्यांच्या पथकाने उल्हासनगरात भेट दिली. त्यांनी दोन्ही डंपिंग ग्राऊंड सह कचऱ्याच्या वर्गीकरणाची पाहणी केली. हा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उल्हासनगर-कडोंमपा-बदलापूर-...
फेब्रुवारी 11, 2019
उल्हासनगर - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यापूर्वीच प्रदेश काँग्रेसने उल्हासनगरातील काँग्रेसची नवी कार्यकारिणी निवडली आहे. राधाचारण करोतीया यांची उल्हासनगर जिल्हाध्यक्षपदी तर मोहन साधवानी यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. डॉ.जयराज लुल्ला हे अनेक वर्षे उल्हासनगरच्या जिल्हाध्यक्ष पदावर होते....
जानेवारी 02, 2019
उल्हासनगर : सत्तेत असलेले भाजपाचे सभागृह नेते जमनादास पुरस्वानी यांच्या नातेवाईकांच्या दोन हॉटलांवर उल्हासनगर पालिकेच्या आरोग्य विभागाने छापेमारी करून प्लॅस्टिकचा साठा जप्त केला. यात 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला  आहे. विशेष प्लॅस्टिक बंदीसाठी केंद्रातील भाजपाने कंबर कसली असताना भाजपाच्याच...
नोव्हेंबर 16, 2018
उल्हासनगर - पूर्वी कमी येणारे वीज बिल अधिक प्रमाणात किंबहूना अनेक पटीने येत असल्याने ते भरताना सर्वसामान्यांसोबत व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. वारंवार विनंत्या करूनही अधिकारी वीज बिल कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत नसल्याने आज उल्हासनगरातील साई पक्षाने वाढीव वीज बिलाच्या विरोधात रस्त्यावर...
नोव्हेंबर 01, 2018
उल्हासनगर  : माजी उपमहापौर व 2017 मध्ये पार पडलेल्या उल्हासनगर पालिका निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असलेले विनोद ठाकूर यांच्या सोबत व्यावसायिक रवी पाटील, साई पक्षाचे अमर लुंड व शिवसेनेच्या काही माजी शाखा प्रमुखांनी भाजपात प्रवेश केला आहे. मागच्या कल्याण पूर्व विधानसभा निवडणुकीत गणपत गायकवाड यांचा कमी...
ऑक्टोबर 15, 2018
उल्हासनगर - पहिले काँक्रीटचे रोड उल्हासनगरात बनवणारे व याच रोडमुळे महाराष्ट्रात चर्चेचे विषय बनणारे पप्पू कलानी यांच्या विकासकामांच्या पावलावर त्यांचे पुत्र युथ आयकॉन ओमी कलानी व महापौर पंचम कलानी यांनी पाऊल ठेवले आहे. उल्हासनगरची स्थापना होण्यापूर्वी पासून शासनाच्या ताब्यात असलेल्या तीन प्रशस्त...
ऑक्टोबर 03, 2018
उल्हासनगर : फाईलचोरीच्या प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले भाजपाचे स्विकृत नगरसेवक प्रदिप रामचंदानी यांनी आज दुपारी उल्हासनगर महानगरपालिकाचे शहर अभियंता महेश सितलानी यांना त्यांच्या कॅबिनमध्ये जाऊन अर्वाच्य शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या कामगार संघटनेच्या हाके नंतर...
सप्टेंबर 28, 2018
उल्हासनगर: महानगरपालिकेत भाजपा-साई पक्षाची युती. भाजपाच्या 32 पैकी सर्वाधिक नगरसेवक हे टीम ओमी कलानी समर्थक. करारानुसार पहिल्या सव्वा वर्षासाठी मीना आयलानी तर दुसरी सव्वा वर्षाची खेप पंचम कलानी यांची. आयलानी यांचा कालावधी 4 जुलै मध्ये संपला. पण त्या राजीनामा देत नसल्याने बेबनावाची परिस्थिती. कलानी...
सप्टेंबर 27, 2018
उल्हासनगर- पप्पू कलानी - कमल भटीजा या दोन वैऱ्यांच्या पंचम कलानी व ज्योती भटीजा या सुनांचा उद्या महापौर पदासाठी आमना-सामना होत आहे. पंचम ह्या भाजपा तर ज्योती ह्या शिवसेनेच्या पाठींब्याने साईपक्षाच्या उमेदवार आहेत. त्यात व्हिपच्या धक्क्यांनी दोन्ही ठिकाणी कलाटणी मिळू लागली असून ही निवडणुक...
सप्टेंबर 24, 2018
उल्हासनगर : ऐन महापौर पदाच्या निवडणुकीच्या तोंडावर फुटलेल्या साईपक्षाची विभागणी झाली असून एका गटाने शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. त्या अनुषंगाने शिवसेनेच्या बळावर साईच्या ज्योती बठीजा यांनी महापौर पदाचा उमेदवारी अर्ज सादर केला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी महापौरांच्या प्रमुख दावेदार असणाऱ्या...
जुलै 04, 2018
उल्हासनगर : ठेकेदाराला वारंवार मुदत देण्यात आली पण पुलाचे काम पूर्ण झालेच नाही. 15 जूनपर्यत काम पूर्ण होणार अन्यथा ठेकेदारावर कारवाई करण्यात येणार असे लेखी आश्वासन आयुक्त गणेश पाटील यांनी दिले. परत 30 तारखेपर्यंत विहित मुदत ठेकेदाराला देण्यात आल्यावरही पुलाची अवस्था जैसे थे असल्याच्या निषेधार्थ आज...
जून 12, 2018
उल्हासनगर : गेल्या दोन वर्षांपासून रेंगाळत ठेवलेल्या उल्हासनगरातील वालधुनी नदीवर वडोल गावाच्या पुलासाठी जिंकू किंवा मरू ची लढाई सुरू झाली आहे. अशोका फाऊंडेशनचे उपोषणकर्ते शिवाजी रगडे, नगरसेविका सविता तोरणे-रगडे यांनी नेहमीप्रमाणे लेखी आश्वासनाचे गाजर दाखवणाऱ्या पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम...
जून 03, 2018
उल्हासनगर : संततधार पावसाळ्यात दोन वर्षांपूर्वी वाहून गेलेल्या आणि त्यात एका लहान विद्यार्थ्याचा बळी घेतलेल्या वडोल गावाच्या पुलाचे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. आयुक्तांनी या पुलाची पाहणी केली असून, येत्या 15 दिवसात या पुलाचे काम पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. ते पाहता हा पूल...
मे 25, 2018
उल्हासनगर - महाराष्ट्रातील पहिलीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे आज उद्घाटन करण्यात आले.मात्र ज्यांनी या अभ्यासिकेसाठी पाठपुरावा केला. ज्यांच्या प्रमुख उपस्थितीत कालावधीत अभ्यासिकेचा भूमिपूजन सोहळा पार पडला, त्यात शिवसेनेच्या माजी महापौर अपेक्षा पाटील, रिपाइं आठवले गटाच्या माजी उपमहापौर पंचशीला...
मे 24, 2018
आणि उल्हासनगर : महाराष्ट्रातील पहिलीच वातानुकूलित तीन मजल्याची प्रशस्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उल्हासनगरात उभी राहिली आहे, उद्या शुक्रवारी (ता. 25) या अभ्यासिकेचा भव्य उद्घाटन सोहळा होत आहे. स्पर्धापरीक्षेची पुस्तके या अभ्यासिकेत मिळणार असल्याने गोरगरीब विद्यार्थी सुखावून गेले आहेत...
मे 18, 2018
ब्रेक लागलेल्या कामांना गती मिळणार उल्हासनगरः निधी नसल्याने उल्हासनगरच्या विकासाला ब्रेक लागला.त्यास गती मिळण्यासाठी विकासनिधी ही काळाची गरज असल्याचे साकडे आयुक्त व सत्ताधारी यांनी घातल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 350 कोटी रुपयांच्या विकासकामांची मान्यता दिली आहे. गुरुवारी (ता. 17)...
मे 11, 2018
उल्हासनगर : चालू वर्षात जुलै महिन्यापासून महापौर मीना आयलानी यांच्या आदेशान्वये उल्हासनगर महानगरपालिकेच्या 7 शाळांमध्ये सेमी-इंग्लिशचे धडे गिरवले जाणार आहेत. त्यात मराठी माध्यम-3,हिंदी माध्यम-2 व सिंधी माध्यमाच्या 2 शाळांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाधिकारी भाऊराव मोहिते यांनी दिली. उल्हासनगरात...
मार्च 15, 2018
उल्हासनगर : पुजाकौर लभाना यांचे जातप्रमाणपत्रामुळे नगरसेवकपद रद्द झाल्याने प्रभाग 17 मध्ये 6 एप्रिलला पोटनिवडणूक होत आहे. विशेष म्हणजे पुजाकौर यांची तक्रार ज्यांनी केली होती, त्या काँग्रेसच्या पराभूत उमेदवार माजी उपमहापौर जया साधवानी यांच्या चुलत बहिणीला उमेदवारी जाहिर करून राष्ट्रवादीने अनपेक्षित...
फेब्रुवारी 07, 2018
उल्हासनगर : दिग्गज उमेदवार असणाऱ्या माजी उपमहापौर जया साधवानी यांचा पराभव करून प्रभाग 17(ब)मधून निवडून आलेल्या शिक्षिका पुजाकौर लभाना यांचे नगरसेवक पद जातप्रमाणपत्रामुळे रद्द झाले आहे. त्यामुळे या प्रभागात राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुक जाहिर झाली आहे. त्यासाठी मतदार याद्यांची प्रक्रिया...