एकूण 21 परिणाम
मार्च 29, 2019
उल्हासनगर - गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी एका इसमाला एक गावठी पिस्तुल व दोन कठ्यांसह अटक केली आहे. यापूर्वी विठ्ठलवाडी पोलिसांनी दोघांना एका कठ्यासह अटक केली आहे. उल्हासनगरात आठवडाभरात या दोन घटना घडल्याने कल्याण लोकसभा निवडणूक पिस्तुल-गावठी कठ्यांच्या रडारवर असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.काल...
फेब्रुवारी 23, 2019
उल्हासनगर  : घरात घुसून मारहाण करण्याच्या गुन्हयात तारखेला हजर राहत नसल्याने कल्याण न्यायालयाने 21 सप्टेंबर 2017 ला फरार घोषित केलेल्या माय-लेकाला उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी राहत असलेल्या झोपडपट्या उध्वस्त केल्यावर त्यांचा ठावठिकाणा मिळवण्यासाठी...
फेब्रुवारी 22, 2019
उल्हासनगर - काश्मीर पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारताचे जवान शहीद झाल्याने सार्वजनिक शिवजयंती महोत्सव रद्द करून महोत्सवाच्या नियोजित खर्चाची प्रत्येकी एक लाख रुपयांची रकम देण्यासाठी शिवसेना बुलढाणा जिल्ह्यात पोहचली आहे. शिवसेनेने शहीद झालेले संजय राजपूत, नितीन राठोड यांची विधवा...
जानेवारी 29, 2019
कल्याण - दुचाकी आणि कारचे आकर्षण लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या मनात असते. चुकीच्या मार्गाने वाहन शिकून अपघातही होतात. यासाठी शिक्षकवर्गाने त्यांना लहानपणीच सुरक्षेचे धडे दिल्यास रस्त्यावरील युवकांचे अपघात टाळण्यासाठी मदत होईल. कारण शाळकरी विद्यार्थी सर्वात जास्त शिक्षकांच्या सानिध्यात असतो....
जानेवारी 28, 2019
उल्हासनगर : असंख्य गुन्ह्यांचा पर्दाफाश करणाऱ्या उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जानेवारी महिन्याच्या अखेरीस एकाच दिवसात मोटरसायकल-टेम्पो-मोबाईल चोरीच्या तीन गुन्ह्यांचे यशस्वी डिटेक्शन केले आहे. याप्रकरणी सुमारे पाच लाखाचा ऐवज ताब्यात घेताना दोन अल्पवयीन (विधी संघर्षीत बालके) मुलांसह...
जानेवारी 14, 2019
पिंपरी (पुणे) - शारीरिक संबंधांची व्हिडिओ क्लिप काढत त्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करीत एक लाख रूपयांची मागणी केली. ही घटना उल्हासनगर आणि चिंचवड येथे घडली. विश्वनाथ वाल्हे (रा. दर्शन नगरी, चिंचवडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ३८ वर्षीय महिलेने अंबरनाथ पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन...
डिसेंबर 20, 2018
उल्हासनगर : भरत नगर रोडवरील निंबाचे भलेमोठे झाड विजेच्या वायरींवर कोसळल्याने दिवसभर विद्युत पुरवठा खंडित राहिला. या झाडाला कापण्यासाठी अग्निशमन दल तसेच झाड लवकर  कापल्यावर विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करण्याकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कॅम्प नंबर 4 मधील सुभाष टेकडीच्या...
डिसेंबर 09, 2018
उल्हासनगर : दोन वर्षांपूर्वी रिपाइं आठवले गटाच्या अंबरनाथ युवक सचिव पदाचा राजीनामा देणाऱ्या प्रविण गोसावी याने कालरात्री विमको नाका येथील संविधान कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावरच हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्याने पोलिसांनाही धक्का दिला. त्याचे पडसाद...
डिसेंबर 07, 2018
उल्हासनगर : शाळेत जात असतानाच भटक्या कुत्रीने हल्ला करत सात लहान मुलांचे लचके तोडल्याची घटना उल्हासनगरातील सम्राट अशोक नगरात घडली. विदर्भ मलकापूर येथील लहान मुलगीही कुत्रीच्या लचक्याची शिकार झाली. पालिकेच्या श्वान पथकाने कुत्रीला पकडून नेले आहे. मानसी दोडे (वय.14), दक्ष रोकडे (वय.5) कुणाल चव्हाण (5...
डिसेंबर 05, 2018
उल्हासनगर - शांतीनगरातील साईबाबा मंदिर ते डॉल्फिन हॉटेल रोडवरील सुमारे 30 अनधिकृत अतिक्रमणांवर आज उल्हासनगर पालिकेने जेसीबी मशीन फिरवून ही अतिक्रमणे भुईसपाट केली. हा रोड 80 फुटाचा असून काही व्यापारी, गॅरेजधारक व नागरिकांनी रोडच्या काही भागांवर अतिक्रमण करून रोड व्यापण्याचा प्रकार सुरू केला होता....
नोव्हेंबर 14, 2018
पाली - मिक्सर आणि ग्राइंडरच्या युगात पाटा-वरवंटा, जाते बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय अजूनही तग धरून आहे. प्रचंड मेहनत, शारीरिक त्रास, मागणीत घट आणि शिक्षणाचा प्रसार यामुळे या पारंपारिक कारागिरांची पुढची पिढी मात्र आता या व्यवसायापासून दूर होऊ लागली आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा व्यवसाय करणारे...
ऑक्टोबर 02, 2018
उल्हासनगर - शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या गोलमैदान मधील प्रभाग समिती एकच्या कार्यालयासमोर एका तरुणाच्या डोक्यात पेवरब्लॉकची लादी टाकून निघृण हत्या करण्याची घटना भरदुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उल्हासनगरात घडली आहे. विशेष म्हणजे आज महात्मा गांधी जयंती असताना गांजा वरून गंजेडी त्रिकूटाने...
सप्टेंबर 08, 2018
सरळगांव (ठाणे)- गणपती बाप्पा खड्यातूनच या असी बोलण्याची वेळ यावर्षी गणेश भक्तावर आली आहे. कल्याण- मुरबाड या राष्ट्रीय महामार्गावर म्हारळ ते कल्याण दरम्यान पडलेले खड्डे न बूजवल्याने गणपती बाप्पाला या पडलेल्या खड्ड्यातूनच गाडी आपटत-आपटत आणावे लागणार असल्याने गणेश भक्तांच्या वतीने संताप व्यक्त केला...
सप्टेंबर 04, 2018
उल्हासनगर- मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वयोवृद्ध महिलांना टार्गेट करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने धूनस्टाईलने खेचून मोटरसायकलवर पळ काढणाऱ्या एका तडीपारासह तिघांना बेड्या ठोकण्याची कामगिरी उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली आहे. त्यांच्या कडून 116 ग्रॅम वजनाचे दागिने, मोटरसायकल व...
जुलै 14, 2018
उल्हासनगर : इयत्ता 7 वी पास झालेली विद्यार्थीनी शाळा सोडण्याचा दाखला घेण्यासाठी आली असता वासनांध भावनेने तिचे हात दाबणाऱ्या एक 54 वर्षीय शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराला उल्हानगर पालिकेने गांभीर्याने घेतले असून आयुक्त गणेश पाटील यांच्या आदेशान्वये मुख्यालय उपायुक्त संतोष...
जुलै 07, 2018
उल्हासनगर : काल पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उल्हासनगरातील वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली असून जुना पूल ओव्हरफ्लो झाला आहे.त्यामुळे चांदीबाई कॉलेजच्या कॅम्पस सह अनेक परिसर पाण्यात गेले असून दोन भिंती देखील कोसळल्या आहेत. सम्राट अशोक नगर,रेणुका सोसायटी,आशिर्वाद कॉलनी,करोतिया नगर,सिब्लॉक...
जुलै 06, 2018
मुंबई - उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आजही मध्य रेल्वेच्या सुमारे ६० स्थानकांच्या परिसरात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे. परिणामी तिथे अपघात झाल्यानंतर खासगी रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत रुग्ण ताटकळत राहतो. उल्हासनगर ते अंबरनाथ स्थानकांत होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. या मार्गातील...
एप्रिल 24, 2018
उल्हासनगर : हारलेले पैसे परत करण्यावरून झालेल्या वादविवादात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना काल सायंकाळी उल्हासनगरात घडली आहे. आरोपी पळून जाण्याच्या बेतात असतानाच, तो कल्याण रेल्वे स्टेशनवर गुन्हे अन्वेषणच्या जाळ्यात अडकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. काल सायंकाळी 6...
एप्रिल 15, 2018
उल्हासनगर - महानगरपालिका निवडणुकीत कमालीचा प्रभावशाली ठसा उमटवणारे पप्पू कालानी पुत्र ओमी कालानी यांनी उल्हासनगरातील 5 शिक्षित अपंगांना (विकलांग) व्यवसाय मिळून देताना त्यांना टी-स्टॉल ची भेट दिली आहे. अपंगांना भेट रुपी दिलेल्या या स्टॉलवर टीओके अर्थात टीम ओमी कालानी असे फलक झळकले आहेत. त्यामुळे...
जानेवारी 13, 2018
उल्हासनगर: लहान भाऊ मोठे झाल्यावर त्यांनी त्यांच्या बहिणीने केलेल्या प्रेमविवाहाचा वचपा काढण्यासाठी बहिणीच्या नवऱ्यावर तलवार-चाकू हल्ला केल्याची सैराट फेम घटना उल्हासनगरातील हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन भावांना बेड्या ठोकल्या आहेत. वीर तानाजी नगरातील...